संजय कपूरचा होता मुलांवर खूप जीव; त्यांच्यासाठी करिश्मा कपूरला दरमहा द्यायचा एवढी रक्कम
करिश्मा कपूरचा एक्स पती संजय कपूरचे 12 जून रोजी इंग्लंडमध्ये निधन झाले. दोघांनाही वेगळे होऊन तशी बरीच वर्ष झाली होती. मात्र घटस्फोटानंतर संजय कपूरने करिश्माला पोटगी म्हणून करोडो रुपये दिले होते आणि तो दरमहा मुलांसाठी लाखो रुपये करिश्माला द्यायचा.

करिश्मा कपूरचे एक्स पती संजय कपूर यांचे 12 जून 2025 रोजी निधन झाले. त्यांच्या मृत्यूची पुष्टी त्यांचे मित्र सुहेल सेठ यांनी केली. करिश्मा कायदेशीररित्या संजयपासून वेगळी झाली असली तरी मुलांमुळे ती त्या संजय कपूर यांच्याशी जोडली गेली होती.
संजय कपूरचे मुलांशी होते जवळचे नाते
करीना कपूर, मलायका अरोरा आणि त्यांचे जवळचे मित्र ही माहिती मिळताच करीश्मा आणि तिच्या मुलांची काळजी घेण्यासाठी घरी पोहोचले आहेत. संजयचे करिश्मासोबतचे नाते संपले होते तरी देखील त्याचे मुलांशी समायरा आणि कियान यांच्याशी खूप जवळचे नाते होते. 2016 मध्ये अभिनेत्रीपासून वेगळे झाल्यानंतर, मुलांसाठी संजय कपूर दरमहा करिश्माला काही रक्कम देत असे. घटस्फोटानंतर देखील संजयने करिश्माला पोटगीही दिली होती.
घटस्फोटानंतर करिश्मा कपूरला किती पोटगी देण्यात आली? 2003 मध्ये चेंबूरजवळील राज कपूर यांच्या बंगल्यात करिश्मा कपूर आणि संजय कपूर यांचे लग्न मोठ्या थाटामाटात झाले होते, परंतु 2014 मध्ये अभिनेत्रीने न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला. करिश्माने तिचा माजी पती संजय कपूरवर अनेक गंभीर आरोप केले होते, ज्यात तिला मारहाण करण्यापासून ते त्याच्या मित्रांसोबत झोपण्यास भाग पाडण्यापर्यंतचे अनेक आरोप होते. तर संजयने करिश्मावर पैशासाठी त्याच्याशी लग्न केल्याचा आरोप केला होता.
मुलांच्या नावावर 14 कोटींचे बाँड खरेदी
अनेक वर्षे या कटू नात्यात राहिल्यानंतर, करिश्मा आणि संजय यांचा घटस्फोट झाला आणि ते 2016 मध्ये वेगळे झाले. मुलांचा ताबा करिश्माकडे देण्यात आला आणि संजयला त्यांना भेटण्याची परवानगी देण्यात आली. एका वृत्तानुसार, जेव्हा संजय आणि करिश्माचा घटस्फोट झाला तेव्हा त्या व्यावसायिकाने त्याच्या वडिलांचे खारमधील घर अभिनेत्रीच्या नावावर केले. इतकेच नाही तर त्याने मुलांच्या नावावर 14 कोटींचे बाँड खरेदी केले.
A father holds his daughter’s hand for a short while, but he holds her heart forever. Happy 18th birthday to my first love, Samaira. Welcome to adulthood. Remember to be responsible and live your life to the fullest. You are beautiful inside out. And we are all so proud of you ♥️ pic.twitter.com/zehZE9dVoq
— Sunjay Kapur (@sunjaykapur) March 11, 2023
संजय मुलांसाठी दरमहा इतके पैसे द्यायचा
संजय त्याच्या दोन्ही मुलांच्या खूप जवळ होता आणि रिपोर्ट्सनुसार, तो समायरा आणि कियानसाठी दरमहा करिश्मा कपूरला 10 लाख रुपये देत असे. करिश्माचा माजी पती संजय कपूरची एकूण मालमत्ता सुमारे 9200 कोटी आहे. दिल्लीव्यतिरिक्त, त्याची मुंबई आणि लंडनमध्येही मालमत्ता आहे.
संजयची झाली होती तीन लग्न
संजय कपूरचे तीन लग्न झाले होते. त्याचे पहिले लग्न नंदिता महतानीसोबत झाले होते, जिने विद्युत जामवाल आणि रणबीर कपूर यांना डेट केले होते. 2000 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर त्याने करिश्माशी लग्न केले. करिश्मापासून घटस्फोट घेतल्यानंतर संजयने प्रिया सचदेवशी तिसरे लग्न केले. या दोघांनाही एक मुलगा आहे.