AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shefali Jariwala Death : शेफालीच्या मृत्यूचे या ॲक्टरने अगोदरच वर्तवले होते भाकीत; काय होते कुंडलीत, भविष्यवाणी सत्यात

Shefali Jariwala Death : शेफाली जरीवालाचा मृत्यू 42 व्या वर्षी झाला. हृदयविकाराच्या झटक्याने तिचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. पण एका पॉडकास्टमध्ये तिच्या मृत्यूचे भाकीत वर्तवण्यात आले होते. याविषयीचा तो व्हिडिओ व्हायरल झाला आहे. काय होता त्यात दावा?

Shefali Jariwala Death : शेफालीच्या मृत्यूचे या ॲक्टरने अगोदरच वर्तवले होते भाकीत; काय होते कुंडलीत, भविष्यवाणी सत्यात
मृत्यूचे अगोदरच भाकीतImage Credit source: गुगल
| Updated on: Jun 29, 2025 | 8:12 AM
Share

शेफाली जरीवालाचा 42 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला असे सांगण्यात येत आहे. शुक्रवारी 27 जून रोजी तिचा मृत्यू ओढावला. मुंबई पोलिसांनुसार, शेफालीच्या छातीत दुखायला लागले. त्यानंतर पती पराग त्यागीने तिला मल्टिस्पेशलिस्ट रुग्णालयात दाखल केले. तिथे तपासल्यानंतर डॉक्टर्सने शेफालीला मयत घोषीत केले. पण या ॲक्टर्सच्या मृत्यूचे कारण अद्याप समोर आलेले नाही. दरम्यान पारस छाबडा याचा एक जुना व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यात तो शेफालीच्या जन्मकुंडलीवरून तिचा अचानक मृत्यू होईल, असे संकेत देत आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यात ग्रहांचे गणित आणि कुंडलीतील त्यांच्या बैठकीचा उल्लेख आहे.

शेफालीच्या मृत्यूविषयी पारस छाबडाची काय भविष्यवाणी

ऑगस्ट 2024 मध्ये शेफाली ही पारस छाबडा याचा पॉडकास्ट, आबरा का डाबरा मध्ये दिसली होती. त्यापूर्वी हे दोघे पण रिॲलिटी शो ‘बिग बॉस 13′ मध्ये दिसले होते. या शोमध्ये पारस याने त्याच्या कुंडलीविषयी एक धक्कादायक ज्योतिषी खुलासा केला होता. तुझ्या 8 व्या घरात चंद्र, बुध आणि केतू विराजमान आहे. चंद्र आणि केतूचा संयोग हा सर्वात वाईट असतो. 8 वे घर हे हानी, अचानक मृत्यू, रहस्य, प्रसिद्ध लोप पावण्याचे संकेत देतो. तुझ्यासाठी चंद्र आणि केतू तर वाईट आहेतच तर या बैठकीत बुध ग्रह पण बैठक मारून बसला आहे. हा चिंता आणि अडचणीकडे इंगित करतो, इशारा करतो, असे भाकीत छाबडाने वर्तवले होते.

पारसा छाबडा ने वाहिली श्रद्धांजली

पारस छाबडा आणि शेफाली हे बिग बॉस 13 मध्ये एकत्र होते. शेफालीचा पती पराग त्यागी हा त्याचा मित्र आहे. त्यामुळे तो शेफालीला या शो मध्ये भाभी म्हणून हाक मारत होता. शेफालीच्या मृत्यूनंतर पारस याने तीव्र शोक व्यक्त केला. त्याने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट पण शेअर केली. त्यात त्याने लिहिले आहे की, कोणाचे आयुष्य किती लिहिल्या गेले आहे, हे कोणीच सांगू शकत नाही. ओम शांती.

शेफाली, करिअरच्या सुरुवाताली कांटा लगा या गाण्यामुळे एकदम प्रसिद्ध झाली. तिने लोकप्रियता मिळवली. तिला कांटा लगा गर्ल म्हणून ओळख मिळाली. याशिवाय शेफाली 2004 मध्ये मुझसे शादी करोगी या चित्रपटात एका खास भूमिकेत दिसली. या चित्रपटात ती सलमान खान, अक्षय कुमार आणि प्रियंका चोप्रासोबत दिसली.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.