श्वेता तिवारी कडून चाहत्यांना ‘गुडन्यूज’, म्हणाली, ‘आणखी प्रतीक्षा करू शकत नाही…’

Shweta Tiwari: श्वेता तिवारी बद्दल मोठी माहिती समोर, अभिनेत्रीने स्वतः दिली चाहत्यांना 'गुड न्यूज...', 'तो' फोटो पोस्ट करत म्हणाली, 'आणखी प्रतीक्षा करू शकत नाही...', सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त श्वेता तिवारी हिच्या सोशल मीडिया पोस्टची चर्चा...

श्वेता तिवारी कडून चाहत्यांना 'गुडन्यूज', म्हणाली, 'आणखी प्रतीक्षा करू शकत नाही...'
Follow us
| Updated on: Jun 25, 2024 | 8:42 AM

अभिनेत्री श्वेता तिवारी कायम तिच्या सौंदर्यामुळे आणि फिटनेसमुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर देखील श्वेता हिचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. आता देखील श्वेता हिचा एक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा फोटो खुद्द श्वेता हिने इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. शिवाय अभिनेत्रीने चाहत्यांना एक गुड न्यूज देखील दिली आहे. ज्यामुळे चाहत्यांना देखील आनंद झाला आहे. कायम फॅशनचा जलवा दाखवणाऱ्या श्वेताने चाहत्यांसोबत कोणती आनंदाची बातमी शेअर केली आहे… जाणून घेऊ.

श्वेता तिवारी हिने सोशल मीडियावर एका पोस्ट शेअर केली आहे. फोटो पोस्ट करत श्वेता हिने कॅप्शनमध्ये, ‘बहुप्रतिक्षीत हिंदी कॅमेडी प्ले ‘एक मैं और एक टू’ ची घोषणा करताना आनंद होत आहे. विनोद आणि भावनात्मक गोष्टीच्या रोलरकोस्टरसाठी तयार व्हा..’

पुढे श्वेता म्हणाली, ‘मी अन्य कलाकारांना भेटण्याची आता प्रतीक्षा करू शकत नाही! ते कोण असतील याचा अंदाज कोणी लावू शकतं का?’ असं देखील अभिनेत्री म्हणाली. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त श्वेता हिच्या पोस्टची चर्चा रंगली आहे. पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

सांगायचं झालं तर, श्वेता तिवारी प्ले करताना दिसणार आहे. ‘एक मैं और एक टू’ असं श्वेताच्या प्लेचं नाव असून विनोदी कथे भोवती फिरताना दिसणारी. प्रीमियर 6 जुलै रोजी संध्याकाळी 7:30 वाजता सेंट अँड्र्यूज येथे आणि 7 जुलै रोजी रंगशारदा येथे संध्याकाळी 7 वाजता होईल. श्वेताने असा पोस्टर शेअर केला आहे.

श्वेता तिवारी हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्रीने अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये काम केलं आहे. पण ‘कसोटी जिंदगी की’ मालिकेमुळे श्वेता हिच्या लोकप्रियतेत आणि प्रसिद्धीमध्ये मोठी वाढ झाली. त्यानंतर अभिनेत्रीने कधीच मागे वळून पाहिलं नाही.

आज श्वेता तिवारी हिला कोणत्या ओळखीची गरज नाही. सोशल मीडियावर देखील श्वेता कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर देखील श्वेता हिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी श्वेता कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

Non Stop LIVE Update
सर्वसामान्यांसाठी सीतारमण यांची मोठी घोषणा; काय स्वस्त आणि काय महाग?
सर्वसामान्यांसाठी सीतारमण यांची मोठी घोषणा; काय स्वस्त आणि काय महाग?.
इन्कम टॅक्सबाबत मोठी घोषणा, जाणून घ्या, तुम्हाला किती भरावा लागणार कर?
इन्कम टॅक्सबाबत मोठी घोषणा, जाणून घ्या, तुम्हाला किती भरावा लागणार कर?.
यमकसाठी मराठीचे वाभाडे, 'बालभारती'तील 'ती' कविता व्हायरल, युजर्स भडकले
यमकसाठी मराठीचे वाभाडे, 'बालभारती'तील 'ती' कविता व्हायरल, युजर्स भडकले.
Budget: बाबुंसाठी मोठं गिफ्ट, बिहार-आंध्रसाठी सीतारमण यांची मोठी घोषणा
Budget: बाबुंसाठी मोठं गिफ्ट, बिहार-आंध्रसाठी सीतारमण यांची मोठी घोषणा.
रोजगार, कौशल्यविकासाच्या 5 योजनांसाठी सरकारकडून मोठी घोषणा; इतकी तरतूद
रोजगार, कौशल्यविकासाच्या 5 योजनांसाठी सरकारकडून मोठी घोषणा; इतकी तरतूद.
नाशिक-मुंबई महामार्ग, कसारा घाट धुक्यात हरवलं, बघा निसर्गाचं सौंदर्य
नाशिक-मुंबई महामार्ग, कसारा घाट धुक्यात हरवलं, बघा निसर्गाचं सौंदर्य.
शाहांचा जळजळीत हल्लाबोल,आमदार-नेते दादासोबत तरी पवारांवरील टीका अमान्य
शाहांचा जळजळीत हल्लाबोल,आमदार-नेते दादासोबत तरी पवारांवरील टीका अमान्य.
शरद पवार भेटीनंतर शिंदे फडणवीसांच्या भेटीला, आरक्षणासंदर्भात काय चर्चा
शरद पवार भेटीनंतर शिंदे फडणवीसांच्या भेटीला, आरक्षणासंदर्भात काय चर्चा.
गुलाबी जॅकेटनंतर 'गुलाबी रिक्षा',काय आहे योजना? तुम्हालाही मिळणार लाभ?
गुलाबी जॅकेटनंतर 'गुलाबी रिक्षा',काय आहे योजना? तुम्हालाही मिळणार लाभ?.
'आरक्षणावरच चर्चा की दंगली..', पवार-शिंदेंच्या भेटीवरून जरांगेंची टीका
'आरक्षणावरच चर्चा की दंगली..', पवार-शिंदेंच्या भेटीवरून जरांगेंची टीका.