AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शेफाली जरीवालाच्या निधनावर पूर्व पतीची प्रतिक्रिया समोर; म्हणाला “तिने खूप लवकर..”

'कांटा लगा गर्ल' फेम अभिनेत्री शेफाली जरीवालाचं शुक्रवारी रात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. वयाच्या 42 व्या वर्षी तिने या जगाचा अखेरचा निरोप घेतला. शेफालीच्या निधनावर आता तिच्या पूर्व पतीची प्रतिक्रिया समोर आली आहे.

शेफाली जरीवालाच्या निधनावर पूर्व पतीची प्रतिक्रिया समोर; म्हणाला तिने खूप लवकर..
शेफाली जरीवाला आणि तिचा पूर्व पतीImage Credit source: Instagram
| Updated on: Jun 29, 2025 | 9:17 AM
Share

‘काटा लगा’ या रिमिक्स अल्बममधील गाण्याने प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री शेफाली जरीवालाचं शुक्रवारी रात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. ती 42 वर्षांची होती. तिच्या अकाली मृत्यूमुळे संशयाचं वातावरण निर्माण झाल्याने अंबोली पोलिसांनी शेफालीच्या पतीसह 11 जणांचे जबाब नोंदवले आहेत. तिच्या मृतदेहाचं शवविच्छेदन पूर्ण झालं असलं तरी मृत्यूचं कारण अद्याप जाहीर करण्यात आलेलं नाही. शेफालीच्या निधनावर आता तिचा पूर्व पती हरमीत सिंहची प्रतिक्रिया समोर आली आहे. हरमीत सध्या युरोपमध्ये असून पूर्व पत्नीच्या अंत्यविधीला तो उपस्थित राहू शकला नाही.

हरमीतने इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहिली असून त्यात म्हटलंय, ‘मी सध्या युरोपमध्ये असल्याने अंत्यसंस्काराला उपस्थित राहू शकत नाही. याचं मला फार दु:ख आहे. शेफालीने खूपच लवकर या जगाचा निरोप घेतला. तिच्या आत्म्याला शांती मिळावी आणि तिच्या कुटुंबीयांना या दु:खातून सावरण्याची ताकद मिळावी यासाठी मी देवाकडे प्रार्थना करतो.’ शेफालीचं पहिलं लग्न प्रसिद्ध संगीतकार जोडी मीत ब्रदर्समधील हरमीत सिंहशी झालं होतं. हरमीतला ‘मैं तेरा बॉयफ्रेंड’, ‘बेबी डॉल’, ‘पिंक लिप्स’, ‘राधे राधे’ यांसारख्या गाण्यांसाठी ओळखलं जातं. काही काळ एकमेकांना डेट केल्यानंतर शेफाली आणि हरमीतने 2004 मध्ये लग्न केलं होतं. परंतु या दोघांचा संसार फार काळ टिकला नाही. हरमीतला घटस्फोट दिल्यानंतर शेफालीने अभिनेता पराग त्यागीशी 2014 मध्ये दुसरं लग्न केलं.

शेफाली अंधेरीच्या लोखंडवाला संकुलात पती पराग त्यागीसह राहत होती. शुक्रवारी रात्री 11 च्या सुमारास तिला हृदयविकाराचा झटका आला होता. उपचारासाठी शेफालीला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. रुग्णालयाने तिला मृत घोषित केलं. अंबोली पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे. न्यायवैद्यक पथकाने शनिवारी सकाळी तिच्या निवासस्थानी भेट देऊन पाहणी केली. यावेळी रक्त आणि व्हिसेरा नमुने न्यायवैद्यक तपासणीसाठी जतन करण्यात आले आहेत. अंधेरीमधील ओशिवरा इथल्या स्मशानभूमीत शनिवारी संध्याकाळी 7 वाजताच्या सुमारास शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी टेलिव्हिजन क्षेत्रातील अनेक कलावंत उपस्थित होते.

Follow Us
पुण्यात वंचित बहुजन आघाडीची काळी दिवाळी! चटणी-भाकरी खाऊन सरकारचा...
पुण्यात वंचित बहुजन आघाडीची काळी दिवाळी! चटणी-भाकरी खाऊन सरकारचा निषेध, शेतकऱ्यांसाठी अनुदानाची मागणी
सिलसिला बैठकांचा निर्णय विलीनीकरणाचा? पार्थ पवारांची पुन्हा एकदा...
NCP Merger : सिलसिला बैठकांचा निर्णय विलीनीकरणाचा? पार्थ पवारांची पुन्हा एकदा सिल्व्हर ओकवर बैठक
दोन्ही शिवसेना एकत्र... विलीनीकरणाच्या चर्चांबाबत ओमराजे निंबाळकर...
Omraje Nimbalkar : दोन्ही शिवसेना एकत्र... विलीनीकरणाच्या चर्चांबाबत ओमराजे निंबाळकरांचं मोठं विधान
पंतप्रधान मोदींवर बोलताना शिंदे गटातील नेत्याची जीभ घसरली; असं काय...
पंतप्रधान मोदींवर बोलताना शिंदे गटातील नेत्याची जीभ घसरली; असं काय म्हणाले?
दिवाळीच्या मंगलपर्वावर परळी वैजनाथ मंदिरात भाविकांची अलोट गर्दी;
दिवाळीच्या मंगलपर्वावर परळी वैजनाथ मंदिरात भाविकांची अलोट गर्दी; हर हर महादेवचा जयघोष!
नक्षलवाद्यांची आर्थिक कंबर मोडली! मोदींनी सांगितली सरकारच्या कठोर...
नक्षलवाद्यांची आर्थिक कंबर मोडली! मोदींनी सांगितली सरकारच्या कठोर निर्णयांची Inside Story
नाशिक TCS प्रकरणात मोठी अपडेट! इम्तियाज जलील, मतीन पटेल यांच्यासह...
नाशिक TCS प्रकरणात मोठी अपडेट! इम्तियाज जलील, मतीन पटेल यांच्यासह 11 जणांविरोधात पुरवणी दोषारोपपत्र दाखल
मोठी बातमी! फळबागा वाचवण्यासाठी फडणवीसांचा मोठा निर्णय; बोअरवेल...
मोठी बातमी! फळबागा वाचवण्यासाठी फडणवीसांचा मोठा निर्णय; बोअरवेल वापरण्याची...
मुख्यमंत्र्यांच्या शेतकरी दिवाळीवर संजय राऊतांचा सवाल; 5000 रुपयांत...
मुख्यमंत्र्यांच्या शेतकरी दिवाळीवर संजय राऊतांचा सवाल; 5000 रुपयांत कशी साजरी होणार दिवाळी?
दुष्काळाने शेतकरी हतबल! जनावरे विकण्याची वेळ, रोहित पवार पाहणीसाठी...
दुष्काळाने शेतकरी हतबल! जनावरे विकण्याची वेळ, रोहित पवार पाहणीसाठी गेले असताना शेतकऱ्यान मांडली व्यथा