लवकरच ‘संजय लीला भन्साळी’ लाहोरच्या रेड लाईट एरियावर बनवणार चित्रपट!

संजय लीला भन्साळीचा आगामी गंगूबाई काठियावाडी चित्रपट सध्या खूप चर्चेत आहे. एका वृत्तानुसार, संजय लीला भन्साळी लाहोरच्या रेड लाईट एरिया हिरा मंडीवर एक चित्रपट लवकरच तयार करणार आहेत.

लवकरच 'संजय लीला भन्साळी' लाहोरच्या रेड लाईट एरियावर बनवणार चित्रपट!
Follow us
| Updated on: Dec 17, 2020 | 10:15 AM

मुंबई : संजय लीला भन्साळीचा आगामी गंगूबाई काठियावाडी चित्रपट सध्या खूप चर्चेत आहे. एका वृत्तानुसार, संजय लीला भन्साळी लाहोरच्या रेड लाईट एरिया हिरा मंडीवर एक चित्रपट लवकरच तयार करणार आहेत. पीपींगमूनच्या अहवालानुसार हिरा मंडी एक पीरियड ड्रामा वेब चित्रपट असणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार हा वेब चित्रपट नेटफ्ल‍िक्सवर प्रदर्शित होणार आहे. 2021 च्या सुरुवातीला या चित्रपटाची अधिकृत घोषणा होईल. चित्रपटाचे शूटिंग 2021 च्या सुरूवातीलाच सुरू होऊ शकते. (Sanjay Leela Bhansali to make a film in the red light area)

सूत्रांच्या माहितीनुसार भन्साळी आणि त्यांची प्रॉडक्शन कंपनीचे सीईओ प्रेरणा सिंह गेल्या काही दिवसांपासून नेटफ्लिक्सशी बोलत होते आणि आता दोघांनीही एकत्र काम करण्यास सहमती दर्शविली आहे. हा चित्रपट संजय लीला भन्साळीसाठीचा त्यांचा महत्वाया प्रोजेक्ट असणार आहे. या चित्रपटात ती प्रत्येक गोष्ट असणार आहे जी संजय लीला भन्साळी यांच्या चित्रपटात दिसते. मात्र, भन्साळी हा चित्रपट स्वत: दिग्दर्शन करणार नाहीत तर विभू पुरी या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. ऋतिक आणि ऐश्वर्याच्या चित्रपटासाठी विभू पुरी यांनी काही डायलॉग्स लिहिले होते. पुढील वर्षी या चित्रपटाचे प्रोडक्शन काम सुरू होईल.

सूत्रांच्या माहितीनुसार, हीरा मंडी आणि गंगूबाई काठियावाडी हे दोन वेगवेगळे चित्रपट आहेत. या चित्रपटामध्ये भन्साळीला राणी मुखर्जी कास्ट करण्याची इच्छा होती, परंतु काही कारणांमुळे हे होऊ शकले नाही. यापूर्वी एश्वर्या बच्चन, प्रीती झिंटा आणि प्रियांका चोप्रा जोनास यांची नावेही जोडली गेली. मात्र चित्रपटाच्या कास्टबाबत काहीही निर्णय अध्याप झालेला नाही.

संजय लीला भन्साळी यांनी ‘राम लीला’हा चित्रपट बनवला होता. या चित्रपटात भन्साळी हे सुशांत सिंग याला मुख्य भूमिकेत घेणार होते. मात्र, सुशांत याचा यशराज फिल्म्ससोबत करार असल्याने सुशांतला घेता आलं नाही. करण, यश राज फिल्म्सने त्याला परवानगी दिली नव्हती. त्यामुळे भन्साळींनी ‘राम लीला’मध्ये अभिनेता रणवीर सिंगला मुख्य भूमिकेत घेतलं.‘राम लीला’ हा चित्रपट हिट झाला होता. आपल्याला या चित्रपटात काम करता आलं नाही, याचं सुशांतला दुःख होत. तसं त्याने ते व्यक्तही केलं होतं. यशराज फिल्म्समुळे आपल्याला हा चित्रपट करता आला नाही, असं त्याचं म्हणणं होतं. यासर्व पार्श्वभूमीवर आता संजय लीला भन्साळी यांची चौकशी झाली होती.

संबंधित बातम्या : 

Twitter War : ‘शेपूट सरळ होऊ शकत नाही’, कंगना आणि दिलजीतमध्ये पुन्हा एकदा ट्विटर वॉर

‘नाईकांच्या वाड्या’तून पाटणकरांची थेट बॉलिवूडमध्ये उडी, ‘नेलपॉलिश’ या हिंदी चित्रपटात झळकणार!

(Sanjay Leela Bhansali to make a film in the red light area)

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.