AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aryan Khan | शाहरुखच्या मुलाचा व्हिडीओ पाहून भडकले नेटकरी; म्हणाले “कसला इतका ॲटिट्यूड?”

ड्रग्ज प्रकरणात आर्यनचं नाव समोर आल्यापासून तो नेहमीच सोशल मीडियावर प्रकाशझोतात असतो. व्हायरल झालेल्या या व्हिडीओमधील आर्यनची वागणूक पाहून नेटकऱ्यांनी त्याच्यावर टीका केली आहे.

Aryan Khan | शाहरुखच्या मुलाचा व्हिडीओ पाहून भडकले नेटकरी; म्हणाले कसला इतका ॲटिट्यूड?
Aryan KhanImage Credit source: Instagram
| Updated on: Feb 20, 2023 | 11:34 AM
Share

मुंबई : बॉलिवूडचा किंग अर्थात अभिनेता शाहरुख खान सध्या त्याच्या ‘पठाण’ या चित्रपटामुळे खूप चर्चेत आहे. या चित्रपटाने देशभरात 500 कोटी रुपयांची कमाई केली आहे. केवळ चित्रपटामुळेच नाही तर शाहरुख नेहमीच त्याच्या विनम्र स्वभावामुळेही ओळखला जातो. मन्नत बाहेर जमलेली चाहत्यांची गर्दी असो किंवा मग पापाराझी.. शाहरुख नेहमीच त्यांच्याशी प्रेमळपणे वागताना दिसतो. मात्र आता त्याचा मुलगा आर्यन खान सध्या सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. ड्रग्ज प्रकरणात आर्यनचं नाव समोर आल्यापासून तो नेहमीच सोशल मीडियावर प्रकाशझोतात असतो. व्हायरल झालेल्या या व्हिडीओमधील आर्यनची वागणूक पाहून नेटकऱ्यांनी त्याच्यावर टीका केली आहे.

या व्हिडीओमध्ये आर्यन त्याच्या गाडीतून उतरताना दिसत आहे. त्याठिकाणी पापाराझी त्याला फोटोसाठी थांबण्याची विनंती करतात. मात्र आर्यन त्यांचं न ऐकताच पुढे निघून जातो. कॅमेरासमोरून तो स्टाफसोबत पुढे जातो. या व्हिडीओतील त्याची वागणूक पाहून नेटकरी भडकले आहेत.

‘याला इतका कसला ॲटिट्यूड आहे’, असं एकाने लिहिलं. तर ‘शाहरुखने मीडियासमोर काहीही बोलण्यास नकार दिला असेल’, असं दुसऱ्या युजरने म्हटलंय. ‘वडिलांचे पैसे खर्च करण्याशिवाय आणि पार्ट्यांमध्ये जाण्याशिवाय हा करतो तरी काय’, असंही नेटकऱ्यांनी सुनावलंय.

वडिलांच्या पावलांवर पाऊल टाकत आर्यनसुद्धा फिल्म इंडस्ट्रीतच करिअर करणार आहे. मात्र त्याला अभिनयात फारसा रस नाही. आर्यनची आवड फिल्ममेकिंग आणि क्रिएटिव्ह कामात अधिक आहे. लेखक म्हणून तो एका वेब सीरिजच्या माध्यमातून करिअरची सुरुवात करणार आहे. लेखक म्हणून बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याआधी आर्यन हा शाहरुखच्या विविध प्रोजेक्ट्समध्ये मदत करत होता. यावर्षी त्याने बहीण सुहाना खानसोबत दुबईत पार पडलेल्या इंटरनॅशनल लीग टी-20 ट्रॉफी लाँचलाही हजेरी लावली होती.

आर्यनने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत त्याच्या नव्या प्रोजेक्टची माहिती दिली होती. ‘लेखनाचं काम पूर्ण झालं, आता ॲक्शन म्हणण्यासाठी उत्सुक आहे’, असं कॅप्शन आर्यनने या फोटोला दिलं होतं. मात्र त्याच्या या चित्रपटात कोणते कलाकार असणार याबद्दलची माहिती अद्याप समोर आली नाही.

गेल्या वर्षी ड्रग्ज प्रकरणामुळे आर्यनला अटक झाली होती. बरेच दिवस तुरुंगात राहिल्यानंतर त्याची जामिनावर सुटका झाली. या प्रकरणी त्याला आता क्लीन चिटही मिळाली आहे.

पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?.
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.