AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sayaji Shinde: सयाजी शिंदे वन विभागावर संतापले; झाडं लावण्यासाठी कायद्याचं बंधन कशाला? थेट प्रशासनालाच सवाल

सयाजी शिंदे गेल्या काही काळापासून वृक्षसंवर्धन आणि देवराई निर्मितीसाठी काम करत आहेत. स्थानिक पातळीवर झाडं लावणं, त्यांचं संगोपन करणं आणि जैवविविधता टिकवण्याच्या उद्देशाने त्यांच्या फाऊंडेशनकडून विविध उपक्रम राबवले जात आहेत.

Sayaji Shinde: सयाजी शिंदे वन विभागावर संतापले; झाडं लावण्यासाठी कायद्याचं बंधन कशाला? थेट प्रशासनालाच सवाल
Sayaji ShindeImage Credit source: Instagram
| Updated on: Sep 29, 2026 | 8:58 AM
Share

अभिनेते आणि पर्यावरणप्रेमी सयाजी शिंदे यांनी वृक्षारोपणाच्या मुद्द्यावरून वन विभागाच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली आहे. महाराष्ट्राच्या विविध भागांत ‘सह्याद्री देवराई फाऊंडेशन’च्या माध्यमातून वृक्षलागवडीचे काम करणाऱ्या सयाजी शिंदे यांनी आता पूर्व विदर्भातही देवराई उभारण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. मात्र, या कामासाठी वन विभागाकडून नियम आणि कायद्याच्या अटींचा दाखला दिला जात असल्याने त्यांनी प्रशासनाला काही प्रश्न उपस्थित केले आहेत. नागपूर जिल्ह्यातील काही ग्रामपंचायतींनी गावांच्या परिसरात देवराई विकसित करण्यासाठी सयाजी शिंदे यांच्या फाऊंडेशनसोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यासाठी वन विभागाकडे जागेची मागणी करण्यात आली. मात्र, संबंधित जागा राखीव वनक्षेत्र असल्याचं सांगत वन विभागाने त्या ठिकाणी वृक्षारोपणाला परवानगी देता येणार नसल्याची भूमिका घेतली.

यावर आता सयाजी शिंदे यांनी प्रश्न उपस्थित केला आहे की, झाडं लावून जंगल वाढवण्याच्या उपक्रमासाठीही इतक्या कायदेशीर अडचणी का निर्माण केल्या जात आहेत? पर्यावरण संवर्धनासाठी पुढाकार घेणाऱ्या संस्थांना सहकार्य करण्याऐवजी नियमांचा अडसर निर्माण होत असल्याची त्यांची भूमिका आहे. नागपूर जिल्ह्यातील बेला ग्रामपंचायतीने गावालगत देवराईसाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. मात्र, वन विभागाने संबंधित जागा राखीव वनक्षेत्र असल्याचं सांगितलं आहे. सयाजी शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, या जागेवर प्रत्यक्षात मोठ्या प्रमाणावर वृक्ष नसून काही भागात अतिक्रमण करून शेती केली जात असल्याचा आरोप आहे. त्यामुळे वृक्षारोपणासाठी नियम सांगणाऱ्या यंत्रणेनं आधी त्या जागेवरील अतिक्रमणाकडे लक्ष द्यावं, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

या विषयावर सयाजी शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. महाराष्ट्रातील देवराई प्रकल्पांसाठी वन विभागाचं सहकार्य मिळावं, अशी मागणी त्यांनी केली होती. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जिल्हाधिकाऱ्यांना त्यांच्या फाऊंडेशनला नियमांनुसार सहकार्य करण्याच्या सूचना देणारं पत्र दिल्याचं वृत्त आहे. मात्र, त्यानंतरही काही ठिकाणी वन विभागाकडून परवानगी आणि नियमांचा मुद्दा उपस्थित केला जात असल्याने सयाजी शिंदे यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

Follow Us
एकनाथ शिंदे यांनी भाजपाला जिवंत केलं, शिंदेंमुळेच भाजपा सत्तेत...
Mahayuti : एकनाथ शिंदे यांनी भाजपाला जिवंत केलं, शिंदेंमुळेच भाजपा सत्तेत...; शिवसेना आमदाराने सगळंच सांगून टाकलं
उड्डाणपुलासाठी 86 कुटुंबांचे स्थलांतर, पण पर्यायी घरांचा मोठा प्रश्न!
Thakurli : उड्डाणपुलासाठी 86 कुटुंबांचे स्थलांतर, पण पर्यायी घरांचा मोठा प्रश्न! वाळवी, पाणी अन्.... रहिवाशांचा संताप
अंगारक चतुर्थीनिमित्त सिद्धिविनायक, दगडूशेठ मंदिराबाहेर भक्तांची गर्दी
Angarki Chaturthi : अंगारक संकष्टी चतुर्थीनिमित्त दर्शनासाठी रात्रीपासूनच भक्तांची गर्दी; सिद्धिविनायक अन् दगडूशेठ मंदिराबाहेर लांबच लांब रांगा
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक...
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक आयोगाला अंतिम मुदत
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी..
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी दरम्यान बावनकुळे संतापले
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्हणाले...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत जाहीर
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? रघुवंशींच्या विधानाने खळबळ
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं..
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं कारण काय?
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदार...
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदाराला फोन; नेत्याच्या उत्तराने सगळेच अवाक्