AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sara Tendulkar ची ‘या’ अभिनेत्यासोबत बाईक राईड; फोटो व्हायरल होताच रंगल्या चर्चा

सोशल मीडियावर साराच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी सारा कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पोस्ट करत असते. आता देखील सारा एका फोटोमुळे चर्चेत आली आहे.

Sara Tendulkar ची 'या' अभिनेत्यासोबत बाईक राईड; फोटो व्हायरल होताच रंगल्या चर्चा
Sara Tendulkar ची 'या' अभिनेत्यासोबत बाईक राईड; फोटो व्हायरल होताच रंगल्या चर्चा
| Updated on: Jan 25, 2023 | 12:12 PM
Share

Sara Tendulkar: मास्टर ब्लास्टार सचिन तेंडुलकरची लेक सारा तेंडुलकर (Sara Tendulkar) कायम चर्चेत असते. सारा अद्याप अभिनेत्री म्हणून ओळख निर्माण केली नसली तरी सोशल मीडियावर मात्र सचिनची लेक कायम चर्चेत असते. सोशल मीडियावर साराच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी सारा कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पोस्ट करत असते. आता देखील सारा एका फोटोमुळे चर्चेत आली आहे. फोटोमध्ये सारा एका खास व्यक्तीसोबत दिसत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून क्रिकेटर शुभमन गिल (Shubman Gill) आणि सारा तेंडुलकर (Sara Tendulkar) हे दोघे एकमेकांना डेट करत आहेत का अशी चर्चा होती. अशात साराचा एका तरुणासोबत फोटो व्हायरल होत असल्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे.

फोटोमध्ये सारा हिच्यासोबत असलेल्या तरुणाचं नाव सिद्धार्थ केरकर (siddharth kerkar) असं आहे. सारा सिद्धार्थसोबत बुलेट राईडवर गेली होती. फोटोमध्ये दोघांनी हेल्मेट घातला असून दोघे प्रचंड आनंदी दिसत आहे. त्यामुळे साराचा सिद्धार्थसोबत व्हायरल होत असलेल्या फोटो पाहून दोघे एकमेकांना डेट तर करत नाहीत ना? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.

सिद्धार्थ केरकर याने इन्स्टाग्रामवर स्वतःची ओळख अभिनेता म्हणून सांगितली आहे. सिद्धार्थ आणि सारा यांचा फोटो एका फॅनपेजवरुन पोस्ट करण्यात आला आहे. सध्या सर्वत्र सारा आणि सिद्धार्थच्या फोटोची चर्चा रंगत आहे. शिवाय दोघांच्या नात्याची देखील चर्चा रंगत आहे.

कोण आहे सिद्धार्थ केरकर?

सिद्धार्थ केरकरने इन्स्टाग्राम आयडीमध्ये स्वतःला अभिनेता म्हणून सांगितलं आहे. सिद्धार्थ गोवा याठिकाणी राहतो. सिद्धार्थ एक आर्टिस्ट असून त्याला पेंटिग करायला देखील प्रचंड आवडतं. शिवाय सिद्धार्थ स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर कायम पोस्ट करत असतो.

सारा तेंडुलकर देखील सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. इन्स्टाग्रामवर साराने २.५ मिलियन फॉलोअर्स आहेत, तर सारा फक्त ५८४ जणांना फॉलो करते. फक्त सोशल मीडियावरच नाही तर, रील लाईफमध्ये देखील साराच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. सारा कायम सोशल मीडियावर स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते.

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.