ऐश्वर्या शर्मा आणि नील भट्ट यांच्या नात्यावर सलमान खानने केले थेट मोठे विधान, म्हणाला, हा शेवट…
बिग बॉस सीजन 17 धमाका करताना दिसत आहे. बिग बॉसबद्दल चाहत्यांमध्ये मोठे क्रेझ हे नक्कीच आहे. सलमान खान याने नुकताच घरातील सदस्यांचा चांगलाच क्लास हा लावला आहे. कतरिना कैफ ही बिग बॉस सीजन 17 मध्ये पोहचली.

मुंबई : बिग बॉस सीजन 17 धमाका करताना दिसत आहे. बिग बॉस सीजन 17 मध्ये मोठे हंगामे होताना दिसले आहेत. बिग बॉस सीजन 17 ला टीआरपीमध्ये टाॅपला आणण्यासाठी निर्मात्यांनी कंबर कसल्याचे बघायला मिळतंय. आता नुकताच बिग बॉस सीजन 17 मध्ये विकेंडचा वार हा पार पडलाय. यावेळी सलमान खान हा घरातील सदस्यांचा क्लास लावताना दिसला आहे. सलमान खान याच्या निशाण्यावर यावेळी ऐश्वर्या शर्मा ही दिसलीये. ऐश्वर्या शर्मा हिला आरसा दाखवताना सलमान खान दिसलाय.
ऐश्वर्या शर्मा हिला खडेबोल सलमान खान याने सुनावले आहेत. सलमान खान म्हणाला की, तू पती नील भट्ट याच्यासोबत चुकीचा व्यवहार करते. इतकेच नाही तर त्याला चल निघ, तू निघ, चल चल…असे बोलते. जे अत्यंत चुकीचे आहे. नील तुझे हे सर्व बोलणे ऐकून घेतो. मात्र, तो एक दिवस असा फाटेल की, सर्वकाही तिथेच संपून जाईल.
जे तुमच्या नात्यासाठी अजिबाच चांगले नाहीये. तो देखील किती दिवस तुझे हे सर्व ऐकून घेणार ना? पुढे सलमान खान हा म्हणाला की, बिग बाॅस हा शो प्रत्येक वयोगटातील व्यक्ती बघतो. तुझे हे बोलणे अत्यंत चुकीचे दिसत आहे. या गोष्टी वाढू नयेत म्हणूनच मी हे सर्व सांगण्याचा प्रयत्न करत आहे. मी काही तुमचा मित्र नाहीये.
नातेवाईक नाही फक्त शोचा एक होस्ट आहे आणि त्या नात्यानेच मी तुम्हाला हे सांगण्याचे प्रयत्न करतोय. याबद्दल मी आता पहिल्यांदाच हे बोललो आणि हे शेवटचे आहे. परत मी याबद्दल कधीच बोलणार नाही. यानंतर ऐश्वर्या शर्मा ही सलमान खान याला काही गोष्टी सांगताना दिसत आहे. मात्र, त्यावर फार जास्त सलमान खान हा बोलताना दिसला नाहीये.
गेल्या काही दिवसांपासून बिग बॉस 17 मध्ये मोठे हंगामे होताना दिसत आहेत. बिग बॉस 17 च्या घरात अंकिता लोखंडे आणि ऐश्वर्या शर्मा यांच्यामध्ये मोठी भांडणे झाल्याचे बघायला मिळाले. या भांडणामध्ये थेट ऐश्वर्या शर्मा हिचा क्लास काढताना अंकिता लोखंडे ही दिसली आहे. ऐश्वर्या शर्मा हिला सोशल मीडियावर देखील नेटकरी हे खडेबोल सुनावताना दिसत आहेत.
