आर्यनची केस लढण्यास दिग्गज वकिलाचा नकार, किंग खानकडून प्रायव्हेट जेट ऑफर आणि…

Shah Rukh Khan - Aryan Khan: आर्यन खानची केस लढवण्यासाठी शाहरुख खानची दिग्गज वकिलाकडे विनंती, किंग खानने प्रायव्हेट जेट ऑफर केल्यानंतर वकील म्हणाले..., सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त आर्यन खान याची चर्चा...

आर्यनची केस लढण्यास दिग्गज वकिलाचा नकार, किंग खानकडून प्रायव्हेट जेट ऑफर आणि...
फाईल फोटो
| Updated on: Sep 19, 2025 | 1:51 PM

Shah Rukh Khan – Aryan Khan: अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान ड्रग्स प्रकरणी वादाच्या भोवऱ्यात अडकलेला तेव्हा किंग खानच्या मुलाला जवळपास 1 महिना तुरुंगात वास्तव्य करावं लागलं. शाहरुख खान मुलाला सोडवण्यासाठी सर्व प्रयत्न करत होता. माजी अ‍ॅटर्नी जनरल, वरिष्ठ वकील याना आर्यन खानची केससाठी शाहरुखने विनंती केली होती. त्यांनी इंग्लंडहून बोलावण्यासाठी शाहरुख खान याने प्रायव्हेट जेट देखील ऑफर केलेला.

माजी अ‍ॅटर्नी जनरल, वरिष्ठ वकील मुकुल रोहतगी यांनी यावर नुकताच झालेल्या एका मुलाखतीत मोठा खुलासा केला आहे. रोहतगी यांनी सांगितल्यानुसार, प्रकरण फार काही मोठं नव्हतं, पण लोकप्रिय अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा असल्यामुळे केसकडे सर्वांचं लक्ष वेधलं गेलं. सध्या रोहतगी यांनी केलेल्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे.

रोहतगी म्हणाले, ‘मी यूकेमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत होतो. तेव्हा कोरोना काळ सुरु होता. मला मिस्टर खानच्या जवळच्या व्यक्तीचा फोन आला, आणि समोरची व्यक्ती म्हणाली, मुंबई हाय कोर्टात तुम्हाला आर्यन खानची बाजू मांडायची आहे… मी नकार दिला कारण मला माझ्या सुट्ट्यांचा आनंद घ्यायचा होता…’

‘अखेर मला शाहरुख खानचा फोन आला. मी त्याच्यासोबत देखील संपर्क साधला… शाहरुखने माझ्या पत्नीसोबत संवाद साधला… मी तुमच्या पत्नीसोबत बोलू शकतो का? असं शाहरुखने मला विचारलं. शाहरुखने माझ्या पत्नीकडे विनंती केली. ही केस तुम्ही बाहेरचा व्यक्ती आहे म्हणून विचारात घेऊ का… शाहरुख प्रचंड भावुक झालेला. अखेर माझ्या पत्नीने मला केस लढण्यास सांगितलं…’

रोहतगी पुढे म्हणाले, ‘शाहरुख प्रचंड विनम्र आहे. त्याने मला प्रायव्हेट जेट ऑफर केली. पण मी स्पष्ट नकार दिला. कारण मला लहान जेट्स आवडत नाहीत. मी मुंबईत पोहोचलो. शाहरुख आणि मी एकाच हॉटेलमध्ये थांबलेलो… आम्ही प्रकरणावर चर्चा केली आणि कोर्टात आर्यनला जामिन मंजूर झाला… त्यानंतर मी पुन्हा इंग्लंडला आलो…’ असं देखील मुकुल रोहतगी म्हणाले.

आर्यन याला अटक केल्यानंतर शाहरुख खान आणि गौरी खान मोठ्या संकटात अडकले होते. पण वेळेनुसार सर्वकाही सुरळीत झालं. आता आर्यन याने दिग्दर्शक म्हणून करीयरला सुरुवात देखील केली आहे.  ‘द बॅड्स ऑफ बॉलिवूड’  सीरिजचं दिग्दर्शन आर्यनने केलं आहे.

‘द बॅड्स ऑफ बॉलिवूड’ सिनेमातील कास्ट

‘द बॅड्स ऑफ बॉलिवूड’ सीरिजमध्ये लक्ष्य ललवानी, राघव जुयाल, बॉबी देओल आणि सहर बंबा मुख्य भूमिकेत आहे. तर ‘द बॅड्स ऑफ बॉलिवूड’ बॉलिवूडचे अनेक लोकप्रिय सेलिब्रिटी देखील दिसणार आहेत. सीरिजमध्ये बॉलिवूड कसं आहे… हे दाखवण्याचा प्रयत्न आर्यन खान याने केला आहे. सिनेमात करण जोहर, शाहरुख खान, रणवीर सिंग, सलमान खान आणि आमिर खान यांच्यासोबत अन्य सेलिब्रिटी देखील दिसणार आहेत…