AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘मी त्यांना कधीतरी नक्कीच भेटेन…’ शाहरुख खानला कोणाला भेटण्याची प्रचंड इच्छा, जी आजपर्यंत आहे अपूर्ण

शाहरुख खानने अपार यश आणि प्रसिद्धी मिळवली आहे. पण तरीदेखील त्याला एका गोष्टींची खंत आजही आहे. शाहरुख खानला एका खास व्यक्तीला भेटण्याची तीव्र इच्छा आहे. ती कधी पूर्ण होईल यासाठी तो कायमच दु:ख व्यक्त करत असतो.तसेच "कधी ना कधी मी त्यांना नक्कीच भेटेन" अशी इच्छाही शाहरूखने व्यक्त केली आहे.

'मी त्यांना कधीतरी नक्कीच भेटेन...' शाहरुख खानला कोणाला भेटण्याची प्रचंड इच्छा, जी आजपर्यंत आहे अपूर्ण
Shahrukh Khan Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 11, 2025 | 2:00 PM
Share

बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खान हा त्याच्या हटके आणि रोमँटीक अंदाजानेच नाही तर त्याच्या विचारांनी, त्याच्या वागण्यातून देखील चाहत्यांना त्याच्या प्रेमात पाडतो. शाहरूख खान ज्या मेहनतीने पुढे आला आहे त्याचे अनेक किस्से, अनुभव तो त्याच्या मुलाखतींमध्ये सांगताना दिसतो. त्यामुळे अनेकांना त्यातून प्रेरणा मिळत असते.

एका गोष्टीची खंत

शाहरूख खानने त्याच्या याच मेहनतीने त्याचे स्वप्न पूर्ण केलं आहे. शाहरुख खान हा भारतातील सर्वात लोकप्रिय स्टारपैकी एक आहे आणि अलीकडेच तो जगातील सर्वात श्रीमंत सेलिब्रिटी बनला आहे. शाहरुखने अफाट प्रसिद्धी आणि संपत्ती कमावली आहे. पण तरी देखील त्याला एका गोष्टीची खंत आजही आहे. तो याबद्दल नेहमी बोलताना, दु:ख व्यक्त करताना दिसतो.

शाहरूख कोणाला भेटण्यासाठी एवढा आतुर आहे?

शाहरूखला भेटण्यासाठी सर्व चाहते आतुर असतात. पण शाहरूखला देखील एका खास व्यक्तींना भेटण्याची प्रचंड इच्छा आहे. पण ती पूर्ण होऊ शकत नाही ही त्याची खंत आहे. त्या खास व्यक्ती म्हणजे त्याचे आई-वडील. शाहरूख आता ज्या प्रसिद्धीझोतात आहे, त्याचं यश, त्याचं सुपरस्टार होणं, हे सर्व त्याचे पालक पाहू शकले नाही याबद्दल कायम त्याला वाईट वाटतं. त्यासाठी त्याला आता आहे त्या यशासोबत त्यांना भेटण्याची इच्छा आहे.

शाहरुख खानने १९९२ मध्ये आलेल्या “दीवाना” चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. पण त्याआधीच म्हणजे १९९१ मध्ये त्याची आई लतीफ फातिमा खान यांचे निधन झाले. त्याचे वडील ताज मोहम्मद खान यांचेही दहा वर्षांपूर्वी म्हणजे 1981 मध्ये निधन झाले. त्यामुळे त्यांना शाहरूखचं हे यश पाहता आलं नाही.

‘मी त्यांना कधीतरी नक्कीच भेटेन…’

2024 मध्ये दुबई येथे झालेल्या ग्लोबल समिटमध्ये शाहरुख खाननेही भाग घेतला होता. त्यावेळी अभिनेत्याला त्याच्या पालकांची आठवण आली आणि तो म्हणाला की ते जिथे असतील तिथे ते त्याला पाहत असतील. शाहरूखने म्हटलं, “माझे पालक ताऱ्यांसारखे चमकत आहेत, ते मला पाहत आहेत. त्यांना मला पुन्हा भेटण्याची इच्छा आहे आणि कधीनाकधी मी त्यांना नक्कीच भेटेन.”

“मी 24 व्या वर्षी अनाथ झालो.”

1965 मध्ये दिल्लीत जन्मलेल्या शाहरुख खानने त्याचे दोन्ही पालक गमावले. याबाबत तो पुढे म्हणाला, “मला कधीकधी प्रश्न पडतो की त्यांना माझी काळजी असेल का. पण मला त्यांना माझी खूप काळजी असावी कि माझं कसं होईल, पण त्यांनी माझी काळजी करू नये असं आता मला वाटतं. जेव्हा मी 24 व्या वर्षी अनाथ झालो तेव्हा बहुतेक त्यांनी हीच चिंता सतावत असणार की याचं कसं होईल? हा एकटा सगळं कसं करणार? म्हणून मी खूप मेहनत केली.” असं म्हणत त्यांने त्याच्या मनातील त्याच्या आई-वडिलांबद्दलचे प्रेम आणि त्यांना पुन्हा भेटण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

शाहरुख ‘या’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त 

कामाच्या बाबतीत बोलायचे झाले तर, शाहरुख खान सध्या पोलंडमध्ये त्याच्या आगामी “किंग” चित्रपटाच्या शूटिंगमध्ये आहे. सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित या चित्रपटाची त्याच्या चाहत्यांना आतुरतेने वाट पाहावी लागत आहे. “किंग” हा चित्रपट 2026 मध्ये मोठ्या पडद्यावर येण्याची अपेक्षा आहे.

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.