AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shubaman Gill – Sara Tendulkar : का रे दुरावा ? ‘या’ अभिनेत्रीमुळे शुबमन-सारा झाले दूर ?

Shubman Gill And Sara Tendulkar : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची लाडकी लेक सारा आणि भारताचा आघाडीचा क्रिकेटपटू शुबमन गिल हे त्यांच्या नात्यामुळे सतत चर्चेत असतात. ते दोघे एकमेकांना डेट करत असल्याच्या बातम्या काही दिवसांपासून समोर येत होत्या. मात्र आता सारा आणि शुबमनने एकमेकांना इन्स्टाग्रामवर अनफॉलो केल्याचं समोर आलं असून त्यामुळे त्यांच्या ब्रेकअपच्या चर्चा रंगल्या आहेत. त्यांच्यातल दुराव्यासाठी दुसरी एक अभिनेत्री कारणीभूत असल्याचंही बोललं जातंय, कोण आहे ती ?

Shubaman Gill - Sara Tendulkar : का रे दुरावा ? 'या' अभिनेत्रीमुळे शुबमन-सारा झाले दूर ?
सारा तेंडुलकर - शुबमन गिलImage Credit source: social media
| Updated on: Apr 21, 2025 | 1:02 PM
Share

क्रिकेट आणि बॉलिवूडच जुने नाते आहे. असे अनेक क्रिकेटपटू आहेत ज्यांनी चित्रपटातील कलाकारांना आपले जीवनसाथी म्हणून निवडले आहे. याच कारणामुळे दररोज कोणत्या ना कोणत्या क्रिकेटपटूचे नाव टीव्ही किंवा चित्रपटातील स्टारशी जोडले जाते. भारतीय सलामीवीर शुबमन गिल देखील याच कारणामुळे चर्चेत आहे. तो, मास्टर ब्लास्टर स सचिन तेंडुलकरची मुलगी सारा हिला डेट करत असल्याच्या बातम्या बऱ्याच काळापासून कानावर येत आहेत. खरंतर एका शोमध्ये त्याने स्वतःच साराचं नाव घेतलं होतं. तसेच त्याच्या मित्रानेही काही खुलासे केले. पण आता त्यात एक नाव ट्विस्ट आलाय कारण सारा-शुबमनने इन्स्टाग्रामवर एकमेकांना अनफॉलो केल्याने त्यांच्या ब्रेकअपच्या चर्चा सुरू झाल्या. आणि त्यांच्यातील या दुराव्यासाठी दुसरी एक अभिनेत्री कारणीभूत ठरल्याचेही बोलले जात आहे.

सारा तेंडुलकर आणि शुभमन गिल वेगळे झाल्याच्या अफवा आहेत. आणि त्यामागे एक टीव्ही अभिनेत्री असल्याचं काहींचं म्हणणं आहे. खरंतर ही टीव्ही अभिनेत्री शुभमन गिलमुळे बऱ्याच काळापासून चर्चेत आहे. ती दुबईला मॅच पाहण्यासाठीही गेली होती, त्यानंतर तिचे नाव त्या शुबमनशी जोडले जात आहे. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून टीव्ही कलाकार अवनीत कौर आहे.

तिच्यामुळे सारा-शुबमन झाले वेगळे ?

खरंतर अवनीत कौरने शुबमन गिलला त्याच्या गेल्या वाढदिवशी शुभेच्छा दिल्या होत्या. त्याआधीही दोघे एकत्र दिसले होते. मात्र, त्यावेळी इतर मित्रही त्याच्यासोबत होते. शुबमन गिल आणि अवनीत कौर यांना लंडनमध्येही एका ग्रुपसोबत पाहिले गेले. पण तेव्हाही दोघे कधीच एकटे दिसले नाहीत. तसंच दोघेही एकमेकांना इंस्टाग्रामवर फॉलोही करत नाहीत. पण अवनीत कौर अनेकदा भारतीय संघाला पाठिंबा देण्यासाठी स्टेडियममध्ये पोहोचते. ती दुबईमध्येही दिसली होती, पण आता तिला ट्रोल केलं जात आहे.

X वर अनेक लोकं हे सारा-शुबमनच्या ब्रेकअपसाठी अवनीतला जबाबदार ठरवत आहेत. पण हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार, अवनीत कौर आणि राघव शर्मा गेल्या तीन-चार वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. राघव शर्मा, हा एक निर्माता आहे, त्याची शुबमन गिलशी चांगली मैत्री आहे. अवनीत कौरही राघवच्या माध्यमातून शुबमनला भेटली. तथापि, राघव शर्मा आणि अवनीत कौर यांनी अद्याप त्यांचे नाते अधिकृत केलेले नाही. तर, अवनीत आणि शुबमन फक्त मित्र आहेत, पण लोक तिच्या फोटोंवर शुबमन गिलबद्दल कमेंट करतात. अवनीत कौर हा टीव्हीतील एक प्रसिद्ध चेहरा असून तिने अनेक चित्रपटांमध्येही काम केले आहे.

कोणा-कोणाशी जोडलं गेलं शुबमनचं नाव ?

खरंतर, शुबमन गिलचं नाव बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खानसोबतही जोडले गेलं होतं. पण साराने एका मुलाखतीत सांगितलं होतं की लोकांचा दोन्ही सारांमध्ये गोंधळ होतोय. एवढंच नव्हे तर शुबमन गिलचं टीव्ही अभिनेत्री रिद्धिमा पंडितसोबत लग्न झाल्याच्या बातम्या आल्या. पण ही बातमी चुकीची असल्याचे अभिनेत्रीने स्पष्ट केलं होतं.

पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.