Ex Husband ने केलं टॉर्चर ? मोडलं लग्न.. 26 वर्षांनी अभिनेत्रीने सोडलं मौन, शोषण..
बॉलिवूड अभिनेत्री शेफाली शाहने तिच्या पहिल्या लग्नाच्या आणि घटस्फोटाच्या जवळजवळ 26 वर्षांनंतर काही कहाण्या शेअर केल्या आहेत. लग्नात महिलांवर भावनिक अत्याचार कसे होतात आणि त्या कशा मोडून पडतात, पण समाजाला हे कसं नॉर्मल वाटतं याबद्दल ती बोलली आहे.

टीव्ही, ओटीटी, वेब सीरिज, आणि चित्रपट असा सर्व क्षेत्रांत लीलया वावरणारी अभिनेत्री शेफाली शाह हिचं नाव माहीत नाही, असा माणूस विरळाच. तिचे अत्यंत बोलके डोळ आणि कसदार अभिनय यामुळे ती कित्येकांची अतिशय आवडती अभिनेत्री आहे. प्रोफेशनल लाइफमध्ये ती सध्या यशाच्या शिखरावर आहे. पण इथपर्यंत पोहोचण्याआधी पर्सनल लाइफमध्ये, वैयक्तिक आयुष्यात तिने अनेक चढ-उतार पाहिले आहेत, बरंच सहन केलं. शेफाली शाह हिचं पहिलं लग्न मोडलं. तो काळ तिच्यासाठी खूपच कठीण होता.जवळपास 26 वर्षांनी ती मोडलेल्या लग्नाबद्द मोकळपणाने बोलली आहे.
पहिल्या लग्नात सहन केलं दु:ख ?
खरंतर, शेफाली शाहने 1994 साली अभिनेता हर्ष छायासोबत लग्न केले. पण, काही वर्षांनी त्यांचे नाते तुटले. शेफाली आणि हर्ष सहा वर्षांनी वेगळे झाले आणि 2000 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. तो काळ किती कठी होता याबद्दल शेफाली शाह हिने एका मुलाखतीत सांगितलं. “तुम्ही स्वतः पुरेसे आहात असं मला याआधी कोणीचं सांगितलं नव्हतं. तुम्हाला पूर्ण होण्यासाठी पती, मित्र, भाऊ किंवा बहिणीची गरज नाही. तुम्ही (स्वतःसाठी) पुरेसे आहात. जर तुमचं नातं चांगलं असेल तर उत्तमच, पण जर तसं नसेल तर त्यावरून तुमची किंमत ठरत नाही. पण मला हे कोणीच सांगितलं नव्हतं आणि तुम्ही जेव्हा अशा गोष्टीतून जाता, तेव्हा तुमची तुम्हालाच जाणीव होते. एक वेळ अशी येते जेव्हा (ती जाणवी) तुम्ही मोडून पजता, तेव्हाच तुम्हाला ते जाणवतं. कदाचित हे तुमच्यासोबत दररोज घडत असेल, पण नंतर एक क्षण असा येतो जेव्हा तुम्हाला जाणवतं की, ही गोष्ट मला संपवू शकते. मी आता हे अजून सहन करू शकत नाही. याची जाणीव होते, ‘ असं शेफालीने नमूद केलं.
भावनिक अत्याचाराबद्दल काय म्हणाली अभिनेत्री ?
शेफालीने पुढे सांगितलं की, एका जवळच्या मित्राशी बोलल्यानंतर तिच्यासाठी परिस्थिती बदलली. शेफाली म्हणाली, “मला वाटतं की माझ्या पहिल्या लग्नानंतर मला असे वाटू लागले. मला आठवतंय, माझ्या एका खूप चांगल्या मित्राने मला विचारलं होतं, ‘जर तुला आयुष्यात कोणीच भेटलं नाही तर काय होईल ? तुला जर संधि मिळाली तर एकटं रहायला आवडेल की, नाखुश असूनही त्याच लग्नबंधनात राहशील ? असं मला विचारलं. तेव्हा मी म्हणाले होते की, नाही, मी तो चान्स घेईन. जर मला उरलेलं आयुष्य एकटीने रहाव लागलं, तर मी तसं करेन. पण जिथे मला आनंद मिळत नाही, जिथे मला आत्मविश्वास वाटत नाही अशा ठिकाणी मीनराहू शकत नाही ‘ असं म्हटल्याचं शेफालीने सांगितलं. त्यानंतर तिने तिच्या पहिल्या पतीला घटस्फोट दिला आणि घटस्फोटानंतर बराच काळ एकटी राहिली.
शेफाली पुढे भावनिक अत्याचाराबद्दलही बोलली. ” भावनिक अत्याचार कधीही कमी लेखू नये किंवा सामान्य समजू नये, असे अभिनेत्री म्हणाली. “बरेच लोक यातून जातात आणि तुम्हाला नेहमीच सांगितले जाते आणि सतत विचारले जातं, ‘ठीक आहे, पण त्याने तुला मारलं तर नसेल, हो ना ?’. कधी तरी ही एक अशी विचारसरमई होते की, हो , हे खरं आहे. त्याने मला मारलं नाही, म्हणजे तो वसकन ओरडला असेल, तुम्ही किती मूर्ख आहात हे सुनावलं असेल पण हे सगळं ठीक आहे. तो फक्त बोललाय ( मारलं नाही ना) .. अशीच विचारसरणी होते.
” पण हे तुमचं किती नुकसान करतं ते तुम्हाला कळतं नाही. ते (असं वागणं) तुम्हाला माणूस म्हणून पूर्णपणे तोडतं” असं शेफालीने पुढे नमूद केलं. भावनिक अत्याचार हे शारीरिक हिंसाचाराइतकेच धोकादायक आहे आणि ते माणसाला आतून नष्ट करतात, असंही तिने नमूद केलं.
पहिल्या पतीला घटस्फोट दिल्यानंतर शेफाली शाह हिने 2000 साली विपुल शाहशी दुसरं लग्न केलं. दोघंही एकमेकांसाोबत आनंदी आयुष्य जगत आहेत.
