AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

TMKOC | शैलेश लोढा यांनी सांगितलं ‘तारक मेहता..’ सोडण्यामागचं खरं कारण; म्हणाले “निर्मात्यांची अभद्र भाषा..”

'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेचे निर्माते असितकुमार मोदी यांच्यावर टीममधील काही कलाकारांनी गंभीर आरोप केले होते. अभिनेते शैलेश लोढा यांनीसुद्धा त्यांच्यावर आरोप करत मालिका सोडली होती. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ते याविषयी सविस्तरपणे व्यक्त झाले.

TMKOC | शैलेश लोढा यांनी सांगितलं 'तारक मेहता..' सोडण्यामागचं खरं कारण; म्हणाले निर्मात्यांची अभद्र भाषा..
Shailesh Lodha and Asit ModiImage Credit source: Instagram
| Updated on: Sep 26, 2023 | 8:50 AM
Share

मुंबई | 26 सप्टेंबर 2023 : ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही टेलिव्हिजन लोकप्रिय मालिका गेल्या काही महिन्यांपासून सतत चर्चेत आहे. या मालिकेतील काही कलाकारांनी निर्माते असितकुमार मोदी यांच्यावर गंभीर आरोप केले होते. मालिकेत तारक मेहताची भूमिका साकारणारे अभिनेते शैलेश लोढा यांनी जवळपास वर्षभरापूर्वी ही मालिका सोडली. मालिका सोडल्यानंतर त्यांनी निर्मात्यांवर पैसे थकवल्याचा आरोप केला होता. इतकंच नव्हे तर निर्मात्यांविरोधातील खटलासुद्धा त्यांनी नुकताच जिंकला. त्यानंतर आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत शैलेश यांनी मालिका सोडण्यामागचं कारण सांगितलं आहे.

मालिका का सोडली?

‘लल्लनटॉप’ या वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत शैलेश लोढा पहिल्यांदाच मालिका सोडण्याविषयी मोकळेपणे व्यक्त झाले. निर्माते असित मोदी यांनी अत्यंत वाईट वागणूक दिली आणि अपमान केल्याचा आरोप शैलेश यांनी यावेळी केला. मालिकेत काम करत असताना त्यांना सब टीव्हीवरील ‘गुड नाइट इंडिया’ या स्टँड-अप शोमध्ये सेलिब्रिटी पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आलं होतं. त्या कार्यक्रमाला हजेरी लावल्याने निर्मात्यांनी शैलेश यांचा अपमान केला होता. “मी त्या कार्यक्रमासाठी शूट केलं होतं आणि तिथे मी एक कवितादेखील वाचून दाखवली होती. तो एपिसोड टेलिकास्ट होण्याच्या एक दिवस आधी मला निर्मात्यांनी फोन केला. त्यावेळी ते माझ्याशी ज्या भाषेत बोलले, ते ऐकून मला प्रचंड राग आला होता”, असं शैलेश म्हणाले.

निर्मात्यांकडून अपमानास्पद वागणूक

“ते माझ्याशी ज्या पद्धतीने बोलले, ते मला सहन झालं नाही. शो फक्त एका व्यक्तीमुळे चालत नाही, तर त्यात अनेकांचे प्रयत्न असतात. म्हणून 17 फेब्रुवारी 2022 रोजी मी त्यांना मेल करून सांगितलं की मी यापुढे मालिकेत काम करणार नाही. सोशल मीडियावर किंवा माध्यमांसमोर काही बोलण्याआधी मी त्यांची परवानगी का घ्यावी? हे माझे हक्क आहेत. माझी समस्या पैशांबाबत कधीच नव्हती. पण त्यांनी जी अपमानास्पद भाषा वापरली, त्याला माझा विरोध आहे”, असं त्यांनी पुढे सांगितलं.

असित मोदी यांच्यावर याआधी अभिनेत्री जेनिफर मिस्त्रीनेही गंभीर आरोप केले होते. जेनिफरने असितकुमार मोदी यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप केला होता. इतकंच नव्हे तर तिने मुंबईतील पवई पोलीस ठाण्यात असित मोदी आणि त्यांच्या प्रॉडक्शन टीममधील इतर दोघांविरोधात तक्रार दाखल केली होती. मात्र निर्मात्यांनी तिचे आरोप फेटाळले होते.

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.