AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विकी जैन आणि अंकिता लोखंडे यांना एकत्र झोपू देण्यास सना खान हिचा विरोध, थेट मध्यरात्री जोरदार भांडणे

विकी जैन आणि अंकिता लोखंडे हे बिग बाॅसच्या घरात दाखल झाले आहेत. विकी जैन आणि अंकिता लोखंडे यांच्यामध्ये मोठे वाद होताना दिसत आहेत. इतकेच नाही तर अंकिता लोखंडे हिने विकी जैन याच्यावर काही दिवसांपूर्वीच अत्यंत गंभीर आरोप हे केले. अंकिताचे आरोप ऐकून सर्वांनाच मोठा धक्का बसल्याचे बघायला मिळाले.

विकी जैन आणि अंकिता लोखंडे यांना एकत्र झोपू देण्यास सना खान हिचा विरोध, थेट मध्यरात्री जोरदार भांडणे
| Updated on: Nov 23, 2023 | 3:32 PM
Share

मुंबई : बिग बॉस 17 च्या घरात कधी कोणती नाते बदलतील हे सांगणे फार जास्त कठीण आहे. कारण बिग बॉस 17 च्या घरात पती आणि पत्नीमध्ये देखील मोठे हंगामे होताना दिसले आहेत. नुकताच आता सना रईस खान, विकी जैन आणि अंकिता लोखंडे यांच्यामध्ये मोठा वाद झालाय. थेट मध्यरात्री यांच्यामध्ये वाद झाला. त्याचे झाले असे की, थेट सना रईस खान हिने अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांना एका बेडवर झोपण्यास मनाई केली. डबल बेडवर झोपण्यावरून हा वाद होताना दिसला आहे. अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांच्या रूम आता वेगवेगळ्या आहेत.

विकी जैन हा दिमागच्या रूममध्ये शिफ्ट झालाय, तर अंकिता लोखंडे ही दिलवाल्या रूममध्ये आहे. मात्र, असे असताना देखील दिमागच्या रूममध्ये विकी जैन याच्यासोबत झोपण्यासाठी येत. मात्र, आता थेट डबल बेड यांना झोपण्यासाठी देण्यास सना हिने मनाई केलीये. यामुळेच यांच्यामध्ये मोठा वाद होताना दिसेल. हा वाद टोकाला जाताना दिसतोय.

सना रईस खान ही म्हणाली की, मला सिंगल बेडवर झोपले की, त्रास होत आहे. मी ज्या सिंगल बेडवर झोपत आहे, तिथे लाईट खूप जास्त आहे, याचा मला त्रास होतो. मला डबल बेडवरच झोपायचे आहे. मी किती दिवसांपासून सिंगल बेडवर झोपत आहे. यावरून विकी जैन हा सना हिला भांडताना दिसत आहे. यावेळी अंकिता ही देखील सना हिला समजवताना दिसत आहे.

सना हिला अंकिता लोखंडे ही म्हणते की, मला आणि विकीला आजच्या दिवस झोपू दे…उद्यापासून मीच येत नाही. आजच्या दिवस झोपू दे…मात्र, सना ही अंकिता लोखंडे हिचे काहीच ऐकत नाही. यानंतर सना विकी याला म्हणते की, इतके दिवस झोपू दिले त्याचे काहीच नाही. माझे आभार मानायचे सोडून एक दिवस नाही म्हटले की, भांडत आहात. काय लोक आहेत.

एकीकडे बिग बाॅस 17 मध्ये सना रईस खान आणि विकी जैन यांची जवळीकता वाढताना दिसत आहे. याचे काही व्हिडीओही व्हायरल होताना दिसले. सना आणि विकी जैन यांनी एकमेकांचे हात पकडल्याचे दिसत होते. मात्र, इतर वेळी यांच्यामध्ये मोठी भांडणे होताना दिसतात. सना ही बिग बाॅस 17 मधील सर्वाधिक चर्चेत असलेली स्पर्धेक आहे.

सरपंच हत्येप्रकरणी मोठी अपडेट आल्यानंतर धनंजय देशमुख यांची मागणी काय?
सरपंच हत्येप्रकरणी मोठी अपडेट आल्यानंतर धनंजय देशमुख यांची मागणी काय?.
संतोष देशमुख प्रकरणात उज्ज्वल निकमांकडून मोठी अपडेट, कराडसह आरोपींवर..
संतोष देशमुख प्रकरणात उज्ज्वल निकमांकडून मोठी अपडेट, कराडसह आरोपींवर...
प्रशांत जगताप यांच्या राजीनाम्याचं कारण समोर, पक्षाकडून मनधरणी अन्...
प्रशांत जगताप यांच्या राजीनाम्याचं कारण समोर, पक्षाकडून मनधरणी अन्....
साटम-शेलार अन् रंगा-बिल्याची खैर नाही, भाजप नेत्यावर मनसेचा निशाणा
साटम-शेलार अन् रंगा-बिल्याची खैर नाही, भाजप नेत्यावर मनसेचा निशाणा.
...तोपर्यंत घाई नको, मनसे-ठाकरे सेनेच्या युतीबाबत राज ठाकरेंची भूमिका
...तोपर्यंत घाई नको, मनसे-ठाकरे सेनेच्या युतीबाबत राज ठाकरेंची भूमिका.
आता तो विषय संपला...नाराजीच्या मुद्द्यावर मुनगंटीवारांचं स्पष्टच भाष्य
आता तो विषय संपला...नाराजीच्या मुद्द्यावर मुनगंटीवारांचं स्पष्टच भाष्य.
प्रशांत जगतापांचा पुणे शहर अध्यक्षपदाचा राजीनामा, तातडीन मुंबईला रवाना
प्रशांत जगतापांचा पुणे शहर अध्यक्षपदाचा राजीनामा, तातडीन मुंबईला रवाना.
राणे बंधूंमधील राजकीय संघर्ष टोकाला,16 जानेवारीनंतर मोठा बॉम्ब फुटणार?
राणे बंधूंमधील राजकीय संघर्ष टोकाला,16 जानेवारीनंतर मोठा बॉम्ब फुटणार?.
भाजप राज्यात एक नंबरचा पक्ष, नगरपरिषद निवडणुकांमध्ये मोठा विजय
भाजप राज्यात एक नंबरचा पक्ष, नगरपरिषद निवडणुकांमध्ये मोठा विजय.
दावे दमदार पण हतबल शिलेदार? युतीसाठी भाजपपुढे याचना करण्याची वेळ?
दावे दमदार पण हतबल शिलेदार? युतीसाठी भाजपपुढे याचना करण्याची वेळ?.