Shah Rukh Khan : दिवाळीच्या मुहूर्तावर किंग खान कडून चाहत्यांना मोठं गिफ्ट
Shah Rukh Khan : दिवाळीच्या मुहूर्तावर अभिनेता शाहरुख खान याने चाहत्यांना दिलं मोठं गिफ्ट, चाहत्यांचा उत्साह पोहोचला शिगेला.., सोशल मीडियावर फक्त आणि फक्त शाहरुख खान याची चर्चा... चाहत्यांमध्ये देखील उत्साहाचं वातावरण...

मुंबई | 11 नोव्हेंबर 2023 : बॉलिवूडचा किंग खान अर्थातच अभिनेता शाहरुख खान याच्याबद्दल अनेक गोष्टी जाणून घेण्यासाठी चाहते कायम उत्सुक असतात. आता देखील किंग खान याच्याबद्दल मोठी माहिती समोर येत आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर शाहरुख खान याने चाहत्यांना मोठं गिफ्ट दिलं आहे. शाहरुख खान स्टारर ‘डंकी’ सिनेमा लवकरच मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. सिनेमात शाहरुख खान याच्यासोबत अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री तापसी पन्नू देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. काही दिवसांपूर्वी सिनेमाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला.
किंग खान ‘डंकी’ सिनेमाचे अपडेट सतत चाहत्यांसोबत शेअर करताना दिसत आहे. अशात दिवाळीच्या मुहूर्तावर शाहरुख खान याने सिनेमचा आणखी एक पोस्ट सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर केला आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेत्याने शेअर केलेल्या पोस्टरची चर्चा सुरु आहे.
शाहरुख खान इन्स्टाग्रामवर ‘डंकी’ सिनेमाचा पोस्टर शेअर करत म्हणाला, ‘असं कुटुंब सोबत नसताना दिवाळी कशी साजरी होईल आणि कसा साजरा होणार न्य ईयर? खरा आनंद तर एकत्र चालण्यात आहे, सोबत राहाण्यात आणि आनंद साजरा करण्यात आहे.. ‘डंकी’चं संपूर्ण जग आहे…उल्लू दे पट्ठे!’
View this post on Instagram
एवढंच नाही सिनेमा 25 डिसेंबरच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार असल्याची माहिती देखील किंग खान याने चाहत्यांना दिली. शाहरुख खान स्टारर ‘डंकी’ सिनेमा 25 डिसेंबर रोजी संपूर्ण जगभरात प्रदर्शित होणार आहे. चाहते देखील किंग खान याच्या आगामी सिनेमाच्या प्रतीक्षेत आहेत.
सोशल मीडियावर सध्या फक्त आणि फक्त मल्टी स्टारर ‘डंकी’ सिनेमाच्या नव्या पोस्टरची चर्चा रंगली आहे. चाहते देखील पोस्टरवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आनंद व्यक्त करत आहेत. शाहरुख याला पुन्हा मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.
शाहरुख खान याच्याबद्दल सांगायचं झालं तर, वर्षाच्या सुरुवातील म्हणजे 25 जानेवारी रोजी किंग खान याचा ‘पठाण’ सिनेमा प्रदर्शित झाला. सिनेमाने प्रदर्शित होताच तीन दिवसांत अनेक रेकॉर्ड मोडले. फक्त भारतात नाही तर, जगभरात सिनेमाने तुफान कमाई केली.
‘जवान’ सिनेमाला देखील चाहत्यांनी भरभरुन प्रेम दिलं. ‘जवान’ सिनेमाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड रचला. शाहरुख खान याच्या ‘पठाण’, ‘जवान’ सिनेमानंतर चाहते ‘डंकी’ सिनेमाला किती प्रेम देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
