‘याचा चेहरा तर माकडासारखा आहे….’; शाहरुखच्या आईला तोंडावरच म्हणाली होती ही अभिनेत्री
आज बॉलिवूडवर राज्य करणाऱ्या शाहरूखला एक प्रसिद्ध अभिनेत्री थेट माकड बोलली होती आणि तेही त्याच्या आईसमोर. तुमच्या मुलाचा चेहरा माकडासारखा असल्याचं अभिनेत्रीने म्हटलं होतं. कोण होती ती अभिनेत्री?

बॉलीवूडमध्ये स्टार होण्यापूर्वी, शाहरुख खानने टीव्ही मालिका केल्या आहेत. त्यातील एक मालिका म्हणजे 1988 मध्ये आलेली ‘फौजी’. ‘फौजी’मध्ये किरण कोचरची भूमिका साकारणाऱ्या अमिना शेरवानीने अलीकडेच खुलासा केला की शाहरुखला त्याच्या वाईट दिसण्यामुळे ही भूमिका मिळाली होती. होय जो शाहरूख खान आता करोडो लोकांच्या मनावर राज्य करतो आणि मुली ज्याच्यासाठी वेड्या आहेत त्याच शाहरूखबद्दल एक अभिनेत्री थेट त्याच्या आईला म्हणाली होती की याचा चेहरा तर माकडासारखा आहे. या अभिनेत्रीने नुकताच एका पॉडकास्टमध्ये खुलासा केला आहे.
शाहरुखला त्याच्या वाईट दिसण्यामुळे भूमिका मिळाली
ही अभिनेत्री म्हणजे ‘फौजी’मध्ये किरण कोचरची भूमिका साकारणाऱ्या अमिना शेरवानी. त्यांनी खुलासा केला की शाहरुखला त्याच्या वाईट दिसण्यामुळे ही भूमिका मिळाली आहे. पण पॉडकास्टमध्ये, अमिना म्हणाल्या की शाहरुख कधीही शोमध्ये येणार नव्हता. परंतु त्याच्या आईशी झालेल्या संभाषणानंतर परिस्थिती बदलली.
अमिना म्हणाल्या की, ‘त्याच्या आईने मला फोन केला. लतीफ फातिमा यांनी… ती एक खूप छान महिला होती. तिने मला सांगितले की तुम्ही लोक फौजीसाठी कास्टिंग करत आहात आणि माझा एक खूप देखणा मुलगा आहे. मी त्यांना म्हटलं की आंटी जर तुमचा मुलगा देखणा असेल तर त्याला संधी नाही. कारण आपल्या भारतीय चित्रपट उद्योगाची खासियत अशी आहे की आपल्या महिलांना अभिनेत्री होण्यासाठी खूप सुंदर असले पाहिजे. पण जर तो मुलगा माकडासारखा दिसत असेल, जर तो जिराफसारखा दिसत असेल तर ठिक आहे. पण जर तुमचा मुलगा देखणा असेल तर त्याला दुसरे करिअर करायला सांगा. मग त्या म्हणाली की माझा मुलगा खूप देखणा आहे. मग मी त्यांना म्हणाले की आंटी, मग तुम्ही तुमचा वेळ वाया घालवू नका.”
शाहरूखला माकड म्हणताच त्याची आई चिडली
अमिना पुढे म्हणाल्या ‘शाहरूखच्या आईने माझं अजिबात काही ऐकलं नाही. त्यांनी शाहरुखला पाठवलं. मी शाहरुखला पाहताच आंटीला फोन केला आणि अभिनंदन केलं, तुमचा मुलगा अगदी माकडासारखा दिसतो. तो खूप यशस्वी हिरो बनू शकतो. यावर शाहरुखच्या आई चिडल्या तेव्हा मी त्यांना समजावून सांगितलं की त्याचा चेहरा माकडासारखा म्हणजे भावपूर्ण जसं की एक्सप्रेसिव आहे. तुम्हाला कोणी सांगितले की माकडांचं रूप चांगलं नसतं.’
View this post on Instagram
अमिना शाहरूखला तोंडावर बोलल्या तू माकडासारखा आहे
त्यानंतर अमिना शाहरूखला बोलल्या तू माकडासारखा आहे. त्यावर शाहरुखनेही लगेच उत्तर दिले की तूपण माकडीणीसारखीच दिसतेस. त्या शाहरूखला म्हणाल्या “मी माकडासारखी दिसते पण मी एक स्त्री आहे. मी चित्रपट क्षेत्रात कधीही यशस्वी होऊ शकत नाही. महिलांना बाहुल्यासारखे दिसावं लागतं.”
अनेक मालिकांमध्ये शाहरूखने काम केलं
शाहरुखने थिएटरमध्ये काम केल्यानंतर टीव्हीमध्ये काम करण्यास सुरुवात केली. 1988 मध्ये लेख टंडनची टेलिव्हिजन मालिका ‘दिल दरिया’ हा शाहरुख खानचा पहिला टीव्ही शो होता परंतु निर्मितीला उशीर झाल्यामुळे राज कुमार कपूरची मालिका ‘फौजी’ हा त्याचा टीव्ही डेब्यू ठरला. त्यानंतर, त्याने अझीझ मिर्झाची टेलिव्हिजन मालिका ‘सर्कस’ आणि मणि कौलच्या मिनी मालिका ‘इडियट’ मध्येही काम केलं आहे. याशिवाय अनेक मालिकांमध्ये छोटे-मोठे रोल केले आहेत. दोन वर्ष टीव्हीवर काम केल्यानंतर शाहरुखने चित्रपटांमध्ये काम करण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर तो दिल्लीहून मुंबईला गेला.आणि आज तो संपूर्ण बॉलिवूडवर राज्य करत आहे.
