Sara Ali Khan | ‘काश्मीर की कली’ बनत साराची धमाल, आई अमृता सिंहसोबत लुटतेय सुट्ट्यांचा आनंद!

Sara Ali Khan | ‘काश्मीर की कली’ बनत साराची धमाल, आई अमृता सिंहसोबत लुटतेय सुट्ट्यांचा आनंद!
सारा अली खान

सध्या सारा कश्मीरमध्ये तिची आई अमृता सिंहसोबत सुट्ट्यांचा आनंद घेताना दिसत आहे. साराने नुकतेच सोशल मीडियावर काही फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत.

Harshada Bhirvandekar

|

Apr 13, 2021 | 5:50 PM

मुंबई : बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) हीने तिच्या अभिनयाने बॉलिवूडमध्ये स्वतःची एक वेगळी ओळख तयार केली आहे. सारा सोशल मीडियावर खूप अॅक्टिव असते. सारा तिच्या चाहत्यांसाठी नेहमी फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. आपल्या करियरची सुरुवात साराने ‘केदारनाथ’ या चित्रपटाद्वारे केली होती. या चित्रपटात अभिनेत्री सोबत दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतही दिसला होता. पहिल्याच चित्रपटापासून साराने तिच्या अभिनयाची जादू चाहत्यांवर केली होती. त्यानंतर साराने अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले (Sara Ali Khan Enjoying vacation with mother Amruta Singh at Kashmir).

सध्या सारा कश्मीरमध्ये तिची आई अमृता सिंहसोबत सुट्ट्यांचा आनंद घेताना दिसत आहे. साराने नुकतेच सोशल मीडियावर काही फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. त्या फोटोमध्ये सारा फुल एन्जॉय करताना दिसत आहे आणि फोटोमध्ये साराचा एकदम ग्लॅमरस लूक देखील दिसत आहे. साराचा हा लूक पाहून तिचे चाहते ही घायाळ झाले आहेत. तिने शेअर केलेला स्विमिंग पूलमधील फोटोतर सोशल मीडियावर तूफान व्हायरल झाला आहे.

पाहा साराचा व्हिडीओ

अभिनेत्री सारा अली खान, वरुण धवनसोबत ‘कुली नंबर 1’मध्ये शेवटी दिसली होती. मात्र, साराचा आणि वरुणचा हा चित्रपट म्हणावा तसा हिट झाला नाही. पण, या चित्रपटातील साराचा अभिनय तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडला. आता साराचे चाहते तिचा आगामी चित्रपट ‘अतरंगी रे’ याची आतुरतेने वाट पाहात आहेत. या चित्रपटात सारासोबत अक्षय कुमार आणि धनुष दिसणार आहे (Sara Ali Khan Enjoying vacation with mother Amruta Singh at Kashmir).

करीनाच्या बाळासाठी ‘ताई’कडून गिफ्ट्स!

सोशल मीडियावर सारा अली खानचा एक व्हिडीओ चर्चेत आला होता. या व्हिडीओमध्ये सारा अली खान, करीनाच्या घरी जाताना दिसत होती. तिच्या हातात करीनाच्या बाळासाठी आणि करीनासाठी खास भेटवस्तू असल्याचे पाहायला मिळाले होते. हा व्हिडीओ विरल भयानी यांच्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला होता. सावत्र आई असली तरी, करीना आणि सारा या दोघीं खूप चांगल्या मैत्रिणी देखील आहेत.

बऱ्याच वेळा या दोघीही त्यांच्यातील नात्याविषयी उघडपणे व्यक्त झाल्या आहेत. करीनानेही साराला तिच्या पहिल्या चित्रपटासाठी मदत केली होती. विशेष म्हणजे सारा आणि तैमुर या दोघांमध्येही चांगली मैत्री आहे, सारा तैमुरच्या वाढदिवसानिमित्त नेहमीच वेगवेगळे फोटो शेअर करत असते आणि त्याला सोशल मीडियावर शुभेच्छा देखील देते.

(Sara Ali Khan Enjoying vacation with mother Amruta Singh at Kashmir)

हेही वाचा :

कोरोनानं आयुष्य नेगेटीव्ह झालंय? सलमान खानच्या बापाची ही मुलाखत नव्यानं विचार करायला लावेल!

स्टेजवर गाता गाताच बोदडेंना पॅरेलिसिसचा अ‍ॅटॅक आला, ग्रामस्थांकडून पै पै जमा; वाचा, पुढे काय घडलं?

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें