शाहरुख खानही मानतो ही अंधश्रद्धा; म्हणाला, “ही गोष्ट केली चित्रपट हिट होतोच”
आपला चित्रपच हिट होण्यासाठी सेलिब्रिटी चित्रपट रिलीजआधी देव दर्शनाला जातात. किंवा काहीजण प्रमोशनमसाठी जोर लावतात. तशीच शाहरूखची देखील एको गोष्टीवर श्रद्धा आहे. तो एका गोष्टीला फार मानतो. चित्रपटात ती एक गोष्ट केली चित्रपट हिट होतोच असं त्याचं म्हणणं आहे.

बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानने त्याच्या कारकिर्दीत अनेक हिट चित्रपट दिले आहेत, ज्याच्या मागे नक्कीच त्याची कठोर मेहनत आहे. पण कुठेतरी तो एक गोष्ट नक्कीच मानतो की ज्यामुळे चित्रपट यशस्वी होतो. त्याच्यामते जेव्ह जेव्हा तो चित्रपटात ती गोष्ट करतो तेव्हा तो चित्रपट नक्कीच हिट होतो.
1997 मध्ये प्रदर्शित झालेल्या राकेश रोशन दिग्दर्शित ‘कोयला’ चित्रपटाबाबतही असेच काहीसे घडले. कोयला हा 90 च्या दशकातील सुपरहिट चित्रपटांपैकी एक आहे. राकेश रोशन यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट शाहरुख खान , माधुरी दीक्षित, अमरीश पुरी आणि जॉनी लिव्हर यांच्यासह अनेक मोठ्या कलाकारांनी महत्त्वाच्या भूमिका केल्या होत्या. हा अॅक्शन थ्रिलर चित्रपट बॉक्स ऑफिसवरही यशस्वी झाला आणि यामागील कारण त्याचं कारणही शाहरूखने तेच सांगितले होते.
शाहरुख खानच्या गुडघ्याला जबर दुखापत झाली होती
शाहरुख खानने कोयलाच्या पडद्यामागील कहाणी सांगितली. त्याने चित्रपटाच्या शूटिंगला एक दुःस्वप्न म्हटले आणि तो पुन्हा कधीही अशी कृती करणार नाही असेही तो म्हणाला. ‘देखा तुझे तो’ या गाण्याच्या शूटिंग दरम्यान त्याच्या गुडघ्यालाही दुखापत झाली. शाहरुख खान म्हणाला, “आयुष्यात नेहमीच असा चित्रपट करण्याची माझी महत्त्वाकांक्षा होती ज्यामध्ये फ्रेम थांबते आणि इथेच शाहरुखला दुखापत झाली. या गाण्यात मी हवेत उडी मारतो. राकेश जी मला थांबवतील की नाही हे मला माहित नव्हतं. पण असं करताच मी जमिनीवर पडलो आणि माझ्या गुडघ्याला दुखापत झाली.”
माधुरी आणि शाहरूख थरथर कापत होते.
शाहरूख ने प्रसंग सांगत म्हणाला “सकाळी 5.30 वाजता राकेश रोशन उठून सांगत असत की मी नुकताच झोपलो असलो तरी जाण्यासाठी तयार व्हा.” शाहरूख त्यासाठी सेटवरच झोपायचा. शाहरुखने सांगितले की चित्रपटाचे चित्रीकरण हैदराबाद ते उटी येथे झाले होते. तिथे खूप थंडी होती. शून्य तापमान होते आणि धबधब्याच्या आत जाऊन ते गाणं शूट करायचं होतं. त्यामुळे संपूर्ण गाण्यातील डान्समध्ये जे थरथरत असल्याचं दिसत आहे ते खरं तर प्रत्यक्षात थरथरणारे नृत्य आहे. मी नाचत नव्हतो, ते स्वतःहून घडत होतं. एका शॉटमध्ये, मी 300-400 फूट वर असलेल्या धबधब्यावर उभा आहे आणि माधुरी दीक्षित खाली आहे, ते दृश्य एका शॉटमध्ये घेतले आहे.
View this post on Instagram
शाहरुख या अंधश्रद्धेवर विश्वास ठेवतो.
शाहरुख खान एका अंधश्रद्धेवर विश्वास ठेवतो जो त्याने कोयलाच्या पडद्यामागील व्हिडिओमध्ये उघड केला. तो म्हणाला, “माझी एक अंधश्रद्धा आहे, मी ज्या दृश्यात धावतो, तो चित्रपट प्रचंड हिट होतो. जेव्हा मी डर चित्रपटात सनीला घाबरून पळालो अन् तो चित्रपट खूप हिट झाला, त्यानंतर सलमान खानने मला ‘करण अर्जुनमध्ये म्हटलं होतं की, भाग अर्जुन भाग…’ तेव्हा मी धावत राहिलो,आणि तो चित्रपटही खूप हिट झाला. ‘दिलवाले’ मध्ये मी मुलीच्या मागे धावत राहिलो, तोही खूप हिट झाला. म्हणून, पुढील चित्रपटात आम्ही हा ट्रेंड चालू ठेवला आहे. या चित्रपटात मी खूप धावलो आहे. कधी कुत्र्यांच्या मागे, कधी खलनायकांच्या मागे, कधी खलनायकांच्या भीतीने आणि कधी ट्रेनच्या मागे. शाहरुख खानने असेही म्हटले की त्याने चित्रपटात खूप धोकादायक सीन्स दिल्याचंही त्याने सांगितलं.
