AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘दुसऱ्या सिझनचं शूटिंग संपूनही पहिल्याचे पैसे मिळाले नाही..’; निर्मात्यांवर भडकला शशांक केतकर

अभिनेता शशांक केतकरने त्याच्या इन्स्टा स्टोरीमधील पोस्टद्वारे 'गुनाह' या हिंदी वेब सीरिजच्या निर्मात्यांबद्दल तक्रार केली आहे. दुसरा सिझन प्रेक्षकांच्या भेटीला आला असून अद्याप त्याला पहिल्या सिझनचे पैसे मिळाले नव्हते.

'दुसऱ्या सिझनचं शूटिंग संपूनही पहिल्याचे पैसे मिळाले नाही..'; निर्मात्यांवर भडकला शशांक केतकर
Shashank Ketkar Image Credit source: Instagram
| Updated on: Jan 06, 2025 | 11:45 AM
Share

‘होणार सून मी ह्या घरची’ या मालिकेतून अभिनेता शशांक केतकर घराघरात पोहोचला. यानंतर त्याने विविध मालिकांमध्ये आपल्या दमदार अभिनयाची छाप सोडली. शशांकने मराठीसोबत हिंदीतही काम केलंय. गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या ‘गुनाह’ या वेब सीरिजमध्ये त्याने महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. या सीरिजचा दुसरा सिझन यावर्षी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. अशातच शशांकने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एक पोस्ट लिहित निर्मात्यांबद्दल तक्रार केली आहे. दुसऱ्या सिझनचं शूटिंग संपलं तरी पहिल्या सिझनचे पैसे परवापर्यंत मिळाले नव्हते, असं त्याने म्हटलंय. इतकंच नव्हे तर पहिल्या सिझनचे पूर्ण पैसे मिळाल्याशिवाय दुसऱ्या सिझनचं डबिंग करणार नाही, अशी अट शशांकने निर्मात्यांना घातली असता काही सीन्समध्ये त्याच्या आवाजाऐवजी दुसऱ्या एका डबिंग आर्टिस्टकडून डायलॉग्स डब करून घेतल्याचा त्याने आरोप केला आहे.

शशांक केतकरची पोस्ट-

‘गुनाह या वेब सीरिजचा दुसरा सिझन आजपासून सुरू झाला आहे. पण.. सिझन 2 चं शूटिंग संपलं होतं तरी पहिल्या सिझनचे पैसे परवापर्यंत मिळाले नव्हते आणि सिझन 1 चे पैसे मिळाल्याशिवाय सिझन 2 चं मी डबिंग करणार नाही अशी अट घातल्यामुळे अनेक सीन्समध्ये माझ्या आवाजाऐवजी एका डबिंग आर्टिस्टकडून वाक्य डब करून घेतली आहेत. याबद्दल मी सविस्तर बोलेनच..’, अशी पोस्ट शशांकने लिहिली आहे.

‘गुनाह’ ही वेब सीरिज 3 जून 2024 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. यामध्ये गश्मीर महाजनी, सुरभी ज्योती आणि झयान खान यांच्या भूमिका होत्या. तर शशांकचीही या सीरिजमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका होती. दुसऱ्या सिझनचं शूटिंग संपूनही पहिल्या सिझनचे पैसे न मिळाल्याने शशांकने नव्या सिझनचं डबिंग न करण्याची अट घातली होती. तरीही त्याला त्याच्या मेहनतीचे पैसे न देता थेट दुसऱ्या डबिंग आर्टिस्टकडून काही डायलॉग्स डब करून घेण्यात आलं. याविषयी सविस्तर बोलणार असल्याचंही शशांकने त्याच्या पोस्टमध्ये म्हटलंय.

या पोस्टनंतर निर्मात्यांनी शशांकशी संपर्क साधून हे प्रकरण परस्पर मिटवण्याचा प्रयत्न केला. यानंतर शशांकनेही सोशल मीडियावर पोस्ट लिहित हे प्रकरण मिटल्याचं स्पष्ट केलं. त्याचप्रमाणे सोशल मीडियावर हा मुद्दा मांडल्याप्रकरणी माफीसुद्धा मागितली.

इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.