AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शम्मी कपूर यांच्या मुलाने वयाच्या 67 व्या वर्षी केलं पदवीचं शिक्षण पूर्ण; मिळाले इतके गुण

आदित्य नऊ वर्षांचे असताना त्यांची आई गीता बाली यांचं निधन झालं होतं. शम्मी कपूर आणि त्यांच्या दुसऱ्या पत्नी नीला देवी यांनी त्यांना लहानाचं मोठं केलं. आदित्य आणि त्यांची बहीण कांचन यांना आपल्याच मुलांप्रमाणे वाढवल्याचं नीला अनेकदा मुलाखतीत म्हणायच्या.

शम्मी कपूर यांच्या मुलाने वयाच्या 67 व्या वर्षी केलं पदवीचं शिक्षण पूर्ण; मिळाले इतके गुण
Shammi Kapoor son Aditya Raj Kapoor Image Credit source: Twitter
| Updated on: Aug 23, 2023 | 1:13 PM
Share

मुंबई | 23 ऑगस्ट 2023 : एका विशिष्ट वयात गेल्यावर नवीन गोष्टी शिकण्याची किंवा अभ्यास करण्यासाठी मेंदूची क्षमता कमी होते असं म्हटलं जातं. मात्र जर इच्छाशक्ती असेल तर कोणतीही गोष्ट शिकण्यासाठी वय कधीच आडवं येत नाही. हीच गोष्ट दिवंगत अभिनेते शम्मी कपूर यांच्या मुलाने सिद्ध केली आहे. शम्मी कपूर आणि गीता बाली यांचा मुलगा आदित्य राज कपूर यांनी वयाच्या 67 व्या वर्षी पदवीचं शिक्षण पूर्ण केलं आहे. आदित्य यांनी फिलॉसॉफीमध्ये पदवी प्राप्त केली आहे. हे शिक्षण पूर्ण करण्यासाठी मुलगी तुलसीने सतत प्रेरणा दिली असं ते म्हणाले. त्यामुळे या यशाचं श्रेय त्यांनी मुलीला दिलं आहे.

ई टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत आदित्य म्हणाले, “अभ्यास करण्यासाठी माझ्याकडे सर्व संधी उपलब्ध होत्या, परंतु मी कधीच त्यांचा फायदा घेतला नाही. वयाच्या 61 व्या वर्षी मी अभ्यास करण्यास सुरुवात केली आणि फिलॉसॉफी या विषयाकडे वळलो. अध्यात्मिक गोष्टींकडे माझा कल अधिक असल्याने मी सहजरित्या तो विषय निवडला. मी एक निवृत्त व्यक्ती असून माझ्याकडे बराच वेळ आहे, असं माझ्या मुलीला वाटायचं. त्यामुळे तिनेच मला इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटीमधून ऑनलाइन कोर्स करण्यास प्रोत्साहित केलं.”

कोरोना महामारी आणि लॉकडाऊनमुळे आदित्य यांच्या काही परीक्षा चुकल्या. पण अखेर त्यांनी 59.67 टक्के गुण मिळवत पदवी प्राप्त केली. यानंतर त्यांना पुढे आणखी शिकण्याची इच्छा निर्माण झाली आहे. म्हणून त्यांनी मास्टर्समध्येही प्रवेश घेतला आहे. “हे मी माझी आई गीता बालीसाठी केलं”, असंही ते यावेळी म्हणाले.

आदित्य यांनी अभिनयात काही वर्षे काम केलं. मात्र अभिनयाकडे त्यांनी करिअर म्हणून कधीच पाहिलं नव्हतं. “माझ्या वडिलांनी माझ्या निर्णयाला खूप पाठिंबा दिला. मी आयुष्यात नेहमीच काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केला आणि ते सदैव माझ्या पाठिशी खंबीरपणे उभे राहिले”, असं ते एका मुलाखतीत म्हणाले होते.

आदित्य नऊ वर्षांचे असताना त्यांची आई गीता बाली यांचं निधन झालं होतं. शम्मी कपूर आणि त्यांच्या दुसऱ्या पत्नी नीला देवी यांनी त्यांना लहानाचं मोठं केलं. आदित्य आणि त्यांची बहीण कांचन यांना आपल्याच मुलांप्रमाणे वाढवल्याचं नीला अनेकदा मुलाखतीत म्हणायच्या. किंबहुना त्यांच्याकडेच पूर्ण लक्ष देता यावं यासाठी नीला यांनी स्वत:ची मुलं न होऊ देण्याचा निर्णय घेतला होता. “त्यांनी मूल न होऊ देण्याबद्दल स्वत: निर्णय घेतला होता. अशा किती महिला हा निर्णय घेऊ शकतील? त्यातही शम्मी कपूर यांच्यासारख्या व्यक्तीचा आणि त्यांच्या दोन मुलांचा सांभाळ करणं सोपं नव्हतं”, असं आदित्य यांनी एका मुलाखतीत म्हटलं होतं.

गुंड बंडू आंदेकरला तिकीट दिलं तर....; कोमकरच्या आईने दिला टोकाचा इशारा
गुंड बंडू आंदेकरला तिकीट दिलं तर....; कोमकरच्या आईने दिला टोकाचा इशारा.
अजितदादांचा भल्या पहाटे दौरा अन् त्यात घडलं असं काही की...
अजितदादांचा भल्या पहाटे दौरा अन् त्यात घडलं असं काही की....
काँग्रेस-वंचित आघाडी झाल्यास आमचाच महापौर; विजय वडेट्टीवार यांचा दावा
काँग्रेस-वंचित आघाडी झाल्यास आमचाच महापौर; विजय वडेट्टीवार यांचा दावा.
भाजपकडून धंगेकरांची कोंडी? मुलगा अपक्ष निवडणूक लढणार; सुत्रांची माहिती
भाजपकडून धंगेकरांची कोंडी? मुलगा अपक्ष निवडणूक लढणार; सुत्रांची माहिती.
त्यांचा आणि आमचा काडीचाही संबंध नाही! अशोक चव्हाणांचं मोठं वक्तव्य
त्यांचा आणि आमचा काडीचाही संबंध नाही! अशोक चव्हाणांचं मोठं वक्तव्य.
ठाकरे बंधूंकडून पवारांच्या राष्ट्रवादीला फक्त 16 जागांचा प्रस्ताव?
ठाकरे बंधूंकडून पवारांच्या राष्ट्रवादीला फक्त 16 जागांचा प्रस्ताव?.
प्रवाशांनो कृपया लक्ष द्या! आज लोकलचं वेळापत्रक बघूनचं घराबाहेर पडा
प्रवाशांनो कृपया लक्ष द्या! आज लोकलचं वेळापत्रक बघूनचं घराबाहेर पडा.
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.