शाहरुख, सलमान खान की रणबीर कपूर… कोणाचे केस नॅच्युअरल आहेत आणि कोणाचे ट्रांसप्लांट? डॉक्टरांनीच केला खुलासा
बॉलीवूडमधील अनेक अभिनेत्यांचे केस नैसर्गिक आहेत की त्यांनी हेअर ट्रान्सप्लांट केले आहे, यावर नेहमीच चर्चा होते. शाहरुख खान, सलमान खान आणि रणबीर कपूर यांच्या केसांमागील सत्य प्रसिद्ध त्वचारोगतज्ज्ञांनी उघड केले आहे. कोणाचे केस नैसर्गिक आहे की हेअर ट्रांसप्लांट हे जाणून घेऊयात.

बॉलीवूडमध्ये असे अनेक अभिनेते आहेत जे त्यांच्या हटके हेअरस्टाईल, लूकसाठी ओळखले जातात. जसं की शाहरूख खानचे केस. सर्वांनाच माहित आहे ती शाहरूख खान हा त्याच्या केसांची किती निगा राहखतो. बऱ्याच मुलाखतींमध्ये त्याला त्याच्या हेअरकेअरबद्दल विचारण्यातही आलं आहे. पण एकंदरितच अभिनेत्रींप्रमाणेच अभिनेत्यांनाही त्यांच्या परफेक्ट लूकसाठी मेहनत घ्यावीच लागते.
स्टारडम केवळ अभिनयाने नाही तर लूकने देखील ठरवले जाते. त्यामुळे जवळपास सगळेच स्टार्स त्यांच्या परफेक्ट लूक मिळवण्यासाठी खूप मेहनत घेत असतात. पण हे देखील खरं आहे की काही अभिनेत्यांनी त्यांचे केस स्टायलिश ठेवण्यासाठी बऱ्याच ट्रिटमेंट घेतली आहे. तसेच काहींनी तर ट्रांसप्लांटही करून घेतलं आहे. अनेक अभिनेत्यांना कमी वयातच केसगळतीची समस्या येऊ लागली होती. अखेर त्यांनी ट्रांसप्लांटचा हा पर्याय निवडला. याचा खुलासा प्रसिद्ध त्वचारोगतज्ज्ञ डॉ. गौरांग कृष्णा यांनी खुलासा केला आहे.
रणबीर कपूर
हेअर ट्रांसप्लांटचा पर्याय निवडणारा बॉलिवूडचा चार्मिंग अभिनेता म्हणजे रणबीर कपूर. डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे रणबीरला त्याच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला केस गळतीचा त्रास सहन करावा लागला. त्याने अनेक हेअर ट्रांसप्लांट केले आहेत. पहिले दोन ट्रांसप्लांट फारसे यशस्वी झाले नाहीत, परंतु जेव्हा रणबीरच्या केसांमध्ये पूर्णपणे बदल करावा लागला. आज, त्याचे केस इकते नैसर्गिक दिसतात की कोणीही कल्पना करू शकत नाही की त्याने ट्रांसप्लांट केलं आहे.
सलमान खान
बॉलिवूडचा भाईजान सलमान खानने देखील हेअर ट्रांसप्लांट केलं आहे. त्याला केस गळतीचा त्रास होत होता त्याने बरेच ट्रीटमेंट केल्या आहेत. त्यापैकी बहुतेक दुबईमध्ये झाले आहेत. काही उपचार त्याने भारतातही केले आहेत. त्याने त्याच्या हेअर लॉस थांबवण्यासाठी फार मेहनत घेतली आहे. तसेच फार खर्चही केला आहे.
शाहरुख खान
जेव्हा बॉलीवूडचा किंग खान, शाहरुख खानच्या हेअरस्टाईल बद्दल तर सर्वांनाच प्रेम आहे. त्याचे केस, हेअर स्टाईल त्याची आयडेंटीटीमधील एक गोष्ट आहे. ज्याचे चाहतेही दिवाने आहेत. आणि डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे त्याचे केस हे नैसर्गिकताच निरोगी आणि चांगले आहेत. त्याने कोणतीही केसांबद्दल ट्रीटमेंट घेतलेली नाही तसेच कोणत्याही प्रकारचे हेअर ट्रांसप्लांट केलेले नाही. या बद्दल डॉक्टरांनीही त्याचं कौतुक केलं आहे.
