माधुरी दीक्षितचे सौंदर्य पाहून वेडा झाला हा प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता; एकही रुपया न घेता केला चित्रपट
बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षित यांच्या सौंदर्याने सर्वांनाच घायळ केलं आहे. माधुरीसाठी चाहते आजही वेडे आहेत . पण काही अभिनेते असे होते जे तिच्यासोबत काम करण्यासाठी उत्सुक असायचे. असाच एक अभिनेता ज्याने फक्त तिच्यासोबत काम करता यावं म्हणून एकही रुपया न घेता चित्रपट केला.

बॉलिवूडची सर्वात ग्लॅमरस अभिनेत्री धकधक गर्ल माधुरी दीक्षित नेहमीच तिच्या सौंदर्यासाठी आणि अभिनयासाठी चर्चेत असते. तिच्या अभिनयासोबतच तिच्या नृत्य आणि सौंदर्याने चाहत्यांना जास्त वेड लावलं आहे. अनेक चाहते माधुरी दीक्षितच्या सौंदर्याचेही वेडे झाले आहेत. फक्त चाहतेच नाही तर कलाकार देखील. असाच एक अभिनेता आहे ज्याने पहिल्यांदा माधुरीला पाहिलं आणि तो माधुरीचे सौंदर्य पाहूनच घायाळ झाला. त्याने माधुरीसोबत चित्रपट साईन केला आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्या अभिनेत्याने त्या चित्रपटासाठी कोणतेही शुल्क घेतले नाही. चला तर मग जाणून घेऊया तो अभिनेता कोण आहे?
माधुरी दीक्षितने 40 वर्षांपूर्वी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. चार दशकांपूर्वी तिने 1984 मध्ये आलेल्या ‘अबोध’ चित्रपटातून पदार्पण केले होतं. हा अभिनेता म्हणजे माधुरीच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला तिच्यासोबत काम करणारा अभिनेता शेखर सुमन आहे. दोघेही ‘मानव हत्या’ चित्रपटात दिसले होते. पण सुरुवातीला तो या चित्रपटात काम करण्यास तयार नव्हता.
माधुरीचे सौंदर्य पाहताच चित्रपट साइन केला
काही वर्षांपूर्वी, दैनिक भास्करशी झालेल्या संभाषणात, शेखर सुमन यांनी सांगितले होते की ‘मानव हत्या’ चित्रपटाचे दिग्दर्शक सुदर्शन के रतन यांनी त्यांना फोन केला होता. त्यांनी चित्रपटाची ऑफर दिली. पण, त्यांनी सांगितले की ते पैसे देऊ शकणार नाहीत. अभिनेत्याच्या मते, दिग्दर्शक त्यांना पैसे देत नव्हते आणि त्याशिवाय अभिनेत्री माधुरी दीक्षित देखील त्यावेळी नवीन होती.
shekhar suman Instagram
View this post on Instagram
माधुरीसाठी एकही रुपया न घेता चित्रपट केला
सुदर्शनने शेखरला सांगितले होते की ती अभिनेत्री नवीन आहे आणि तिने राजश्रीसोबत ‘अबोध’मध्ये काम केलं आहे. शेखर म्हणाला, “ते पैसे देणार नाहीत, अभिनेत्री अनुभवी नाही. मग मी हा चित्रपट कसा करू.” पण जेव्हा त्याने माधुरीला पाहिले तेव्हा त्याने लगेच आपला विचार बदलला. मग सुदर्शनने विचारले, “तू काम करशील का?” यावर अभिनेता म्हणाला, “ती सुंदर आहे, मी नक्कीच हा चित्रपट करेल” अशा पद्धतीने शेखरने हा चित्रपट फक्त माधुरीसाठीच केला ते देखील एकही रुपया न घेता.
माधुरी आणि अभिनेता एकाच बाईकवरून प्रवास करायचे.
चित्रपटाच्या वेळी माधुरी आणि शेखर दोघेही बॉलिवूडमध्ये पूर्णपणे नवीन होते. शेखरने सांगितले होते की मानव हत्येच्या चित्रीकरणादरम्यान तो आणि माधुरी एकाच बाईकवरून प्रवास करत असत. शेखरने सांगितले होते की त्यावेळी तो आणि माधुरी मुंबईच्या एकाच परिसरात राहत होते. अभिनेता माधुरीला घेण्यासाठी त्याच्या बाईकवरून तिच्या घरी जात असे आणि शूटिंगनंतर अभिनेत्रीला घरी सोडत असे. तसेच शेखने माधुरीसोबत काम करण्याचा अनुभवाबद्दलही कौतुक केलं.
