AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शाहरुख खानने शेअर केला खासगी व्हिडीओ, पासवर्डशिवाय उघडणार नाही, जाणून घ्या कसा पाहाता येईल

बॉलिवूडचा बादशहा शाहरुख खान आणि आर्यन खान यांनी इन्स्टाग्रामच्या नवीन फीचरसह ‘द बॅड्स ऑफ बॉलिवूड’ या सीरिजचा एक बीटीएस (बिहाइंड द सीन) व्हिडीओ पोस्ट केला आहे. हा खासगी व्हिडीओ पाहण्यासाठी तुम्हालाही ट्रीक वापरावी लागेल.

शाहरुख खानने शेअर केला खासगी व्हिडीओ, पासवर्डशिवाय उघडणार नाही, जाणून घ्या कसा पाहाता येईल
Aryan Shahrukh KhanImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Oct 14, 2025 | 6:19 PM
Share

बॉलिवूडचा किंग शाहरुख खान आपल्या चित्रपटांद्वारे लाखो चाहत्यांच्या मनावर राज्य करताना दिसत आहे. आता त्याचा मुलगा आर्यन खान देखील त्याच्या पावलावर पाऊल टाकत आहे. आर्यन खान दिग्दर्शित पहिली सीरिज ‘द बॅड्स ऑफ बॉलिवूड’ काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाली आहे. नुकतेच शाहरुख खानने आर्यनच्या सीरिजचा एक बिहाइंड द सीन व्हिडीओ शेअर केला, ज्यामुळे चाहते या तरुण चित्रपट निर्मात्याच्या कामाचे कौतुक करत आहेत. मात्र, त्यांनी हा व्हिडीओ नवीन अंदाजात शेअर केला आहे.

शाहरुखने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओला पासवर्डशिवाय पाहता येणार नाही. खरे तर, हे इन्स्टाग्रामचे एक नवे फीचर आहे, ज्यामध्ये युजर गुप्त कोडसह पोस्ट शेअर करू शकतो. तसेच, भारतात हे फीचर यापूर्वी कधीही वापरले गेले नव्हते. अहवालांनुसार, मेटासोबत मिळून शाहरुख खानने हे फीचर भारतात लॉन्च केले आहे.

वाचा: साराच्या बर्थडेच्या दिवशी सानियाने असं काही केलं की… अर्जुनही झाला आवाक!

View this post on Instagram

A post shared by Shah Rukh Khan (@iamsrk)

शाहरुखच्या या खासगी पोस्टमध्ये काय आहे?

शाहरुख खानने आर्यनसोबत सोमवारी एक कोलॅबोरेशन पोस्ट शेअर केली. त्यात लिहिले आहे, “एसआरकेची ही रील अनलॉक करा.” पोस्टमध्ये गुप्त कोड ओळखण्यासाठी चाहत्यांना एक मेसेज देखील देण्यात आला आहे. त्यात लिहिले आहे की, “एपिसोड 6 च्या 4.22 सेकंदावर पाहा.” म्हणजेच या सीरिजच्या या एपिसोडमध्ये पासवर्ड लपलेला आहे.

ही पोस्ट शेअर करताना त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, “एपिसोड्स तर खूप आहेत, पण बिहाइंड द सीन फक्त एकच.” म्हणजेच जो चाहता हा कोड ओळखून पोस्ट उघडण्यात यशस्वी होईल, त्याला खास बिहाइंड द सीन रील पाहायला मिळेल. या कोडशिवाय हे रिल्स कोणालाही पाहाता येणार नाही.

शाहरुखची ही खासगी रील कशी पाहाल?

शाहरुखने आपल्या पोस्टमध्ये एक मेसेज दिला आहे, ज्यामध्ये लिहिले आहे, “एपिसोड 6 च्या 4.22 सेकंदावर पाहा.” हा संकेत फॉलो केल्यावर एक सीन दिसतो, ज्यामध्ये शाहरुख रजत बेदीच्या पात्राशी बोलताना दिसतो आणि म्हणतो, “जराज, बरोबर ना?” लपलेल्या रीलपर्यंत पोहोचण्याचा पासवर्ड आहे ‘Jaraj’.

द बॅड्स ऑफ बॉलिवूड’ कधी रिलीज झाली?

‘द बॅड्स ऑफ बॉलिवूड’ या सीरिजचे दिग्दर्शन आणि लेखन आर्यन खानने केले आहे. या मालिकेत लक्ष्य लालवानी, सहर बांबा, राघव जुयाल, बॉबी देओल, मनोज पाहवा, अरशद वारसी, मोना सिंह आणि रजत बेदी यांसारखे अनेक कलाकार दिसले आहेत. या मालिकेत शाहरुख खान, सलमान खान, इमरान हाशमी, आमिर खान, रणबीर कपूर यांसारख्या तार्‍यांचे कॅमियो देखील आहेत. ही सीरिज 18 सप्टेंबरला नेटफ्लिक्सवर रिलीज झाली आहे. रिलीज झाल्यापासून ही मालिका सतत चर्चेत आहे.

मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.