पंजाबमधील पूरस्थिती पाहून लोकांसाठी किंग खानची प्रार्थना, पण नेटकऱ्यांनी मात्र वेगळंच सुनावलं, म्हणाले ‘फक्त प्रार्थना…’
पंजाबमधील पूरपरिस्थिती पाहून सामान्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी मदतीसाठी हात पुढे केला आहे. आता शाहरूखनेही त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत . त्याने त्या परिस्थितीबाबत आणि तेथील नागरिकांसाठी पार्थना केली आहे. पण त्याने ट्वीट करताच नेटकऱ्यांनी मात्र त्याला चांगलंच सुनावलं.

दिल्लीमध्ये मुसळधार पाऊस सुरु असून पूरस्थिती निर्माण झाली आहे. आणि फक्त दिल्लीच नाही तर हिमाचल आणि काश्मीरपर्यंत देशभरातील अनेक राज्यांमध्ये पुरामुळे कहर झाला आहे. तसेच पंजाबमध्ये देखील अशीच परिस्थिती आहे. पंजाबमधील अनेक जिल्ह्यांमध्ये भयानक पूर आला आहे ज्यामुळे मोठ्या संख्येने लोकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या सर्व राज्यांची परिस्थिती पाहून सामान्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत सर्वांनीच तेथील नागरिकांसाठी प्रार्थना केली आहे. कपिल शर्माने देखील पंजाबची पावसामुळे झालेली ती परिस्थिती पाहून दु:ख व्यक्त केलं होतं. तसेच अनेक पंजाबी गायक , . मिका सिंगपासून ते दिलजीत दोसांझ आणि एमी विर्कपर्यंत सर्वजण मदतीसाठी पुढे आले.
पंजाबमधील पुरावर शाहरुख खान बोलला
आता या शाहरुख खानही पुढे आला आहे. त्याने पंजाबमधील पुरामुळे त्रस्त लोकांसाठी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. तसेच त्याने प्रार्थनाही केली आहे. शाहरुख खानने इंस्टाग्रामवर एक पोस्ट लिहिली आणि पंजाबच्या स्थितीबद्दल दुःख व्यक्त केले. त्याने लिहिले की, ‘पंजाबमधील या विनाशकारी पुरामुळे अनेक लोकांच्या जीवनावर परिणाम झाला आहे. माझ्या संवेदना सर्वांसोबत आहेत. मी प्रार्थना करतो आणि धैर्य देतो. पंजाबची ताकद कधीही तुटणार नाही. देव सर्वांना आशीर्वाद देवो.’
My heart goes out to those in Punjab impacted by these devastating floods. Sending prayers and strength… The spirit of Punjab shall never break… may God bless them all.
— Shah Rukh Khan (@iamsrk) September 3, 2025
युजर्सने शाहरूख खानला का सुनावलं?
शाहरुख खानच्या या पोस्टनंतर काही युजर्सने किंग खानकडून मदतिची अपेक्षा केली आहे. काही, वापरकर्त्यांनी म्हटले आहे ‘ तुम्हीही काहीतरी दान करा.’ त्याच वेळी, काही लोकांनी म्हटले की “जम्मू, हिमाचल आणि संपूर्ण भारतात पूर आला आहे. खान साहेब, तिथेही काहीतरी दान करा.” एका वापरकर्त्याने शाहरुख खानला पाठिंबा देत म्हटलं की लोक शाहरुख खानकडून देणगी का मागत आहेत. त्याऐवजी, अधिकाऱ्यांना विचारा” असं म्हणत त्याने इतरांना फटकारलं आहे. दरम्यान शाहरूख खानच्या टीमकडून किंवा त्याच्याकडून अद्याप यावर काहीही उत्तर आलेलं नाही.
अनेक सेलिब्रिटी मदतीसाठी पुढे आलेत
एमी विर्क स्वतः पंजाबला जाऊन तो पुरात अडकलेल्या लोकांना मदत करताना दिसत आहे. दिलजीत दोसांझने 10 गावे दत्तक घेतली आहेत. याशिवाय, मिका सिंगची टीम पंजाबमध्ये सतत सक्रिय आहे आणि लोकांना बचावकार्यापासून मदत करत आहे.
