AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शाहरुख खानचा ‘हा’ चित्रपट सत्य घटनेवर आधारित; पण त्याने अद्यापर्यंत पाहिला नाही, म्हणाला “ती भावना मला नको होती…”

शाहरुख खानचा एका चित्रपट असा आहे जो सत्य घटनेवर आधारीत आहे. आणि जो सुपरहिटही ठरला. पण तरीही शाहरुख खानने हा चित्रपट अद्यापपर्यंत पाहिलेला नाही. त्यामागे एक भावनिक कारणही आहे.

शाहरुख खानचा 'हा' चित्रपट सत्य घटनेवर आधारित; पण त्याने अद्यापर्यंत पाहिला नाही, म्हणाला ती भावना मला नको होती...
shahrukh khanImage Credit source: tv9 marathi
| Updated on: May 21, 2025 | 1:59 PM
Share

बॉलीवूडमध्ये असे अनेक चित्रपट आहेत जे सत्य घटेनवर आधारित आहेत. त्यामध्ये प्रसिद्ध अभिनेता शाहरूख खानचंही नाव आहे. शाहरूखचा एक चित्रपट असा आहे जो सत्य घटनेवर आधारीत असून तो प्रचंड गाजला. पण तरीही त्याने त्याचा हा चित्रपट अद्यापपर्यंत पाहिला नाहीये. तसे तर शाहरुख खान त्याचे स्वतःचे चित्रपट अनेक वेळा पाहतो जेणेकरून तो त्यातील त्रुटी ओळखू शकेल आणि भविष्यासाठी सुधारणा करू शकेल. पण त्याचा हा चित्रपट त्याने आजपर्यंत पाहिलेला नाही. यामागील कारणही त्याने सांगितलं आहे. हा चित्रपट म्हणजे 2004 मध्ये प्रदर्शित झालेला आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित ‘स्वदेश’. या चित्रपटाने लोकांना खूप प्रेरणा दिली.

हा चित्रपट एका सत्य घटनेवर आधारित

‘स्वदेश’ ची कथा पूर्णपणे काल्पनिक नव्हती हे फार कमी लोकांना माहिती आहे. हा चित्रपट मुख्यत्वे रविकुचिमांची आणि अरविंद नावाच्या जोडप्याच्या जीवनावर आधारित होता, जे परदेशातून भारतात परतले आणि प्रत्यक्षात महाराष्ट्रातील बैलगाव नावाच्या गावाला वीज पुरवू शकणारे एक छोटे धरण बांधले. हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित असला तरी, आशुतोष गोवारीकर यांना तो बनवण्याची प्रेरणा ‘बापू कुटी’ नावाच्या पुस्तकातून मिळाली. विशेष म्हणजे, हे पुस्तक चित्रपटातही दाखवण्यात आले आहे.

चित्रपटात हे पुस्तक कुठे दाखवण्यात आलं आहे?

चित्रपटात एक दृश्य आहे जिथे शाहरुख खान काउंटरजवळ उभा आहे आणि अभिनेत्री गायत्री जोशीची वाट पाहताना दिसत आहे. हे पुस्तक एका पुस्तकांच्या दुकानात चित्रित केलेल्या दृश्यात बिलिंग बुक्सजवळ ठेवण्यात आलेले दिसते. एवढंच नाही तर मोहन भार्गव ज्या पावसाचा शोध घेणारा सॅटेलाईट (ग्लोबल प्रेसिपिटेशन मेजरमेंट – GMP) वर काम करत असल्याचं दाखवलं गेलं आहे ते नासाचे खरे जीएमपी मिशन होते जे 2014 मध्ये लाँच केले गेले होते. या चित्रपटातील प्रत्येक सीन हा प्रेक्षकांच्या मनाला भावणारा आहे. पण असं असूनही शाहरुख खानने हा चित्रपट कधीच का पाहिला नाही?

शाहरुखने हा चित्रपट का पाहिला नाही?

शाहरुख खानने इतका उत्तम चित्रपट न पाहण्याचे कारण तांत्रिक नसून भावनिक आहे. खरंतर, शाहरुख खान या चित्रपटात आणि या पात्रात इतका गुंतला होता की त्याला या चित्रपटाचा शेवट पहायचा नव्हता. शाहरुख खान स्वतः म्हणाला होता “स्वदेश बनवणे हा इतका भावनिक आणि समाधानकारक अनुभव होता की तो बनवल्यानंतर मी तो चित्रपट कधीच पाहिला नाही. चित्रपटाच्या समाप्तीची भावना मला नको होती.” हा चित्रपट प्रेक्षकांमध्ये खूप लोकप्रिय झाला आणि आजही आहे. केवळ चित्रपट नाही तर त्यातील गाणे देखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली.

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.