AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आपल्या डोक्यात हवा गेली, अहंकार अती वाईट; निलेश साबळेसाठी शरद उपाध्येंची खळबळजनक पोस्ट

राशीचक्रकार शरद उपाध्ये यांनी निलेश साबळेसाठी पोस्ट लिहिली आहे. त्यांची ही पोस्ट सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे.

आपल्या डोक्यात हवा गेली, अहंकार अती वाईट; निलेश साबळेसाठी शरद उपाध्येंची खळबळजनक पोस्ट
Nilesh SableImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Jul 03, 2025 | 9:17 AM
Share

छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय शो म्हणून ‘चला हवा येऊ द्या’ पाहिला जात होता. अनेक महिन्यांच्या ब्रेकनंतर हा शो पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. पण या शोमध्ये अनेक बदल झाल्याचे पाहायला मिळत आहे. सगळ्यात मोठा बदल म्हणजे डॉ. निलेश साबळे या टीममधून बाहेर पडल्यावर अभिजीत खांडकेकर सूत्रसंचालन करताना दिसत आहे. दरम्यान, राशीचक्रकार शरद उपाध्ये यांनी निलेश साबळेसाठी पोस्ट लिहिली आहे. त्यांची ही पोस्ट सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे.

राशीचक्रकार शरद उपाध्ये हे काही वर्षांपूर्वी ‘चला हवा येऊ द्या’ या शोमध्ये आले होते. पण तेव्हाचा त्यांचा अनुभव अतिशय वाईट होता. त्यांनी आता फेसबुक अकाऊंटवर पोस्ट शेअर करत निलेश साबळेला खडसावले आहे. त्यांनी निलेशला ‘आपल्या डोक्यात हवा गेली’ असे म्हटले आहे.

वाचा: नाग मेल्यावर नागीण 24 तास मृतदेहाजवळ बसून राहिली अन्…; आश्चर्यचकीत करणारी घटना

काय आहे राशीचक्रकार शरद उपाध्येंची पोस्ट?

आदरणीय नीलेशजी साबळे,

आपल्याला चला हवा येऊ द्याच्या दुस-या पर्वातून डच्चू देऊन त्या जागी अभिजीत खांडकेकर याला आणल्याची बातमी आज पेपरमध्ये वाचली. वाईट वाटले पण आश्चर्य नाही. मला तुम्ही एकदा बोलवले होते. त्याप्रमाणे मी ११ वा.पोहोचलो. पण ३ वाजेपर्यंत त्या रुममध्ये कोणीच फिरकले नाही. मला पाणी हवे होते पण एकादोघांना सांगूनही ते आणतो म्हणून गेले ते आलेच नाहीत. मला रुम सोडू नका असे सांगितले होते. नीलेश तुम्ही इतर कलावंतांच्या रुम मध्ये जाऊन गप्पा मारीत होतात पण माझ्या रुममध्ये डोकावलात ते थेट ४ वा.स्माईलही न देता स्टेजवर गेलात. इतरांचे शूटिंग खूप वेळ केलेत पण मला ६ वा. बोलावून घाईघाईत १५ मिनिटात सारे आटोपले. त्यावेळीही इतर कलावंत मधेमधे बोलत होते.

माझा सारा दिवस फुकट गेला.एडिटींग मध्येही माझी उत्तरे गाळलीत. बाहेर आपली भेट झाली तेव्हा वडिलांच्या नात्याने काही सल्ले दिले. पण कार्यक्रमाचे प्रमुख म्हणून आपल्या डोक्यात हवा गेली होती. दुसऱ्याबद्दल आदर ठेवायचा असतो पण तुम्ही बेपर्वा होतात. त्याच वेळी मला वाटले की अहंकार अती वाईट. असं उपाध्येंनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं. तर अभिजीत खांडकेकर ही धुरा चांगली सांभाळतील. मला त्यांचा सहवास मिळाला आहे. आपण अनुभवी आहात. त्यांना मार्गदर्शन करा. इंडस्ट्रीत आपल्याविषयी असलेले गैरसमज आपल्या चांगल्या कामाने दूर करा. आपल्याला ईश्वराची साथ लाभो ही विनंती.

नेटकऱ्यांनी केल्या कमेंट

सध्या सोशल मीडियावर शरद उपाध्ये यांची ही पोस्ट तुफान व्हायरल झाली आहे. अनेक यूजर्सने त्यावर कमेंट केल्या आहेत. एका यूजरने आम्हाला शो सुरु होतोय यात आनंद आहे असे म्हटले आहे.

निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका.
BJP पदाधिकाऱ्याचं अजब कांड, मतदारांना पैशांचे आमिष दाखवलं अन् कोंडून..
BJP पदाधिकाऱ्याचं अजब कांड, मतदारांना पैशांचे आमिष दाखवलं अन् कोंडून...
मोदी ऑन बोर्ड E-Mail चा उल्लेख अन्...पृथ्वीराज चव्हाणांचा सनसनाटी दावा
मोदी ऑन बोर्ड E-Mail चा उल्लेख अन्...पृथ्वीराज चव्हाणांचा सनसनाटी दावा.
मराठी अन् मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनिती ठरली
मराठी अन् मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनिती ठरली.
मोदी आणि एपस्टीनचं काय नातं? एपस्टीन प्रकरणावरून चव्हाणांचा थेट सवाल
मोदी आणि एपस्टीनचं काय नातं? एपस्टीन प्रकरणावरून चव्हाणांचा थेट सवाल.
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश.
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा.
BMC निवडणुकीसाठी मनसे अ‍ॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी
BMC निवडणुकीसाठी मनसे अ‍ॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी.
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार.
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री.