AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Adipurush | ‘आदिपुरुष’वर भारी पडला ‘स्वदेस’मधील रामायणाचा सीन; नेटकरी म्हणाले ‘500 कोटींपेक्षा ही 50 सेकंद उत्तम’

आदिपुरुष हा चित्रपट प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवसापासून वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. यातील बऱ्याच सीन्सवर आणि डायलॉग्सवर नेटकऱ्यांनी आक्षेप घेतला आहे. छत्तीसगडमधील मनेंद्रगड-चिरमिरी-भरतपूर जिल्ह्यात चित्रपटाच्या प्रदर्शनावर देशभरात बंदी घालण्याच्या मागणीसाठी आंदोलन करण्यात आलं.

Adipurush | 'आदिपुरुष'वर भारी पडला 'स्वदेस'मधील रामायणाचा सीन; नेटकरी म्हणाले '500 कोटींपेक्षा ही 50 सेकंद उत्तम'
Swades Ramayan SceneImage Credit source: Youtube
| Updated on: Jun 18, 2023 | 12:47 PM
Share

मुंबई : ‘आदिपुरुष’ हा चित्रपट पाहिल्यानंतर रामायणसारख्या महाकाव्याला न्याय देण्यासाठी दिग्दर्शक ओम राऊत आणि चित्रपटाच्या टीममधील इतर मंडळी समर्थ नसल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली. इतकंच नव्हे तर रामायण कसं दाखवू नये, याचं मूर्तिमंत उदाहरण ‘आदिपुरुष’ या चित्रपटाच्या माध्यमातून पहायला मिळाल्याचीही टीका काहींनी केली. गेल्या काही दिवसांपासून प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाची प्रचंड उत्सुकता होती. मात्र थिएटरमधून हे प्रेक्षक निराश होऊन बाहेर पडले आणि सोशल मीडियावर त्यांनी नाराजी बोलून दाखवली. या सर्व टीकांदरम्यान अभिनेता शाहरुख खानच्या ‘स्वदेस’ या चित्रपटातील रामायणाचा सीन तुफान व्हायरल होत आहे.

आशुतोष गोवारिकर दिग्दर्शित ‘स्वदेस’ या चित्रपटात शाहरुख खान आणि गायत्री जोशीने मुख्य भूमिका साकारल्या होत्या. 2004 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात रामायणाचा एक सीन चित्रित करण्यात आला होता. या सीनमध्ये शाहरुख खान हा राम लीलाच्या कार्यक्रमादरम्यान एका गाण्याच्या स्वरुपात रामायण समजावून सांगताना दिसत आहे. हा सीन ट्विटरवर अनेकांनी शेअर केला असून ‘आदिपुरुष’ चित्रपटापेक्षा हा काही सेकंदांचा सीन उत्तम असल्याचं अनेकांनी म्हटलंय.

‘ओम राऊत यांच्या आदिपुरुषपेक्षा स्वदेसने रामायण योग्य प्रकारे सादर केलं होतं’, असं एका युजरने लिहिलं. तर ‘या गाण्यातून रामायणाचं अधिक चांगलं, प्रामाणिक आणि सांस्कृतिक सादरीकरण केलं गेलंय’, असं दुसऱ्याने म्हटलंय. या क्लिपमधअये शाहरुख खान हा प्रभू श्रीराम यांचा अर्थ समजावून सांगताना दिसत आहे. तर अभिनेत्री गायत्री जोशी ही सीतेच्या भूमिकेत आहे. रामायणाचं हे वर्णन ऐकून गावकरीही भावूक झाल्याचं पहायला मिळतं. ‘या 50 सेकंदांच्या क्लिपची क्वालिटी ही 500 कोटी रुपयांच्या आदिपुरुषपेक्षाही भारी आहे’, अशा शब्दांत नेटकऱ्यांनी कौतुक केलं आहे.

‘आदिपुरुष’ हा चित्रपट 16 जून रोजी प्रदर्शित झाला. यामध्ये अभिनेता प्रभास, क्रिती सनॉन, सैफ अली खान, सनी सिंह आणि देवदत्त नागे यांच्या भूमिका आहेत. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी या चित्रपटाने दमदार कमाई केली. पहिल्या दिवशी जगभरातील कमाईचा आकडा तब्बल 140 कोटी रुपये इतके होता. तर दुसऱ्या दिवशी 65 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे.

आदिपुरुष हा चित्रपट प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवसापासून वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. यातील बऱ्याच सीन्सवर आणि डायलॉग्सवर नेटकऱ्यांनी आक्षेप घेतला आहे. छत्तीसगडमधील मनेंद्रगड-चिरमिरी-भरतपूर जिल्ह्यात चित्रपटाच्या प्रदर्शनावर देशभरात बंदी घालण्याच्या मागणीसाठी आंदोलन करण्यात आलं. मात्र असं असूनही या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर गेल्या दोन दिवसांत चांगली कामगिरी केली आहे.

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.