TMKOC | असित कुमार मोदी यांच्यावर धक्कादायक आरोप, शैलेश लोढा यांचे आरोप ऐकून प्रेक्षक हैराण
तारक मेहता का उल्टा चश्मा ही मालिका गेल्या कित्येक दिवसांपासून चाहत्यांचे मनोरंजन करताना दिसत आहे. तारक मेहता का उल्टा चश्मा या मालिकेचा चाहतावर्ग अत्यंत मोठा आहे. मात्र, मालिकेचे निर्माता असित कुमार मोदी यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले.

मुंबई : तारक मेहता का उल्टा चश्मा ही मालिका केल्या काही दिवसांपासून सतत प्रेक्षकांचे मनोरंजन (Entertainment) करताना दिसतंय. तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेतील कलाकरांची देखील सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग (Fan following) ही बघायला मिळते. तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेत मुंबईमधील एक सोसायटी दाखवण्यात आलीये. मालिकेतील एक नेहमीच चर्चेत राहणारा विषय म्हणजे टप्पू सेना. आता टप्पू सेना काॅलेजला जात असल्याचे दाखवण्यात आलंय.
लहान मुलांपासून ते मोठ्यापर्यंत ही मालिका जवळपास सर्वांनाच प्रचंड आवडते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून तारक मेहता का उल्टा चश्मा ही मालिका मोठ्या वादात सापडलीये. इतकेच नाही तर मालिकेचे निर्माता असित कुमार मोदी यांच्यावर सतत गंभीर आरोप हे केले जात आहेत. यामुळे चाहते हैराण झाल्याचे बघायला मिळाले. काही दिवसांपासून अनेक कलाकार मालिकेला सोडचिठ्ठी देताना दिसत आहेत.
शैलेश लोढा अर्थात आपल्या सर्वांचे आवडते तारक मेहता यांनी असित कुमार मोदी यांच्यावर गंभीर आरोप केले. यानंतर मालिकेत मिसेस सोढीची भूमिका साकारणारी अभिनेत्री जेनिफर हिने देखील गंभीर आरोप केले. इतकेच नाही तर यांचे प्रकरण थेट कोर्टात पोहचले. एका मागून एक कलाकारांनी गंभीर आरोप केल्याने लोक हैराण झाले.
आता नुकताच शैलेश लोढा यांनी अत्यंत मोठे भाष्य हे असित कुमार मोदी यांच्याबद्दल केले आहे. मोठे खुलासे करताना शैलेश लोढा हे दिसले. शैलेश लोढा म्हणाले की, असित कुमार मोदी हे माझ्यासोबत अत्यंत चुकीचे बोलले आहेत. इतकेच नाही तर तारक मेहता मालिकेसोबतच इतर शोमध्ये काम केल्याचे सांगून त्यांनी माझा अपमान केला.
शैलेश लोढा म्हणाले की, मला एक शोमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून बोलावले गेले मी आनंदाने या शोमध्ये सहभागी झालो. मात्र, हे अजित कुमार मोदी यांना अजिबातच आवडले नाही. मुळात म्हणजे यानंतर असित कुमार मोदी यांनी माझ्यासोबत ज्याप्रकारे भाष्य केले ते मला अजिबातच आवडले नाही. थेट त्यांनी मला नोकर देखील म्हटले.
त्यांचे बोलणे मला सहनच झाले नाही. मी 17 फेब्रुवारीला मेल केला आणि स्पष्टपणे सांगितले की, मी आता या शोमध्ये काम नाही करू शकत. शैलेश लोढा हे तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेच्या पहिल्या दिवसापासून मालिकेसोबत होते. मात्र, अचानकपणे शैलेश लोढा यांनी ही मालिका सोडण्याचा निर्णय घेत सर्वांनाच मोठा धक्का दिला.
