AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mukesh Khanna: वयाच्या 67 व्या लग्न करणार शक्तीमान! म्हणाले, ‘ज्या महिलेसोबत माझं लग्न होईल ती…’

Mukesh Khanna: खरा मर्द तोच असतो, ज्याचे 10 महिलांसोबत... 'शक्तीमान' फेम मुकेश खन्ना यांचं लक्षवेधी वक्तव्य, वयाच्या 67 व्या वर्षी थाटणार संसार... खासगी आयुष्याबद्दल मोठं विधान...

Mukesh Khanna: वयाच्या 67 व्या लग्न करणार शक्तीमान! म्हणाले, 'ज्या महिलेसोबत माझं लग्न होईल ती...'
Mukesh Khanna
| Updated on: May 04, 2026 | 8:32 AM
Share

Mukesh Khanna: शक्तिमान (Shaktimaan) या मालिकेमुळे टीव्ही अभिनेते मुकेश खन्ना (Mukesh Khanna) च्या लोकप्रियतेत मोठी वाढ झाली. याशिवाय बी. आर. चोप्रार निर्मित ‘महाभारत’ या मालिकेत त्यांनी भीष्म पितामह या भूमिकेला न्याय दिला आणि चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. आज घराघरात मुकेश खन्ना शक्तीमान म्हणून प्रसिद्ध आहेत. मुकेश खन्ना कायम त्यांच्या सडेतोड वक्तव्यांमुळे आणि त्यांच्या भूमिकांमुळे चर्चेत असतात. पण आता मुकेश खन्ना त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आले आहे. अशात वयाच्या 67 व्या वर्षी मुकेश खन्ना लग्न करणार का? असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला आहे.

सांगायचं झालं तर, मुकेश खन्ना कायम रिलेशनशिप आणि लग्न संस्थेबद्दल स्वतःचं मत मांडत असतात. आता मुकेश खन्ना यांनी स्वतःचं लग्न आतापर्यंत का नाही झालं? याबद्दल सांगितलं आहे. एवढंच नाही तर, पुरुषांबद्दलच्या रूढ कल्पनांविषयी बोलताना, मुकेश खन्ना यांनी एक आठवण सांगितली, सिनेमा निर्माते रवी चोप्रा एकदा त्यांना म्हणालेले, ‘ज्याची अनेक प्रेमप्रकरणे असतात, तोच खरा पुरुष असतो.’

यावर असहमती दर्शवत मुकेश खन्ना एका मुलाखतीत म्हणाले, ‘त्या ग्रुपमध्ये सर्व पुरुषांचे अफेअर होते, पण माझं नाही… मला असं वाटतं की, ‘मर्दानगी साध्य करण्यासाठी 10 महिलांसोबत अफेअर असणं गरजेचं नाही… मर्दानगी साध्य करण्यासाठी अन्य मार्ग देखील आहेत आणि मी महिलांचा आदर करतो…’

लग्नाबद्दल देखील मुकेश खन्ना यांनी यावेळी मोठं वक्तव्य केलं आहे. ‘लोकांचा असा समज आहे की, जर तुम्ही लग्न करत नाहीत तर, तुमचं लग्न संस्थेवर विश्वास नाही. पण हे सत्य नाही. बहुतेक लोकांपेक्षा माझा लग्न संस्थेवर जास्त विश्वास आहे.” पण, मला असं वाटतं की, लग्न हे नशिबात असतं. “तुम्हाला कोणी असंच सहज सापडत नाही. जर माझं लग्न होणार असतं, तर आतापर्यंत झालं असतं.’

‘ज्या महिलेसोबत माझं लग्न होणार आहे, तिला जेव्हा भेटायचं असेल तेव्हा ती भेटेल… जे नशिबात आहे तेच होणार आहे… वय काय असतं? वयाचं माझ्यासाठी बंधन नाही…’ असं देखील मुकेश खन्ना म्हणाले आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त मुकेश खन्ना यांच्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे.

मुकेश खन्ना यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, त्यांनी अनेक सिनेमांमध्ये देखील महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. ‘सौगंध’, ‘सौदागर’, ‘यालगार’, ‘मै खिलाडी ती अनाडी’, ‘राजा’, ‘बरसात’ यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत त्यांनी चाहत्यांच्या मनावर राज्य केलं.

Follow Us
सह्याद्रीवर धुक्याची चादर, दऱ्याखोऱ्यात धबधबे; ‘मिसिंग लिंक’चं हे...
सह्याद्रीवर धुक्याची चादर, दऱ्याखोऱ्यात धबधबे; ‘मिसिंग लिंक’चं हे दृश्य पाहाच!
संजय राऊतांवर अमृता फडणवीस संतापल्या, थेट म्हणाल्या राऊतांसारखं....
संजय राऊतांवर अमृता फडणवीस संतापल्या, थेट म्हणाल्या राऊतांसारखं बरळण्यापेक्षा...
डॉ. डी. वाय. पाटील यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. डी. वाय. पाटील यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
शिवसेना चिन्हाबाबतच्या सुनावणीनंतर शिंदे गटाकडून पहिली प्रतिक्रिया...
शिवसेना चिन्हाबाबतच्या सुनावणीनंतर शिंदे गटाकडून पहिली प्रतिक्रिया समोर, एका वाक्यातच...
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडीओ Delete केल्याप्रकरणी
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडीओ Delete केल्याप्रकरणी अखेर Metaने मागितली माफी, पहा व्हिडीओ
वाल्मिक कराड पुन्हा चर्चेत, राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या ट्वीटने खळ
Walmik Karad | वाल्मिक कराड पुन्हा चर्चेत, राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या ट्वीटने खळबळ
शिवसेना कुणाची? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद; शिंदे गट अडचणीत?
शिवसेना कुणाची? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद; शिंदे गट अडचणीत? सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
शिंदे गटाचे सर्व आमदार अपात्र ठरणार?; सुनावणीनंतर राऊतांचा मोठा दावा
Sanjay Raut On SC Hearing | शिंदे गटाचे सर्व आमदार अपात्र ठरणार?; सुनावणीनंतर संजय राऊतांचा मोठा दावा
शिवसेना कुणाची? जोरदार युक्तावादनंतर आजची सुनावणी संपली, कोर्टात...
शिवसेना कुणाची? जोरदार युक्तावादनंतर आजची सुनावणी संपली, कोर्टात नेमकं काय घडलं?
कुणबी प्रमाणपत्र अवैध, मराठा समाजाच्या... छत्रपती संभाजीनगरातून...
Kunbi Certficate | कुणबी प्रमाणपत्र अवैध, मराठा समाजाच्या... छत्रपती संभाजीनगरातून मोठी अपडेट समोर!