AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘आधी तिला चहासुद्धा विचारायचे नाही, नंतर..’; तृप्ती डिमरीविषयी काय म्हणाला सिद्धांत?

‘ॲनिमल’ या चित्रपटात रणबीर कपूरसोबतच्या न्यूड आणि इंटिमेट सीन्समुळे अभिनेत्री तृप्ती डिमरी विशेष चर्चेत आली. या चित्रपटामुळे रातोरात तिचं नशीब पालटलं. तृप्तीला 'नॅशनल क्रश' अशी नवीन ओळख मिळाली.

'आधी तिला चहासुद्धा विचारायचे नाही, नंतर..'; तृप्ती डिमरीविषयी काय म्हणाला सिद्धांत?
रणबीर कपूर, तृप्ती डिमरीImage Credit source: Instagram
Updated on: Jul 11, 2024 | 11:30 AM
Share

संदिप रेड्डी वांगा दिग्दर्शित ‘ॲनिमल’ या चित्रपटामुळे अभिनेत्री तृप्ती डिमरीचं नशीब रातोरात पालटलं. या चित्रपटात तृप्तीने अभिनेता रणबीर कपूरसोबत बरेच बोल्ड सीन्स दिले होते. ‘ॲनिमल’ या चित्रपटानंतर तृप्तीला ‘नॅशनल क्रश’ अशी नवीन ओळख मिळाली. अवघ्या काही दिवसांत इन्स्टाग्रामवर तिच्या फॉलोअर्सचा आकडा लाखोंनी वाढला. आता तृप्तीचा ‘बॅड न्यूज’ हा चित्रपट सोशल मीडियावर चर्चेत आहे. या चित्रपटाचा टीझर, गाणी आणि ट्रेलरमधील तृप्तीच्या बोल्ड अंदाजाने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. तृप्तीला निर्माता-दिग्दर्शक करण जोहरच्या एका मोठ्या चित्रपटाची ऑफरसुद्धा मिळाली आहे. ‘धडक 2’मध्ये ती अभिनेता सिद्धांत चतुर्वेदीसोबत झळकणार आहे. यानिमित्ताने ही नवीन जोडी पहिल्यांदाच प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. ‘ॲनिमल’नंतर तृप्तीचं नशीब कसं पालटलं, याविषयी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सिद्धांतने सांगितलं.

आरजे सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत सिद्धांतने सांगितलं, “डिसेंबर महिन्यात मी आणि तृप्ती शूटिंग करत होतो आणि ‘ॲनिमल’ हा चित्रपट त्याचवेळी प्रदर्शित झाला होता. आम्ही पहिल्या दिवशी शेवटचा शो बघायला गेलो होतो. शूटिंग पूर्ण झाल्यानंतर तृप्तीसोबत बसून आम्ही ॲनिमल’ हा चित्रपट बघत होतो. आम्हाला समजलंच नाही की काय झालं? ॲनिमल’च्या दमदार यशानंतर तृप्तीसोबत लोकांची वागणूक पूर्णपणे बदलली. रातोरात तिला इतकी प्रसिद्धी मिळाली की सोशल मीडियावर ती चर्चेचा विषया ठरली. मी माझ्या डोळ्यांसमोर लोकांच्या बदलत्या वागणुकीला पाहिलं होतं. सेटवर लोक तिच्याकडे अधिक लक्ष देऊ लागले होते.”

सिद्धांत पुढे म्हणाला, “सेटवर ती रोज चहा मागायची, पण तिचं कोणी ऐकायचंच नाही. पण ‘ॲनिमल’च्या यशानंतर लोक तिच्याजवळ येऊन विचारू लागले की तुला चहा हवा की कॉफी हवी? ग्रीन टी हवी का? ती स्वभावाने खूपच गोड आणि चांगली व्यक्ती आहे. पण माझा एक नियम आहे की मी जिथे काम करतो, तिथे प्रेमप्रकरण करत नाही. मी फक्त माझ्या कामावर प्रेम करतो. ज्या व्यक्तीसोबत काम करतो, त्याच्यावर प्रेम करत नाही.”

‘ॲनिमल’मध्ये रणबीरसोबत तृप्तीने न्यूड आणि इंटिमेट सीन्स दिले आहेत. याच सीन्समुळे ती प्रकाशझोतात आली आहे. तृप्ती रातोरात सोशल मीडियावर ‘नॅशनल क्रश’ ठरली आहे. रणबीरसोबतच्या इंटिमेटट सीन्समुळे आईवडिलांना धक्का बसल्याचा खुलासा तृप्तीने एका मुलाखतीत केला होता. “माझ्या आईवडिलांना जरा धक्का बसला. ते मला म्हणाले, आम्ही चित्रपटांमध्ये असं काही पाहिलं नव्हतं आणि तू सुद्धा अशी कोणती भूमिका साकारली नव्हतीस. त्या सीन्सच्या विचारांतून बाहेर पडण्यास त्यांना थोडा वेळ लागला. पण त्यांनी मला समजून घेतलं. ते म्हणाले की तू हे सीन्स करायला पाहिजे नव्हतं, पण ठीके. पालक म्हणून आम्हाला असं वाटणं स्वाभाविक आहे”, असं ती म्हणाली होती.

अजित पवार आणि धनंजय मुंडेंच्या वाढदिवसाच्या बॅनरवर वाल्मिक कराडचा फोटो
अजित पवार आणि धनंजय मुंडेंच्या वाढदिवसाच्या बॅनरवर वाल्मिक कराडचा फोटो.
पक्षाचं नाव कोणत्याही येड्या गबाळ्याला द्यायचं हे.., - उद्धव ठाकरे
पक्षाचं नाव कोणत्याही येड्या गबाळ्याला द्यायचं हे.., - उद्धव ठाकरे.
महाराष्ट्रात लवकरच धर्मांतरविरोधी कायदा येणार
महाराष्ट्रात लवकरच धर्मांतरविरोधी कायदा येणार.
आरोपीला व्हीआयपी ट्रि्टमेंट मिळतेय; प्रवीण गायकवाड यांचा गंभीर आरोप
आरोपीला व्हीआयपी ट्रि्टमेंट मिळतेय; प्रवीण गायकवाड यांचा गंभीर आरोप.
चड्डी-बनियानने अधिवेशन गाजवलं! आदित्य ठाकरे-नीलेश राणेंमध्ये जुंपली
चड्डी-बनियानने अधिवेशन गाजवलं! आदित्य ठाकरे-नीलेश राणेंमध्ये जुंपली.
पैशांची खूप मस्ती आली का? तुला..; भाजप आमदाराची ऑडिओ क्लिप व्हायरल
पैशांची खूप मस्ती आली का? तुला..; भाजप आमदाराची ऑडिओ क्लिप व्हायरल.
चड्डी, बनियन गँग उघडी-नागडी फिरतेय, त्यांना..; अनिल परबांची टीका
चड्डी, बनियन गँग उघडी-नागडी फिरतेय, त्यांना..; अनिल परबांची टीका.
परमीट रुम्स, बार बंद, ड्राय डेमुळे तळीरामांचा वांधा
परमीट रुम्स, बार बंद, ड्राय डेमुळे तळीरामांचा वांधा.
जयंत पाटलांनी राजीनामा दिला नाही? सुप्रिया सुळेंचा मोठा खुलासा
जयंत पाटलांनी राजीनामा दिला नाही? सुप्रिया सुळेंचा मोठा खुलासा.
सुप्रीम कोर्टाकडून उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा
सुप्रीम कोर्टाकडून उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा.