AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘शाहरुखवर इतकं प्रेम होतं की बहिणीची भूमिका नाकारली’, 31 वर्षांनंतर अभिनेत्रीचा मोठा खुलासा

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानवर प्रचंड प्रेम करत होती ही अभिनेत्री. शाहरुखच्या बहिणीची भूमिका करण्यास अभिनेत्रीने थेट दिलेला नकार. कोण आहे ती अभिनेत्री?

'शाहरुखवर इतकं प्रेम होतं की बहिणीची भूमिका नाकारली', 31 वर्षांनंतर अभिनेत्रीचा मोठा खुलासा
| Updated on: Jun 29, 2026 | 5:51 PM
Share

बॉलिवूडचा ‘किंग खान’ म्हणून ओळखला जाणारा शाहरुख खान आजही लाखो चाहत्यांच्या हृदयावर राज्य करतो. त्याच्या अभिनयाची, व्यक्तिमत्त्वाची आणि मोहक शैलीची भुरळ केवळ प्रेक्षकांनाच नाही तर अनेक अभिनेत्रींनाही पडली होती. अशाच एका अभिनेत्रीने तब्बल 31 वर्षांनंतर एक रंजक आणि धक्कादायक किस्सा उघड केला आहे. शाहरुखच्या प्रेमात इतकी वेडी झालेली ही अभिनेत्री त्याची ऑनस्क्रीन बहीण बनण्यास तयारच नव्हती.

ही अभिनेत्री म्हणजे सादिया सिद्दीकी. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने 1994 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘कभी हां कभी ना’ चित्रपटाशी संबंधित हा किस्सा सांगितला.

‘कभी हां कभी ना’च्या वेळी घडला होता प्रसंग

सादिया सिद्दीकी नुकतीच सिद्धार्थ कन्नन यांच्या पॉडकास्टमध्ये सहभागी झाली होती. या संवादादरम्यान तिने सांगितले की, ‘कभी हां कभी ना’ या चित्रपटासाठी सुरुवातीला तिला शाहरुख खानच्या बहिणीची भूमिका ऑफर करण्यात आली होती. मात्र ती भूमिका स्वीकारण्यास तिने स्पष्ट नकार दिला. त्यामागचे कारण विचारले असता सादियाने दिलेले उत्तर ऐकून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.

सादियाने सांगितले की, त्या काळात ती शाहरुख खानवर प्रचंड प्रेम करत होती. त्याच्याविषयी तिच्या मनात विशेष भावना होत्या. त्यामुळे पडद्यावर त्याची बहीण बनण्याची कल्पनाही तिला सहन होत नव्हती. ती म्हणाली, मी शाहरुख खानच्या प्रेमात होते. त्यामुळे त्याची बहीण बनण्याचा विचारही करू शकत नव्हते. मला त्याची प्रेयसी बनायचं होतं, बहीण नाही.

अखेर बहिणीची भूमिका स्वीकारली

दिग्दर्शकांनी दुसरा कोणताही पर्याय न दिल्याने सादियाने अखेर शाहरुख खानच्या बहिणीची भूमिका स्वीकारली. चित्रपटात तिच्या अभिनयाचे अनेक प्रेक्षकांनी भरभरून कौतुक केले आणि ही भूमिका आजही अनेकांच्या लक्षात आहे.

तब्बल तीन दशकांनंतर सादिया सिद्दीकीने हा किस्सा सांगितल्यानंतर शाहरुख खानच्या चाहत्यांमध्येही त्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. त्या काळात शाहरुख खानच्या लोकप्रियतेची जादू केवळ प्रेक्षकांवरच नाही तर त्याच्यासोबत काम करणाऱ्या कलाकारांवरही किती प्रभावी होती याची ही आठवण ठरली आहे.

Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा