AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vaibhavi Upadhyay | “पर्वतांमध्ये फिरायची होती आवड, अखेर त्याच ठिकाणी..”; वैभवीच्या निधनानंतर अभिनेता भावूक

मालिकांसोबतच वैभवीने चित्रपटांमध्येही भूमिका साकारल्या आहेत. दीपिका पदुकोणच्या ‘छपाक’ या चित्रपटात तिने महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. या वर्षी प्रदर्शित झालेल्या. ‘तिमिर’ या चित्रपटातही तिने काम केलं आहे.

Vaibhavi Upadhyay | पर्वतांमध्ये फिरायची होती आवड, अखेर त्याच ठिकाणी..; वैभवीच्या निधनानंतर अभिनेता भावूक
Vaibhavi UpadhyayImage Credit source: Instagram
| Updated on: May 24, 2023 | 1:31 PM
Share

मुंबई : टेलिव्हिजन इंडस्ट्रीतून बुधवारी एकानंतर एक धक्कादायक बातम्या समोर आल्या. आधी ‘साराभाई वर्सेस साराभाई’ या मालिकेत जास्मिनची भूमिका साकारणारी अभिनेत्री वैभवी उपाध्यायचं कार अपघातात निधन झालं. त्यानंतर ‘अनुपमा’ मालिकेत धीरज कुमारची भूमिका साकारणारे अभिनेते नितेश पांडे यांच्या निधनाचं वृत्त समोर आलं. वैभवीने वयाच्या 32 व्या वर्षी या जगाचा निरोप घेतला. होणाऱ्या पतीसोबत ती उत्तर भारतात फिरायला गेली होती. तिथेच त्यांच्या कारचा अपघात झाला. डोंगराळ भागातील तीव्र वळणावर गाडीचा ताबा सुटल्याने वैभवीची कार दरीत कोसळली. या भीषण अपघातात तिचा मृत्यू झाला. तर नितेश पांडे यांचं कार्डिॲक अरेस्टने निधन झालं. या दोघांच्या निधनावर टीव्ही इंडस्ट्रीतून शोक व्यक्त केला जातोय. ‘साराभाई वर्सेस साराभाई’ या मालिकेतील अभिनेता राजेश कुमार यांनी वैभवीबद्दल बोलताना भावूक प्रतिक्रिया दिली.

‘साराभाई वर्सेस साराभाई’ या मालिकेत राजेश कुमारने वैभवीसोबत काम केलं होतं. या दोघांची जोडी प्रेक्षकांना खूप आवडायची. वैभवीच्या निधनाबद्दल तो म्हणाला, “मला अजूनही विश्वास बसत नाही की वैभवी आपल्यात नाही. मी सुन्न झालोय. वैभवी खूप हसमुख होती, एक दमदार अभिनेत्री होती. साराभाई वर्सेस साराभाई या मालिकेत तिची भूमिका फार कठीण होती. मात्र तिने ती भूमिका सहजपणे साकारली. ती सर्वांत आधी डायलॉग्स पाठ करायची. ती इतकी हसायची की 32 चे 32 दात दिसायचे. वैभवी आयुष्य भरभरून जगायची. तिला पर्वतांमध्ये फिरायला खूप आवडायचं. पण कोणी याची कल्पनासुद्धा केली नसेल की पर्वतच तिला आपल्या मिठीत सामावून घेईल.”

मालिकांसोबतच वैभवीने चित्रपटांमध्येही भूमिका साकारल्या आहेत. दीपिका पदुकोणच्या ‘छपाक’ या चित्रपटात तिने महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. या वर्षी प्रदर्शित झालेल्या. ‘तिमिर’ या चित्रपटातही तिने काम केलं आहे. याशिवाय सीआयडी, अदालत असा लोकप्रिय मालिकांमध्ये तिने भूमिका साकारल्या आहेत.

एकाच आठवड्यात टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील तीन कलाकारांचं निधन झाल्याने इंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे. 22 मे रोजी अभिनेता आदित्य सिंह राजपूतचं मुंबईतील राहत्या घरी निधन झालं. त्यानंतर आता वैभवी आणि नितेश यांच्या निधनाची बातमी समोर आली आहे.

राणे बंधूंच्या लढाईत निलेश राणेंची सरशी; मालवण, कणकवलीत भाजपला धक्का
राणे बंधूंच्या लढाईत निलेश राणेंची सरशी; मालवण, कणकवलीत भाजपला धक्का.
उपऱ्यांचा प्रवेश, नाराज निष्ठावंत BJP समर्थकांचं आंदोलन, भाजपमध्ये वाद
उपऱ्यांचा प्रवेश, नाराज निष्ठावंत BJP समर्थकांचं आंदोलन, भाजपमध्ये वाद.
सून जिंकली, सासू रुसली! राजकीय घराणं अन् नेत्यांच्या गणगोताचा निकाल
सून जिंकली, सासू रुसली! राजकीय घराणं अन् नेत्यांच्या गणगोताचा निकाल.
कुठं कोणाचा सुपडासाफ? कोण कुणाला नडलं? कुठं कोण कुणाशी भिडलं?
कुठं कोणाचा सुपडासाफ? कोण कुणाला नडलं? कुठं कोण कुणाशी भिडलं?.
नगरपालिकेतही देवाभाऊंचा करिष्मा, महायुती 200 पार अन् भाजप सर्वात पक्ष
नगरपालिकेतही देवाभाऊंचा करिष्मा, महायुती 200 पार अन् भाजप सर्वात पक्ष.
तोच पैसा, तेच आकडे अन् तशीच मशीन सेट...राऊतांचा महायुतीवर थेट निशाणा
तोच पैसा, तेच आकडे अन् तशीच मशीन सेट...राऊतांचा महायुतीवर थेट निशाणा.
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का.
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया.
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया.
मोहळमध्ये शिंदे सेनेचा सर्वात कमी वयाचा उमेदवारानं फडकवला झेंडा
मोहळमध्ये शिंदे सेनेचा सर्वात कमी वयाचा उमेदवारानं फडकवला झेंडा.