काय? सतीश शाहांना अग्नी देताच कलाकारांनी गायले गाणे, कारण ऐकून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी
ज्येष्ठ अभिनेते सतीश शाह यांच्या अंत्यसंस्कारादरम्यान 'साराभाई...'च्या टीमने गाणे गायले. आता दिग्दर्शक देवेन भोजानी यांनी यामागचं कारण सांगितलं आहे. हे कारण ऐकून तु्म्हालाही धक्का बसेल.

ज्येष्ठ अभिनेते सतीश शाह यांचे शनिवारी निधन झाले. किडनी निकामी झाल्यामुळे वयाच्या 74 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रविवारी त्यांचे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या दीर्घ कारकीर्दीत त्यांनी अनेक भूमिका साकारल्या, पण ‘साराभाई वर्सेस साराभाई’ या मालिकेमुळे त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली. या मालिकेत त्यांनी इंद्रवदन साराभाई ही आयकॉनिक भूमिका साकारली होती. पवन हंस स्मशानभूमीत त्यांच्या अंत्यसंस्कारादरम्यान ‘साराभाई…’ची संपूर्ण टीम उपस्थित होती आणि अतिशय भावूक झाली होती. यावेळी ‘साराभाई…’ च्या टीमने सतीश शाह यांच्या चितेसमोर गाणे गाऊन निरोप दिला.
‘साराभाई वर्सेस साराभाई’ या मालिकेत साहिलची भूमिका साकारणारे सुमित राघवन, मोनिशाची भूमिका साकारणारी रूपाली गांगुली आणि रोसेश साराभाईची भूमिका साकारणारे राजेश कुमार हे सतीश शाह यांच्या अंत्यसंस्कारादरम्यान उपस्थित होते. याशिवाय निर्माते जेडी मजेठिया, दिग्दर्शक देवेन भोजानी आणि लेखक-दिग्दर्शक आतिश कपाडिया हे देखील यावेळी हजर होते. अभिनेता परेश गणात्रा देखील त्यांच्यासोबत होता. सतीश शाह यांना अग्नी दिल्यानंतर कलाकारांनी ‘साराभाई…’ चं टायटल ट्रॅक गायले. दरम्यान त्यांना अश्रू आनावर झाले. आता देवेन भोजानी यांनी सतीश शाह यांच्या चितेसमोर टीमने हे गाणं का गायलं याचा खुलासा केला आहे.
वाचा: महिला डॉक्टर प्रकरणात PSI बदनेला मोठा झटका, कोर्टाचा मोठा आदेश आला; आता पोलीस…
View this post on Instagram
‘साराभाई…’ च्या टीमने का गायलं थीम सॉन्ग?
देवेन भोजानी यांनी एक व्हिडीओ शेअर करत लिहिले की, “हे कदाचित वेडेपणाचं, विचित्र वाटेल, पण आम्ही नेहमी एकत्र हे गाणं गातो आणि आजही याला अपवाद नव्हता. असं वाटलं की जणू इंदुने स्वतः हट्ट करून आम्हाला यात सहभागी करून घेतलं. सतीश शाह जी, तुमच्या आत्म्याला शांती मिळो. मला ‘साराभाई वर्सेस साराभाई’ मालिकेत तुम्हाला दिग्दर्शन करण्याचा मान मिळाला. तुम्ही आमच्या हृदयात नेहमी जिवंत राहाल.”
राजेश कुमारने वाहिली श्रद्धांजली
याचवेळी, राजेश कुमार यांनी लिहिलं, “अंतिम निरोप… साराभाईच्या गाण्याशिवाय पूर्ण होऊ शकला नसता… लॉन्ग लिव्ह इंदु… काका, तुम्ही ऐकलं का? मी देखील गाण्याचा प्रयत्न केला आणि टीमकडून भावनिक प्रेमाचा अनुभव घेतला.”
