सारखं काहीतरी होतंय! नात्यातल्या गोडव्याची मजेशीर नोकझोक; 36 वर्षांनंतर Prashant Damle-Varsha Usgaonkar एकत्र

नात्यातल्या याच गोडव्याची आणि थोडया तिखटपणाची मजेशीर नोकझोक गौरी थिएटर्स निर्मित आणि प्रशांत दामले फॅन फाऊंडेशन प्रकाशित 'सारखं काहीतरी होतंय' (Sarkha Kahitari Hotay) या नाटकात पहायला मिळणार आहे. हे धमाल विनोदी नाटक येत्या 25 मार्चला रंगभूमीवर दाखल होतंय.

सारखं काहीतरी होतंय! नात्यातल्या गोडव्याची मजेशीर नोकझोक; 36 वर्षांनंतर Prashant Damle-Varsha Usgaonkar एकत्र
या नाटकानिमित्त 36 वर्षांनंतर प्रशांत दामले-वर्षा उसगांवकर एकत्र आले आहेत.Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Mar 22, 2022 | 1:27 PM

आपलं आयुष्य म्हणजे सुग्रास व्यंजनांनी भरलेलं ताट. त्यात प्रत्येक पदार्थाची जागा ठरलेली व प्रत्येक पदार्थाला आपली वेगळी चव असते. तशीच आपल्या हृदयात आपल्या माणसांची, आपल्या नात्यांची, बदलत्या काळानुसार नातेसंबंधांची परिभाषा बदलत असते. अशा बदलांना कधी प्रेमानं, कधी रागानं, कधी हक्कानं आपलंसं करायचं असतं. नात्यातल्या याच गोडव्याची आणि थोडया तिखटपणाची मजेशीर नोकझोक गौरी थिएटर्स निर्मित आणि प्रशांत दामले फॅन फाऊंडेशन प्रकाशित ‘सारखं काहीतरी होतंय’ (Sarkha Kahitari Hotay) या नाटकात पहायला मिळणार आहे. हे धमाल विनोदी नाटक येत्या 25 मार्चला रंगभूमीवर दाखल होतंय. प्रशांत दामले (Prashant Damle) आणि वर्षा उसगांवकर (Varsha Usgaonkar) यांची 36 वर्षांनी एकत्र आलेली सुपरहिट जोडी या नाटकात मध्यवर्ती भूमिकेत पहायला मिळणार आहे. या नाटकाचे लेखन-दिग्दर्शन संकर्षण कर्‍हाडेने केले आहे.

‘सारखं काहीतरी होतंय’! ही घराघरातील गोष्ट आहे. घराघरात आईवडील आपल्या मुलांना मनापासून, स्वतःच्या आवडीनिवडी, परिस्थिती, त्रास सगळं बाजूला ठेऊन आनंदाच्या आणि सुखाच्या वातावरणात वाढवण्याचा प्रयत्न करत असतातच. पण मुलं मोठी झाल्यानंतर त्यांचा आयुष्य जगण्याचा आणि आयुष्याकडे बघण्याच्या एक वेगळा दृष्टिकोन तयार झालेला असतो. जो दृष्टिकोन स्वाभाविकपणे आईवडिलांच्या दृष्टिकोनापेक्षा भिन्न असतो. ह्या भिन्नतेचा एकमेकांशी वागण्यावर आणि प्रामुख्याने आपापसातल्या संवादावर कायम परिणाम होत असतो. यावर उपाय म्हणून दोन्ही पिढ्या आपापल्या पद्धतीने आणि ‘पॉईंट ऑफ व्ह्यू’ ने मार्ग काढण्याच्या प्रयत्न करत असतात. आणि घरात सारखं काहीतरी घडत असतं, हीच या नाटकाची गोष्ट आहे.

नाटकात विनोदांची आतिषबाजी-

नात्यातील गमती-जमती, दोन पिढ्यांच्या विचारांतील विसंगती, करिअर आणि प्रेम यांचा सुरेख मिलाफ करत गुंफलेली कथा प्रत्येक घराची असून प्रत्येकजण या कथेशी एकरूप होईल, असा विश्वास निर्माते-अभिनेते प्रशांत दामले व्यक्त करतात. रुसवे-फुगवे यात नात्याची खरी मजा दडली आहे. आमच्या केमिस्ट्रीमधून हीच मजा प्रेक्षकांना घेता येईल, असं अभिनेत्री वर्षा उसगांवकर सांगतात. दिग्दर्शकीय पदार्पणातच दोन दिग्गजांसोबत काम करण्याचा आनंद आणि नाटकाची धमाल मेजवानी याचं समाधान लेखक-दिग्दर्शक संकर्षण कर्‍हाडेने व्यक्त केले. प्रशांत दामले आणि वर्षा उसगांवकर यांच्यासोबत या नाटकात पूर्णिमा अहिरे-केंडे, सिद्धी घैसास, राजसिंह देशमुख आदि कलाकारांच्याही भूमिका आहेत.

शुक्रवार 25 मार्चला दुपारी 4.30 वाजता या नाटकाच्या शुभारंभाचा प्रयोग प्रबोधनकार ठाकरे नाटयगृह, बोरीवली येथे रंगणार आहे. शनिवार 26 मार्चला रात्रौ 8.30 वाजता विष्णुदास भावे, वाशी, तर रविवार 27 मार्चला सायं 7.30 वाजता सावित्रीबाई फुले नाटयगृह, डोंबिवली येथे प्रयोग होणार आहे. सोमवार 28 मार्चला रात्रौ 8.30 गडकरी रंगायतन ठाणे आणि मंगळवार दुपारी 4.30 वाजता दीनानाथ विलेपार्ले या नाटयगृहातही शुभारंभाचे प्रयोग रंगणार आहेत.

हेही वाचा:

मन सुन्न करणारा The Kashmir Filesचा क्लायमॅक्स सीन असा झाला शूट; अभिनेत्रीला कोसळलं रडू

The Kashmir Files मध्ये वाशिमच्या मराठमोळ्या बालकलाकाराने साकारली भूमिका; दोन महिने कडाक्याच्या थंडीत केलं शूटिंग

Non Stop LIVE Update
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.