AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शेफाली जरीवालाच्या घरी शुक्रवारी रात्री नेमकं काय घडलं होतं? पोलिसांची माहिती समोर

अभिनेत्री शेफाली जरीवालाचं ज्या रात्री निधन झालं, त्या रात्री तिच्या घरात एका पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं, अशी माहिती समोर येत आहे. शुक्रवारी रात्री शेफालीचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. तिचा पोर्ट मॉर्टम रिपोर्ट सोमवारी येण्याची शक्यता आहे.

शेफाली जरीवालाच्या घरी शुक्रवारी रात्री नेमकं काय घडलं होतं? पोलिसांची माहिती समोर
शेफाली जरीवालाImage Credit source: Instagram
| Updated on: Jun 29, 2025 | 9:35 AM
Share

‘कांटा लगा’च्या रिमिक्स गाण्यामुळे प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री शेफाली जरीवालाचं शुक्रवारी रात्री निधन झालं. वयाच्या 42 व्या वर्षी तिने जगाचा निरोप घेतला. शेफालीच्या निधनाने तिच्या कुटुंबीयांसह चाहत्यांना आणि कलाविश्वातील अनेकांना मोठा धक्का बसला आहे. शेफालीचं निधन हृदयविकाराच्या झटक्याने आल्याचं म्हटलं जात आहे. परंतु तिच्या अकाली मृत्यूमुळे संशयाचं वातावरण निर्माण झाल्याने अंबोली पोलिसांनी शेफालीच्या पतीसह 11 जणांचे जबाब नोंदवले आहेत. तिच्या मृतदेहाचं शवविच्छेदन पूर्ण झालं असून सोमवारी त्याचा अहवाल येऊ शकतो, अशी माहिती समोर येत आहे. आज रविवार असल्याने पोस्ट मॉर्टम रिपोर्ट येण्याची शक्यता कमी आहे. शवविच्छेदन अहवालातून शेफालीच्या मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट होऊ शकेल.

मुंबई पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शेफालीचा ज्या रात्री मृत्यू झाला त्याच रात्री तिच्या घरी एका पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. ज्यामध्ये शेफालीच्या कुटुंबीयांव्यतिरिक्त इतर अनेक लोक उपस्थित होते. सध्या शेफालीच्या कुटुंबीयांनी तिच्या मृत्यूवर कोणताही आक्षेप घेतलेला नाही. तरीही मुंबई पोलिसांचं पथक तिच्या पोस्ट मॉर्टम रिपोर्टची आणि फॉरेन्सिक रिपोर्टचीही वाट पाहत आहेत.

कलाविश्वात काम करणारे अनेक कलाकार त्यांच्या लूक आणि फिटनेसविषयी खूप सजग असतात. शेफाली स्वतःला तंदुरुस्त ठेवण्यासाठी आणि सुंदर दिसण्यासाठी ट्रीटमेंट घेत असल्याचीही माहिती समोर आली आहे. ती ठराविक कॅप्सूल घ्यायची, अशी माहिती डॉक्टरांनी दिली. फॉरेन्सिक टीम त्याचीही चौकशी करत आहे.

शेफाली अंधेरीच्या लोखंडवाला संकुलात पती पराग त्यागीसह राहत होती. शुक्रवारी रात्री 11 च्या सुमारास तिला हृदयविकाराचा झटका आला होता. उपचारासाठी शेफालीला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. रुग्णालयाने तिला मृत घोषित केलं. अंबोली पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे. न्यायवैद्यक पथकाने शनिवारी सकाळी तिच्या निवासस्थानी भेट देऊन पाहणी केली. यावेळी रक्त आणि व्हिसेरा नमुने न्यायवैद्यक तपासणीसाठी जतन करण्यात आले आहेत. अंधेरीमधील ओशिवरा इथल्या स्मशानभूमीत शनिवारी संध्याकाळी 7 वाजताच्या सुमारास शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी टेलिव्हिजन क्षेत्रातील अनेक कलावंत उपस्थित होते.

Follow Us
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि...
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि विम्याबाबत दिलासा
दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा
Uddhav Thackeray : दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा
मोठी बातमी! तृणमूल चिन्ह सुनावणीबाबत मोठी अपडेट, न्यायालयाकडून तातडी..
मोठी बातमी! तृणमूल चिन्ह सुनावणीबाबत मोठी अपडेट, न्यायालयाकडून तातडीचे निर्देश
महाराष्ट्राला या संकटातून बाहेर काढा; मंगलप्रभात लोढांची बाप्पाच्या...
महाराष्ट्राला या संकटातून बाहेर काढा; मंगलप्रभात लोढांची बाप्पाच्या चरणी विशेष प्रार्थना
चार एकर सोयाबीन, लाखोंचा खर्च अन् पदरी नुकसान; फडणवीसांसमोर शेतकरी...
चार एकर सोयाबीन, लाखोंचा खर्च अन् पदरी नुकसान; फडणवीसांसमोर शेतकऱ्यांचा आक्रोश
कणाहीन निवडणूक आयोगाची चौकशी करा; राज ठाकरेंनी थेट ज्ञानेश कुमार...
निवडणूक आयोगाचीच चौकशी करा; राज ठाकरेंनी थेट ज्ञानेश कुमारांना घेरलं
दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सरकार तत्पर; मंत्री चंद्रशेखर बावनकुळे...
दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सरकार तत्पर; मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी दिली महत्त्वाची माहिती
राहुल गांधींचा निवडणूक आयोगाला इशारा; ‘वेळ आल्यावर...
Rahul Gandhi : राहुल गांधींचा निवडणूक आयोगाला इशारा; ‘वेळ आल्यावर... नेमकं प्रकरण काय?
मुख्यमंत्री फडणवीस अमरावती वाशिम दौऱ्यावर दुष्काळी परिस्थितीचा घेणार..
मुख्यमंत्री फडणवीस अमरावती वाशिम दौऱ्यावर दुष्काळी परिस्थितीचा घेणार आढावा
ज्ञानेश कुमार यांच्यामागचा बॉस कोण? संजय राऊतांनी सरळ नावचं सांगून...
ज्ञानेश कुमार यांच्यामागचा बॉस कोण? संजय राऊतांनी सरळ नावचं सांगून टाकलं