जिथे केलं नाग चैतन्यशी लग्न, त्याच ठिकाणी दुसऱ्या पतीसोबत हनिमूनला पोहोचली समंथा
समंथाने ज्या ठिकाणी नाग चैतन्यशी डेस्टिनेशन वेडिंग केलं होतं, त्याच ठिकाणी आता ती दुसऱ्या पतीसोबत हनिमूनला पोहोचली आहे. एअरपोर्टवर समंथाने तिच्या लग्नानंतर पहिली प्रतिक्रियासुद्धा दिली आहे. मी खूप खुश आहे, असं तिने म्हटलंय.

अभिनेत्री समंथा रुथ प्रभूने 1 डिसेंबर रोजी दिग्दर्शक राज निदिमोरूशी दुसरं लग्न करून चाहत्यांना सुखद धक्का दिला. समंथाने या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करताच चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होऊ लागला. अभिनेता नाग चैतन्यशी घटस्फोट आणि त्यानंतर मायोसिटीस या ऑटोइम्युन आजाराचं निदान यांमुळे समंथाबद्दल चाहत्यांमध्ये एक प्रकारची सहानुभूती निर्माण झाली होती. त्यामुळे जेव्हा तिने दुसरं लग्न केलं, तेव्हा चाहत्यांनीही आनंद व्यक्त केला. आता लग्नानंतर समंथा आणि राज हनिमूनला गेले आहेत. परंतु हनिमूनसाठी या दोघांनी जी जागा निवडली आहे, त्याची चर्चा होत आहे. कारण समंथाने नाग चैतन्यशी ज्या ठिकाणी डेस्टिनेशन वेडिंग केलं होतं, त्याची ठिकाणी ती आता राजसोबत हनिमूनला गेली आहे.
समंथा रुथ प्रभू आणि राज निदिमोरू यांनी सोमवारी 1 डिसेंबर रोजी कोईंबतूर इथल्या ईशा योग केंद्रातील लिंग भैरवी मंदिरात लग्न केलं. भूत शुद्धी विवाहपद्धतीनुसार हे लग्न पार पडलं. गेल्या काही महिन्यांपासून या दोघांच्या डेटिंगच्या चर्चा होत्या. परंतु दोघांनीही त्यावर कोणतीची प्रतिक्रिया दिली नव्हती. लग्नात समंथाने लाल रंगाची बनारसी साडी नेसली होती. या लग्नाला फक्त 30 पाहुणे उपस्थित होते. आता लग्नानंतर समंथा आणि राज हनिमनूसाठी गोव्याला गेले आहेत.
View this post on Instagram
‘बॉलिवूड हंगामा’ने दिलेल्या वृत्तानुसार, समंथाला एअरपोर्टवर पाहिलं गेलं. यावेळी तिने लग्नानंतर पहिली प्रतिक्रियासुद्धा दिली. “मी माझ्या आयुष्यात कधीच इतकी खुश नव्हते. राजमुळे माझं आयुष्य पूर्ण झालं आहे, असं वाटतंय. ही भावना मी शब्दांत मांडू शकत नाही. आमच्या दोघांचंही वेळापत्रक व्यस्त असल्याने आम्ही फक्त एक दिवसासाठी हनिमूनला जात आहोत. कारण 4 डिसेंबरपासून मला पुन्हा शूटिंग सुरू करायची आहे. नंतर आम्ही एकमेकांसाठी नक्कीच वेळ काढू”, असं ती म्हणाली.
‘एशियानेट न्यूज’ने दिलेल्या वृत्तानुसार, राजने लग्नाच्या दिवशीच समंथाला भेट म्हणून आलिशान घर दिलं आहे. हैदराबादच्या ज्युबिली हिल्स या पॉश परिसरात हे घर आहे. राजने समंथाला या घराची चावी दिली. त्याचसोबत तिला 1.5 कोटी रुपयांची डायमंड रिंगसुद्धा दिली आहे.
समंथाने 2017 मध्ये साऊथ सुपरस्टार नागार्जुन यांचा मुलगा आणि अभिनेता नाग चैतन्यशी लग्न केलं होतं. लग्नाच्या चार वर्षांनंतर 2021 मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला. त्यानंतर नाग चैतन्यने अभिनेत्री सोभिता धुलिपालाशी दुसरं लग्न केलं.
