AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

साधं, पारंपरिक अन् मनाला आनंद देणारं जेवण…समंथाच्या लग्नाचा मेन्यू आला समोर; ताटात होता ‘हा’ खास पदार्थ

अभिनेत्री समांथा रुथ प्रभूच्या दुसऱ्या लग्नाची चर्चा सर्वत्र होत आहे.पण एवढंच नाही तर तिच्या लग्नातील मेन्यूचीही तेवढीच चर्चा होत आहे. कारण तिने ज्या पद्धतीने लग्न केलं त्याच पारंपारिक पद्धतीचा जेवणाचा मेन्यू तिच्या लग्नात पाहायला मिळाला. समांथाने जेवणासाठी कर्नाटक शैलीतील शाकाहारी पदार्थांची निवड केली. या पदार्थांची चव तर चांगली आहेच पण सोबतच आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. नक्की काय मेन्यू होता जाणून घेऊयात.

साधं, पारंपरिक अन् मनाला आनंद देणारं जेवण…समंथाच्या लग्नाचा मेन्यू आला समोर; ताटात होता 'हा' खास पदार्थ
… Samantha's wedding menu revealed; 'These' special dishes were included in the plateImage Credit source: Instagram
Mayuri Sajerao
Mayuri Sajerao | Updated on: Dec 03, 2025 | 1:52 PM
Share

दाक्षिणात्य अभिनेत्री समांथाच्या दुसऱ्या लग्नाची जोरदार चर्चा सुरु आहे. प्रसिद्ध अभिनेता नागा चैतन्यसोबतच्या घटस्फोटानंतर तब्बल 4 वर्षांनी समांथा लग्नबंधनात अडकली. तिने 1 डिसेंबर 2025 रोजी “द फॅमिली मॅन” चा दिग्दर्शक राज निदिमोरूसोबत लग्न केलं. या दोघांचे रिलेशन खूप वर्षांपासून सुरु असल्याचं म्हटलं जातं. अखेर त्यांनी त्यांचे नाते अधिकृत करत तामिळनाडूतील लिंगा भैरवी मंदिरात अगदी साधेपणाने हा लग्नसोहळा पार पडला आणि त्यांचे फोटोज काही क्षणातच इंटरनेटवर व्हायरल झाले.

लग्नातील जेवणाचा मेन्यू देखील समोर

त्यांचे लग्नाचे फोटो समोर येताच सोशल मीडियावर सर्वांनी शुभेच्छांचा वर्षाव केला. समंथाच्या नव्या सुरुवातीसाठी तिचे फॅन्स फार खुश आहेत. तसेच समांथाने तिचा हा लग्नसोहळा वैदिक आणि अतिशय कमी लोकांमध्ये केला. तिच्या साडीपासून ते तिने ज्या ‘भूत शुद्धी पद्धती’ने विवाह केला ती पद्धत, तसेच ज्या मंदिरात तिने लग्न केलं त्या देवीचे मंदिर, त्या मंदिराचे महत्त्व अशा सर्व गोष्टींचा चर्चा झाली आणि आताही चाहते ते सर्च करून पाहत आहेत.

पण याचं दरम्यान समांथा आणि राज यांच्या लग्नातील जेवणाचा मेन्यू देखील समोर आला आहे. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, जिथे मोठमोठे सेलिब्रिटी आपल्या लग्नात शाही जेवणाचा थाट ठेवतात तिथेच समंथाने आपल्या लग्नाच्या मेन्यूत अगदी साध्या आणि पारंपारिक मेन्यूची निवड केली होती. लग्नातील कर्नाटक शैलीतील शाकाहारी मेजवानीने सर्वांचे लक्ष वेधले. यात कोणकोणत्या पदार्थांचा समावेश होता ते चला जाणून घेऊया.

काय होता जेवणाचा मेन्यू?

जेवणाच्या या ताटात प्रथिनेयुक्त डाळ, पौष्टिक रागी मुड्डे आणि बहुमुखी अक्की रोटी सारखे पदार्थ सामील होते. सेलिब्रिटींच्या लग्नात सामान्यतः अपेक्षित असलेल्या महागड्या, बहु-खंडीय बुफेच्या अगदी उलट, जोडप्याने जाणूनबुजून हा ग्रामीण, साधा आणि पारंपरिक मेन्यू निवडला. कोशिंबीर, भात, मसाला वडा, गाजर-शेंगांची भाजी आणि सोप्पू पाल्या म्हणजेच पालेभाजी या पदार्थांचा यात समावेश दिसून आला. लग्नासाठी निवडलेल्या या साध्या मेन्यूने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

जेवणाच्या मेन्यूत दडले अनेक पोषक घटक

तसेच हे देखील लक्षात घेण्यासारखे आहे की, मेन्यू फक्त पारंपरिक आणि साधा नव्हता तर आरोग्याच्या दृष्टीनेही यात अनेक पोषक तत्वांचा समावेश करण्यात आला होता. त्या प्रत्येक पदार्थाचे शरीराला होणारे फायदे समजल्यास तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल आणि विचारपूर्वक निवडलेल्या या जेवणाच्या मेन्यमुळे समांथाचे कौतुकही वाटेल.त्या पदार्थांबद्दल जाणून घेऊयात.

डाळ – प्रथिनांचा उत्कृष्ट स्रोत असलेली डाळ शाकाहारी लोकांच्या आहारासाठी एक उत्तम पर्याय ठरते. अक्की रोटी – यात फायबर, प्रथिने, खनिजे आणि जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात आढळतात. बीन्स कॅरट पाल्या – बीन्स, गाजर आणि पालेभाज्या यांचे मिश्रण शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. सोप्पू पाल्या- ही कर्नाटकातील एक पारंपरिक आणि आरोग्यदायी भाजी आहे, जी पालेभाज्यांपासून तयार केली जाते. रागी मुड्डे – रागीमध्ये प्रथिने, कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम आणि फायबर असते ज्यामुळे ते एक पौष्टिक सुपरफूड मानले जाते. कोशिंबीर – कोशिंबिरीतील भाज्या आणि दह्यामुळे पचनक्रिया सुधारते आणि बद्धकोष्ठतासारख्या समस्या कमी होतात. मसाला वडा – डाळी आणि मसाल्यांपासून ऊर्जा मिळते, ज्यामुळे शरीराला ताकद मिळते

Follow Us
61 तासांच्या आंदोलनाला अखेर यश, 3900 + 100 + 200 चा फॉर्म्युला मान्य..
Raju Shetti On Sugarcane Farmers Protest : 61 तासांच्या आंदोलनाला अखेर यश, 3900 + 100 + 200 चा फॉर्म्युला मान्य; राजू शेट्टींकडून आंदोलन मागे
शरद पवारांवर ब्रीच कँडीत उपचार; या नेत्यांकडून भेटीगाठी आणि फोन
Sharad Pawar Health Update : शरद पवारांवर ब्रीच कँडीत उपचार; या नेत्यांकडून भेटीगाठी आणि फोन
आताच का बोलले, तेव्हा कोणाचा दबाव होता? तटकरेंच्या विधानावर अनिल....
NCP Merger : आताच का बोलले, तेव्हा कोणाचा दबाव होता? सुनील तटकरेंच्या विधानावर अनिल देशमुखांचा थेट सवाल
गोकुळमध्ये रडीचा डाव खेळणं बंद करा; भाजपवर ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल
Raj Thackeray On Gokul : गोकुळमध्ये रडीचा डाव खेळणं बंद करा; भाजपवर राज ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल
अजित पवारांच्या राष्ट्रवादीत उलथापालथ होण्याची शक्यता...
NCP : अजित पवारांच्या राष्ट्रवादीत उलथापालथ होण्याची शक्यता; त्या बड्या नेत्याच्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ
अजितदादा असते तर दोन्ही राष्ट्रवादी...; सुनील तटकरे यांचं मोठं विधान
Sunil Tatkare : अजितदादा असते तर दोन्ही राष्ट्रवादी...; सुनील तटकरे यांचं  मोठं विधान
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? शरद पवार-प्रफुल्ल पटेल भेटीनंतर राजकीय
NCP Merger : दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? शरद पवार-प्रफुल्ल पटेल भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
मुख्यमंत्री फडणवीसांचा सुप्रिया सुळेंना फोन; शरद पवारांच्या.....
Devendra Fadnavis Calls Supriya Sule : मुख्यमंत्री फडणवीसांचा सुप्रिया सुळेंना फोन; शरद पवारांच्या प्रकृतीची घेतली सविस्तर माहिती
अजितदादा हयात असते तर 12 फेब्रुवारीलाच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र...
अजितदादा हयात असते तर 12 फेब्रुवारीलाच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या असत्या; सुनील तटकरेंचा मोठा खुलासा!
शरद पवारांच्या भेटीगाठींवरून रोहित पवारांचा भाजपला सूचक इशारा; पार्थ..
शरद पवारांच्या भेटीगाठींवरून रोहित पवारांचा भाजपला सूचक इशारा; पार्थ आणि सुनेत्रा पवारांबाबत काय म्हणाले?