AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘माझी परीक्षा घेतली पण..’; नाग चैतन्यच्या दुसऱ्या लग्नानंतर समंथाची पोस्ट चर्चेत

समंथाने नाग चैतन्य आणि सोभिताच्या लग्नाच्याच दिवशी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला. त्यानंतर आता तिने एक पोस्ट लिहिली आहे. 2024 हे वर्ष तिच्यासाठी कसं गेलं, याविषयी ती या पोस्टमध्ये व्यक्त झाली आहे.

'माझी परीक्षा घेतली पण..'; नाग चैतन्यच्या दुसऱ्या लग्नानंतर समंथाची पोस्ट चर्चेत
समंथा, नाग चैतन्य, सोभिता धुलिपालाImage Credit source: Instagram
| Updated on: Dec 09, 2024 | 10:28 AM
Share

अभिनेत्री समंथा रुथ प्रभूचा पूर्व पती नाग चैतन्यने 4 डिसेंबर रोजी गर्लफ्रेंड सोभिता धुलिपालाशी दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधली. समंथा आणि नाग चैतन्य लग्नाच्या चार वर्षांतच 2021 मध्ये विभक्त झाले. त्यानंतर नाग चैतन्य सोभिताला डेट करू लागला होता. कुटुंबीय आणि पाहुण्यांच्या उपस्थितीत हैदराबादमधील अन्नपुर्णा स्टुडिओजमध्ये या दोघांचा लग्नसोहळा पार पडला. या लग्नानंतर आता समंथाची सोशल मीडियावर एक पोस्ट चर्चेत आली आहे. समंथाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये ही पोस्ट लिहिली आहे. ‘2024 मधील तुमचा खास क्षण शेअर करा’, अशी ही पोस्ट होती. त्यावर समंथाने तिचं हे वर्ष कसं गेलं, त्याविषयी लिहिलंय.

समंथाची पोस्ट-

‘जसजसं हे वर्ष संपत आलंय, तसतसं आपल्या प्रवासाला आकार देणाऱ्या चढ-उतारांचा विचार करतो. आव्हानांपासून ते विजयापर्यंत, विकास आणि आनंदाचे क्षण अनुभवत तुम्ही एखाद्या चमकदार ताऱ्याप्रमाणे वर्षाच्या शेवटपर्यंत पोहोचला आहात. या वर्षाने आपली परीक्षा घेतली आहे. परंतु त्याने आपल्याला सामर्थ्य, लवचिकता आणि चिकाटीचं सौंदर्यही शिकवलं आहे’, असं तिने लिहिलंय. त्याचसोबत चाहत्यांनाही त्यांचे अनुभव शेअर करण्याचं आवाहन केलंय.

नाग चैतन्यच्या लग्नाच्या दिवशी समंथाने आणखी एक पोस्ट शेअर केली होती. तिने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये हॉलिवूड आयकॉन वॉईला डेविसचा व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये एका मुलासोबत मुलीची रेसलिंग मॅच दाखवण्यात आली होती. या व्हिडीओच्या सुरुवातीला मुलगा संपूर्ण आत्मविश्वासाने रेसलिंगच्या सामन्यात प्रवेश करतो. पण जसजशी स्पर्धा पुढे जाते, तसतशी ती मुलगी त्याच्यावर मात करून विजय आपल्या नावे करते. ‘फुलासारखी नाजूक नाही तर बॉम्बसारखी नाजूक आहे’, असं कॅप्शन वॉईला डेविसने या व्हिडीओला दिलं होतं. समंथाने हा मेसेज आणि तो व्हिडीओ तिच्या स्टोरीमध्ये शेअर करत लिहिलं होतं, ‘#FightLikeAGirl’. समंथाने ही पोस्ट नाग चैतन्य आणि सोभिता धुलिपाला यांच्या लग्नाच्याच दिवशी केल्याने चाहत्यांमध्ये चर्चांना उधाण आलं होतं.

अभिनेते नागार्जुन यांनी सोशल मीडियावर नाग चैतन्यच्या दुसऱ्या लग्नाचे फोटो शेअर करत आनंद व्यक्त केला होता. सोभिता आणि चै यांना या सुंदर अध्यायाची सुरुवात करताना पाहणं हा माझ्यासाठी अत्यंत खास आणि भावनिक क्षण होता. माझ्या लाडक्या चैतन्यचं अभिनंदन आणि प्रिय सोभिता.. आमच्या कुटुंबात तुझं स्वागत आहे. तुम्ही आमच्या आयुष्यात खूप आनंद घेऊन आला आहात.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.