Shahid Kapoor | ‘राजपूत राजा’नंतर शाहिद कपूर आणखी एका ऐतिहासिक भूमिकेत झळकणार?

चाहत्यांनी आणि रसिक प्रेक्षकांनी शाहिद कपूरला (Shahid Kapoor) सर्व प्रकारच्या भूमिकांमध्ये पाहिले आहे. शाहिद त्याच्या प्रत्येक भूमिकेत चपखल बसतो. मग ती भूमिका, ‘पद्मावत’मधील ‘राजा रतन सिंह’ असो वा ‘कबीर सिंह’मधील ‘कबीर’ची भूमिका असो.

Shahid Kapoor | ‘राजपूत राजा’नंतर शाहिद कपूर आणखी एका ऐतिहासिक भूमिकेत झळकणार?
शाहिद कपूर

मुंबई : चाहत्यांनी आणि रसिक प्रेक्षकांनी शाहिद कपूरला (Shahid Kapoor) सर्व प्रकारच्या भूमिकांमध्ये पाहिले आहे. शाहिद त्याच्या प्रत्येक भूमिकेत चपखल बसतो. मग ती भूमिका, ‘पद्मावत’मधील ‘राजा रतन सिंह’ असो वा ‘कबीर सिंह’मधील ‘कबीर’ची भूमिका असो. अशा परिस्थितीत शाहिद पुन्हा एकदा नव्या प्रोजेक्टमध्ये एका नव्या रूपात दिसणार आहे. आता शाहिद कपूर लवकरच एका पौराणिक चित्रपटात दिसणार असल्याची चर्चा रंगली आहे (Shahid Kapoor will be seen as Karna from Mahabharata in his upcoming project).

शाहिद कपूर हे सध्या आपला आगामी ‘जर्सी’ या चित्रपटासाठी चर्चेत आहे. चाहतेही त्याच्या या चित्रपटाची खूप प्रतीक्षा करत आहेत. पण या दरम्यान शाहिदच्या नव्या चित्रपटाची चर्चा रंगली आहे.

शाहिद कपूर बनणार महाभारतातील ‘कर्ण’

पिंकविला वेबसाईटच्या वृत्तानुसार, शाहिद कपूर महाभारतावर आधारित चित्रपटात ‘कर्णा’च्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे शूटिंगही पुढच्या वर्षी सुरू होणार असल्याचे बोलले जात आहे. आजकाल अभिनेता शाहिद कपूर गोव्यामध्ये चित्रित होत असलेल्या राज निदिमोरू आणि कृष्णा डीकेच्या पुढील वेब शोच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.

आता पिंकविलाच्या वृत्तानुसार, शाहिद कपूर दिग्दर्शक राकेश ओमप्रकाश मेहरा यांच्या आगामी चित्रपटात काम करू शकतो. हा चित्रपट महाभारतातील ‘कर्ण’ यांच्या जीवनावर आधारित असल्याचे सांगितले जात आहे. हा चित्रपट रॉनी स्क्रूवाला प्रॉडक्शन अंतर्गत बनवला जाणार आहे (Shahid Kapoor will be seen as Karna from Mahabharata in his upcoming project).

शाहिदला आवडली चित्रपटाची कथा?

या चर्चेनुसार शाहिदला राकेश मेहरा यांच्या या चित्रपटाची स्क्रिप्ट आवडली आहे आणि त्यासाठी तो होकारदेखील देऊ शकतो. 2023 मध्ये हा चित्रपट मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होण्याचीही चर्चा आहे. जर हा खरंच असा चित्रपट बनणार असेल, तर शाहिद कपूरसाठी ही भूमिका एखाद्या आव्हानापेक्षा कमी ठरणार नाही. कारण, कर्णापेक्षा दानशूर आजवर कोणतीही व्यक्ती झाला नाही. ही एक सशक्त आणि आव्हानात्मक भूमिका आहे.

तथापि, हा चित्रपट बनणार की नाही, किंवा शाहिद कपूर यांना ओमप्रकाश मेहरा यांनी हा चित्रपट ऑफर केला आहे की नाही?, याबाबत अद्याप कोणतीही घोषणा झालेली नाही. तर हा चित्रपट बनत असल्यास ‘रंग दे बसंती’ आणि ‘दिल्ली 6’नंतर रॉनी आणि ओम प्रकाश मेहरा यांचा हा तिसरा चित्रपट असणार आहे.

या वर्षाच्या फेब्रुवारी महिन्यात जॅकी भगनानी यांनी घोषित केले की, महाभारताच्या व्यक्तिरेखांनी आपल्यावर खूपच प्रभाव पाडला आहे. म्हणूनच अशा व्यक्तिरेखांवर आपण चित्रपट बनवणार आहे. ‘महाभारता’तील ‘कर्ण’ या व्यक्तिरेखेवर आधारित हा चित्रपट असणार आहे.

(Shahid Kapoor will be seen as Karna from Mahabharata in his upcoming project)

हेही वाचा :

PHOTO | एका शब्दाच्या भूमिकेने सुरु झाला अभिनयाचा प्रवास, प्रसंगी मंदिर बनले घर, अशी होती किशोर नांदलस्करांची सुरुवात…

Vidoe | अभिनेता संदीप पाठकचा चिमुरड्यांसोबत ‘वाथी कमिंग’ डान्स, कोरोना काळात खास संदेश

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI