AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

श्वेता तिवारीने ऑनस्क्रिन मुलासोबत केलंय तिसरं लग्न? अभिनेत्याकडून सत्य समोर; म्हणाला, ‘आमच्या नात्याबद्दल…’

Shweta Tiwari Marriage: 'आमच्या नात्याबद्दल...', ऑनस्क्रिन मुलासोबत श्वेता तिवारीने उरकलं तिसरं लग्न, फोटो व्हायरल होताच अभिनेत्याकडून सत्य समोर..., श्वेता तिवारी कायम खासगी आयुष्यामुळे असते चर्चेत...

श्वेता तिवारीने ऑनस्क्रिन मुलासोबत केलंय तिसरं लग्न? अभिनेत्याकडून सत्य समोर; म्हणाला, 'आमच्या नात्याबद्दल...'
| Updated on: Nov 22, 2024 | 12:18 PM
Share

Shweta Tiwari Marriage: टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे कमी पण खासगी आयुष्यामुळे अधिक चर्चेत असते. दोन लग्न अपयशी ठरल्यानंतर श्वेता तिवारीच्या तिच्या लग्नाच्या चर्चांनी जोर धरला आहे. दरम्यान, श्वेताच्या तिसऱ्या लग्नाचे फेक फोटो देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. फोटो पाहिल्यानंतर चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला. श्वेता तिवारी हिने ऑनस्क्रिन मुलगा आणि अभिनेता विशाल आदित्य सिंह यांच्यासोबत तिसरं लग्न केल्याच्या चर्चांनी जोर धरला. यावर खुद्द विशाल याने मौन सोडलं आहे. सध्या सर्वत्र विशाल याच्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे.

श्वेता तिवारी हिच्या सोबत व्हायरल होत असलेल्या फेक फोटोवर विशाल म्हणाला, ‘दोघांचा व्हायरल होत असलेला फोटो मी पाहिला आहे. फोटो पाहिल्यानंतर मला हसायला आलं… श्वेता सोबत माझं काय नातं आहे यावर स्पष्टीकरण देण्याची मला गरज भासत नाही. लोकांना जो विचार करायचा आहे त्यांनी तो करावा…’ असं अभिनेता म्हणाला.

श्वेताला आई म्हणून हाक मारतो – विशाल सिंह

‘श्वेता आणि मला आमच्या नात्याचं सत्य माहिती आहे. आमच्या नात्याबद्दल दुसरे काय विचार करतात याबद्दल आम्ही चिंता करत नाही… ज्यांना आमच्याबद्दल माहिती आहे त्यांना माहिती आहे की मी श्वेता आई म्हणून हाक मारतो…’ असं देखील अभिनेता विशाल आदित्य सिंह म्हणाला.

पुढे अभिनेता म्हणाला, ‘व्हायरल होत असलेल्या फोटोंमुळे मला त्रास होत नाही. फोटो पाहिल्यानंतर मला फक्त हसायला येतं…’, सध्या सर्वत्र विशाल याच्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे. विशाल आणि श्वेता यांनी ‘बेगुसराय’ मालिकेत एकत्र स्क्रिन शेअर केली आहे. श्वेता देखील विशाल याला स्वतःचा मुलगा मानते…

श्वेता तिवारी हिचं खासगी आयुष्य…

दोन अपयशी लग्नानंत श्वेता तिवरी तिच्या दोन मुलांसोबत आनंदी आयुष्य जगत आहे. घटस्फोटानंतर श्वेता लेक पलक तिवारी आणि मुलगा रेयांश तिवारी यांचा ‘सिंगल मदर’ म्हणून सांभाळ करत आहे. अभिनेत्री सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर श्वेता मुलांसोबत फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते.

Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा