AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शाहरुख खान पार्टीमध्ये सर्वांसमोर गौरीवर ओरडला? व्हिडीओ पाहून चाहते नाराज

नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरच्या उद्घाटन कार्यक्रमात शाहरुखनेही 'पठाण'मधील गाण्यावर ठेका धरला होता. यावेळी त्याच्यासोबत रणवीर सिंग आणि वरुण धवन यांनीसुद्धा डान्स केला. वडिलांना स्टेजवर परफॉर्म करताना पाहून मुलगा आर्यन खान खुश झाला होता.

शाहरुख खान पार्टीमध्ये सर्वांसमोर गौरीवर ओरडला? व्हिडीओ पाहून चाहते नाराज
Shah Rukh Khan and Gauri Khan Image Credit source: Instagram
| Updated on: Apr 05, 2023 | 3:37 PM
Share

मुंबई : गेल्या काही दिवसांत नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरच्या उद्घाटन कार्यक्रमाची जोरदार चर्चा होती. देशभरातील नामांकित सेलिब्रिटींसह परदेशातील लोकप्रिय कलाकारसुद्धा या कार्यक्रमात सहभागी झाले होते. सेलिब्रिटींची मांदियाळी आणि त्यांचा ग्लॅमरस अंदाज यांमुळे कल्चरल सेंटरच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाने सर्वांचं लक्ष वेधलं होतं. या कार्यक्रमातील विविध फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यापैकीच एक व्हिडीओ शाहरुख खान आणि त्याची पत्नी गौरी खान यांचा आहे. या व्हिडीओमध्ये जे दिसतंय, ते पाहून शाहरुख आणि गौरीदरम्यान काहीतरी बिनसल्याची चर्चा सुरू झाली आहे.

शाहरुख आणि गौरीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. एकीकडे प्रियांचा चोप्रा आणि रणवीर सिंग हे स्टेजवर परफॉर्म करत असतात. तर दुसरीकडे स्टेजसमोर उभे असलेले शाहरुख आणि गौरी एकमेकांशी काहीतरी बोलताना दिसत आहेत. स्टेजसमोर उभी असलेली गौरी ही प्रियांका आणि रणवीरचा परफॉर्मन्स एंजॉय करत असते. मात्र तितक्यात शाहरुख तिच्याजवळ काहीतरी बोलू लागतो. गौरीसोबत बोलताना तो नाराज झाल्याचं दिसून येत आहे. अचानक तो तिथून जाऊ लागतो, तेव्हा गौरी त्याला थांबवून पुन्हा काहीतरी बोलू लागते. या व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या विविध प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. शाहरुख दारूच्या नशेत गौरीवर चिडला होता, असंही काहींनी म्हटलंय.

पहा व्हिडीओ

View this post on Instagram

A post shared by SRK VIBE (@srkvibe2.0)

नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरच्या उद्घाटन कार्यक्रमात शाहरुखनेही ‘पठाण’मधील गाण्यावर ठेका धरला होता. यावेळी त्याच्यासोबत रणवीर सिंग आणि वरुण धवन यांनीसुद्धा डान्स केला. वडिलांना स्टेजवर परफॉर्म करताना पाहून मुलगा आर्यन खान खुश झाला होता. त्याचाही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

NMACC लाँच कार्यक्रमात शाहरुख खान, गौरी खान, प्रियांका चोप्रा, रणवीर सिंग, सोनम कपूर, सलमान खान, हृतिक रोशन, अनुष्का शर्मा यांच्यासह टॉम होलँड, झेंडाया, गिगी हदिद, पेनेलोपे क्रूझ हे जगप्रसिद्ध सेलिब्रिटीसुद्धा सहभागी झाले होते. या कार्यक्रमातील शाहरुख खान आणि जगप्रसिद्ध सुपरमॉडेल गिगी हदिद यांच्याही फोटोने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं. या फोटोवर नेटकऱ्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव झाला. आणखी एका फोटोमध्ये सलमान खान आणि शाहरुख खान एकत्र दिसले. यांच्यासोबत हॉलिवूड अभिनेता आणि ‘स्पायडर मॅन’ फेम टॉम होलँड, अभिनेत्री झेंडाया यांनीसुद्धा फोटोसाठी पोज दिले. विशेष म्हणजे या फोटोच्या बॅकग्राऊंडमध्ये अभिनेत्री ऐश्वर्या रायसुद्धा पहायला मिळाली.

पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?.
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.