Raj Kundra | गणपती विसर्जनात राज कुंद्राचा मास्क घालून डान्स; नेटकरी म्हणाले ‘स्वत:चीच खिल्ली उडवतोय’

अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि बिझनेसमन राज कुंद्रा जेव्हा मीडिया आणि पापाराझींसमोर येतो, तेव्हा नेहमीच तो चित्रविचित्र मास्कमागे चेहरा झाकण्याचा प्रयत्न करतो. पॉर्नोग्राफी प्रकरणात कारवाई झाल्याने तो तोंड लपवतोय, अशा शब्दांत नेटकऱ्यांनी त्याला अनेकदा ट्रोल केलं.

Raj Kundra | गणपती विसर्जनात राज कुंद्राचा मास्क घालून डान्स; नेटकरी म्हणाले 'स्वत:चीच खिल्ली उडवतोय'
Raj KundraImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Sep 21, 2023 | 3:18 PM

मुंबई | 21 सप्टेंबर 2023 : अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्राच्या घरी दरवर्षीप्रमाणे यंदाही गणपती बाप्पाचं जल्लोषात आगमन झालं. शिल्पा शेट्टीच्या घरी दीड दिवसाचा गणपती असतो. दीड दिवस गणपती बाप्पाची मनोभावे पूजा केल्यानंतर ती गणरायाला धूमधडाक्यात निरोप देते. बुधवारी दिड दिवसाच्या गणपती बाप्पाचं विसर्जन करण्यात आलं. यावेळी शिल्पा शेट्टी आणि तिच्या कुटुंबीयांनी ढोल-ताशाच्या गजरावर ठेका धरला. मुलगा आणि बहीण शमिता शेट्टीसोबत नाचतानाचा शिल्पाचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. या विसर्जन मिरवणुकीतील आणखी एका व्हिडीओने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. हा व्हिडीओ शिल्पाचा पती राज कुंद्राचा आहे. तुरुंगातून जामिनावर सुटल्यापासून राज कुंद्रा मीडिया आणि पापाराझींसमोर स्वत:चा चेहरा दाखवत नाही. विविध प्रकारचे मास्क चेहऱ्याला लावून तो कॅमेऱ्यासमोर येतो. विसर्जन मिरवणुकीतही राज एका नव्या मास्कमध्ये दिसला.

या नव्या मास्कमध्ये राज कुंद्राचा चेहरा पूर्णपणे झाकलेला होता. तोच मास्क घालून त्याने विसर्जन मिरवणुकीत डान्स केला. यावेळी शिल्पा त्याच्याकडे पाहून खूप हसत होती. राज आणि शिल्पाच्या या व्हिडीओ नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत. ‘शिल्पा शेट्टीला नेमकं काय झालंय? तिला आणि तिच्या पतीला मानसोपचाराची सक्त गरज आहे’, असं एकाने लिहिलं. तर ‘तोंड लपवण्यासारखी कृत्ये करावीच कशाला’, असा टोमणा दुसऱ्या युजरने लगावला. ‘हा माणूस स्वत:चीच खिल्ली उडवतोय’, असंही नेटकऱ्यांनी म्हटलंय.

हे सुद्धा वाचा
View this post on Instagram

A post shared by Voompla (@voompla)

राज कुंद्राने एकदा ट्विट करत मास्कमागे चेहरा लपवण्याचं कारण सांगितलं होतं. ‘मी लोकांपासून माझा चेहरा लपवत नाही. पण मला मीडियाने माझे फोटो किंवा व्हिडीओ क्लिक करावे अशी माझी अजिबात इच्छा नाही. मी ज्या मीडिया ट्रायलमधून गेलोय, त्यानंतर ही गोष्ट समजायला तुम्हाला कठीण जाणार नाही’, असं त्याने लिहिलं होतं. गेल्या वर्षी जुलै महिन्यात राज कुंद्राला पॉर्नोग्राफी प्रकरणात अटक झाली होती. दोन महिने तुरुंगात राहिल्यानंतर त्याची जामिनावर सुटका झाली.

'वन नेशन वन इलेक्शन' वर काय म्हणाले डॉ.अमोल कोल्हे ?
'वन नेशन वन इलेक्शन' वर काय म्हणाले डॉ.अमोल कोल्हे ?.
'वन नेशन वन इलेक्शन' मुळे विरोधक...,' काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार
'वन नेशन वन इलेक्शन' मुळे विरोधक...,' काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार.
'केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शरद पवार यांच्या भेटीला'
'केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शरद पवार यांच्या भेटीला'.
उपमुख्यमंत्र्‍याच्या छातीला नंबरचा बॅच लावावा, वडेट्टीवार यांचा टोला
उपमुख्यमंत्र्‍याच्या छातीला नंबरचा बॅच लावावा, वडेट्टीवार यांचा टोला.
'लाडकी बहिण योजनेच्या निकषात...,' काय म्हणाल्या आदिती तटकरे
'लाडकी बहिण योजनेच्या निकषात...,' काय म्हणाल्या आदिती तटकरे.
'...तोपर्यंत स्मार्ट मीटर... ', काय म्हणाले म्हणाले अनिल परब
'...तोपर्यंत स्मार्ट मीटर... ', काय म्हणाले म्हणाले अनिल परब.
7 नेते, 5 मूर्ती, देवेंद्र फडणवीस यांनी कोणाला काय भेट दिली?
7 नेते, 5 मूर्ती, देवेंद्र फडणवीस यांनी कोणाला काय भेट दिली?.
राष्ट्रवादी-शिवसेना यांची खाती फिक्स, मात्र भाजपात अजूनही ट्वीस्ट !
राष्ट्रवादी-शिवसेना यांची खाती फिक्स, मात्र भाजपात अजूनही ट्वीस्ट !.
फडणवीस मुख्यमंत्री होताच जातीय तणाव निर्माण केला जातो,कोणी केला आरोप?
फडणवीस मुख्यमंत्री होताच जातीय तणाव निर्माण केला जातो,कोणी केला आरोप?.
...तर यापुढे ईव्हीएमवर निवडणूक लढविणार नाही, काय म्हणाले उत्तम जानकर?
...तर यापुढे ईव्हीएमवर निवडणूक लढविणार नाही, काय म्हणाले उत्तम जानकर?.