AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘धडकन’मधील देव-अंजली आले एकमेकांसमोर; चाहते म्हणाले सीक्वेल लवकरच

'धडकन' या चित्रपटातील प्रसिद्ध देव आणि अंजलीची जोडी आता बऱ्याच वर्षांनंतर पुन्हा एकत्र दिसली. मुंबईतील एका कार्यक्रमात जेव्हा शिल्पा आणि सुनील शेट्टी एकमेकांसमोर आले, तेव्हा नेटकऱ्यांना 'धडकन'ची आठवण आली.

'धडकन'मधील देव-अंजली आले एकमेकांसमोर; चाहते म्हणाले सीक्वेल लवकरच
Shilpa Shetty and Suniel ShettyImage Credit source: Instagram
| Updated on: Sep 26, 2024 | 10:05 AM
Share

अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि सुनील शेट्टी हे मुंबईतल्या एका कार्यक्रमात एकमेकांसमोर आले. यावेळी पापाराझींनी या दोघांचे फोटो आणि व्हिडीओ क्लिक केले. या कार्यक्रमात शिल्पा आणि सुनील शेट्टी यांनी एकत्र फोटोसाठी पोझसुद्धा दिले. ही लोकप्रिय जोडी 2000 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘धडकन’ या चित्रपटात एकत्र झळकली होती. या चित्रपटात शिल्पाने सुनील शेट्टीच्या प्रेयसीची भूमिका साकारली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान गाजला होता. त्यातील गाणी, डायलॉग आजही चाहत्यांच्या तोंडपाठ आहेत. आता बऱ्याच वर्षांनंतर जेव्हा हे दोन कलाकार एकमेकांसमोर आले, तेव्हा नेटकऱ्यांना ‘धडकन’ची आवर्जून आठवण आली.

शिल्पा आणि सुनील शेट्टी एकमेकांसमोर आल्यावर पापाराझी ‘अंजली’ म्हणून तिला हाक मारू लागले. हे ऐकून शिल्पालाही हसू अनावर झालं होतं. या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. कमेंट्समध्ये अनेकांनी ‘धडकन 2’ हा चित्रपट लवकरच आणावा, अशी मागणी केली. ‘या दोघांना पुन्हा एखाद्या चित्रपटात एकत्र पाहायला खूप आवडेल’, असं एकाने लिहिलं. तर ‘प्लीज धडकन 2 हा चित्रपट लवकरच आणा’, असं दुसऱ्याने म्हटलंय.

यावेळी शिल्पाने साडी नेसली होती, तर सुनील शेट्टीने पांढरा शर्ट आणि त्यावर ब्लेझर-पँट परिधान केला होता. 2000 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘धडकन’ या चित्रपटात सुनील आणि शिल्पा शेट्टी यांच्यासोबत अक्षय कुमारनेही भूमिका साकारली होती. या चित्रपटातील शिल्पा आणि सुनील शेट्टी यांच्यातील केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडली होती.

शिल्पा लवकरच ‘केडी: द डेविल’ या कन्नड चित्रपटात झळकणार असून यामध्ये ध्रुवा सर्जा, व्ही. रविचंद्रन, रमेश अरविंद, संजय दत्त, जिशू सेनगुप्ता आणि नोरा फतेही यांच्याही भूमिका आहेत. प्रेम दिग्दर्शित हा चित्रपट तमिळ, कन्नड, तेलुगू, मल्याळम आणि हिंदी भाषेतही प्रदर्शित होणार आहे. तर सुनील शेट्टी लवकरच ‘हंटर 2’ आणि ‘लेजंड ऑफ सोमनाथ’ या चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Follow Us
यंदा शिवाजी पार्कमध्ये दिवाळीचा झगमगाट नाही; मनसेने रोषणाई ऐवजी...
MNS Shivaji Park : यंदा शिवाजी पार्कमध्ये दिवाळीचा झगमगाट नाही; मनसेने भव्य रोषणाई ऐवजी निवडला साधेपणाचा मार्ग
पाण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार! रब्बी पिकांच्या मागणीसाठी रास्ता रोको
पाण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार! रब्बी पिकांच्या मागणीसाठी समृद्धी महामार्ग रोखला
ही याची लायकी आणि चालला...; धंगेकरांचं बन यांना पुन्हा डिवचणारं ट्वीट
Ravindra Dhangekar : ही याची लायकी आणि चालला पंगा घ्यायला...; रवींद्र धंगेकरांचं नवनाथ बन यांना पुन्हा डिवचणारं ट्वीट
वडिलांना न्याय मिळावा म्हणून राम पुर्णेकरांची मुख्यमंत्र्यांकडे भावनिक
वडिलांना न्याय मिळावा म्हणून राम पुर्णेकरांची मुख्यमंत्र्यांकडे भावनिक साद! केली मोठी मागणी
निलेश राणेंच्या टीकेला नवनाथ बन यांचं जोरदार प्रत्युत्तर; नारायण राणें
निलेश राणेंच्या टीकेला नवनाथ बन यांचं जोरदार प्रत्युत्तर; नारायण राणेंसोबतचा फोटो शेअर करत दिला सूचक संदेश!
श्रीचंद घाटावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विधिवत पूजा
सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी जोरात! श्रीचंद घाटावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विधिवत पूजा
रोहित पवारांचा डेटा सेंटर प्रकल्पाला विरोध; रद्द न केल्यास तीव्र आंदोल
रोहित पवारांचा डेटा सेंटर प्रकल्पाला विरोध; रद्द न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा!
सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त 700 वर्षांपूर्वीचे गंगा गोदावरी मंदिर उघडले
12 वर्षांची प्रतीक्षा संपली! सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त 700 वर्षांपूर्वीचे गंगा गोदावरी मंदिर भाविकांसाठी खुले
शंखांच्या गजराने दुमदुमलं त्र्यंबकेश्वर; गंगा-गोदावरीच्या महाआरतीने...
Nashik Simhastha Kumbh Mela : शंखांच्या गजराने दुमदुमलं त्र्यंबकेश्वर; गंगा-गोदावरीच्या महाआरतीने सिंहस्थ कुंभमेळ्याला सुरुवात
त्र्यंबकेश्वरमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याचा शंखनाद! ध्वजारोहण अन्...
त्र्यंबकेश्वरमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याचा शंखनाद! ध्वजारोहण अन् गोदावरीच्या महाआरतीने मंगलमय वातावरण