AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘तुम अपनी हद मे रहो…’ प्रेग्नंट कियारासमोर पापाराझींनी गर्दी केली; सिद्धार्थ मल्होत्रा भडकला

सोशल मीडियावर एक व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये सिद्धार्थ मल्होत्रा कियारावरून ​​पापाराझींवर चांगलाच ओरडताना दिसत आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी सिद्धार्थला पाठींबा दिला आहे.

'तुम अपनी हद मे रहो...' प्रेग्नंट कियारासमोर पापाराझींनी गर्दी केली; सिद्धार्थ मल्होत्रा भडकला
Sidharth Malhotra gets angry at paparazzi Image Credit source: instagram
Follow us
| Updated on: Apr 24, 2025 | 3:51 PM

सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणी लवकरच आई-बाब होणार आहेत. दोघांनीही सोशल मीडियावर चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिल्यापासून, प्रेग्नंट कियाराची एक झलक पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक असतात. अलिकडेच, कियारा आणि सिद्धार्थच्या कारसमोर पापाराझींनी गर्दी करताच सिद्धार्थ संतापला. सिद्धार्थता हा व्हिडीओ व्हायल झाला आहे.

मुंबईतील एका रुग्णालयाबाहेर सिद्धार्थ आणि कियारा स्पॉट

सिद्धार्थ आणि कियारा नुकतंच दोघांनाही मुंबईतील एका रुग्णालयाबाहेर पाहिलं गेलं. तथापि, यावेळी दोघेही आनंदी मूडमध्ये दिसत नव्हते. यादरम्यान अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राचा राग शिगेला पोहोचला होता. नेहमीच शांत दिसणारा हा अभिनेता पापाराझींवर चांगलाच संतापला होता.त्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

सिद्धार्थ पापाराझींवर चांगलाच भडकला

व्हिडिओमध्ये सिद्धार्थने राखाडी रंगाचा टी-शर्ट, डोक्यावर काळी टोपी आणि चेहऱ्यावर मास्क घातला आहे. तर, गाडीच्या आत बसलेल्या कियारा अडवाणी गुलाबी रंगाच्या पोशाखात दिसली. कियाराला पाहून पापाराझींनी अचानक तिच्याभोवती गर्दी करायला सुरुवात केली होती. पापाराझी कॅमेरा कियाराच्या फार जवळ घेऊन येत होते. एवढंच नाही तर कियारा कारमध्ये बसल्यानंतर कारच्या दाराजवळ जाऊन तिचे फोटो घेण्याचा प्रयत्न करताना दिसले. हे पाहून सिद्धार्थचा राग अनावर झाला. त्याने पापाराझींना फटकारलं. व्हिडिओमध्ये सिदार्थ म्हणताना दिसत आहे- ‘मागे जा… तु्म्ही तुमच्या मर्यादेत राहा.’ सिद्धार्थचा हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आहे.

व्हिडीओवर सोशल मीडियावर चाहत्यांचा सिद्धार्थला पाठिंबा 

यावर सोशल मीडियावर बऱ्याच कमेंट्सही येताना दिसत आहेत. काही युजर्सनी सिद्धार्थच्या या प्रतिक्रियेला योग्य म्हटलं आहे. या व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना एका चाहत्याने लिहिलं आहे की, ‘या पापाराझींना गर्भवती महिलेचा आदर कसा करायचा हे माहित नाही… सिद्धार्थने योग्यच केले.’ तर दुसऱ्या व्यक्तीने लिहिले की, ‘हे पापाराझी नेहमीच रस्ता अडवतात, त्याने त्यांना ओरडून योग्यच केलं.’ कामाच्या बाबतीत बोलायचे झाले तर, सिद्धार्थ शेवटचा ‘योद्धा’ चित्रपटात दिसला होता. तर कियारा शेवटची ‘गेम चेंजर’ मध्ये दिसली होती.

अतिरेक्यांच्या अंत्ययात्रेचा धक्कादायक व्हिडीओ, पाक आर्मी, राजकारणी अन
अतिरेक्यांच्या अंत्ययात्रेचा धक्कादायक व्हिडीओ, पाक आर्मी, राजकारणी अन.
भारत-पाकच्या DGMO मधील फोनवरील चर्चा संपली, पाकनं दिली मोठी ग्वाही
भारत-पाकच्या DGMO मधील फोनवरील चर्चा संपली, पाकनं दिली मोठी ग्वाही.
शाहिद आफ्रिदी मोठ्या भ्रमात... म्हणतो पाकचा विजय, रॅली काढली अन्...
शाहिद आफ्रिदी मोठ्या भ्रमात... म्हणतो पाकचा विजय, रॅली काढली अन्....
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री 8 वाजता LIVE, नेमकं काय बोलणार?
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री 8 वाजता LIVE, नेमकं काय बोलणार?.
पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, आधी युद्धविरामासाठी विनंती अन् आता म्हणताय
पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, आधी युद्धविरामासाठी विनंती अन् आता म्हणताय.
जम्मूच्या एका गावातील भिंतीत आढळला जिवंत बॉम्ब
जम्मूच्या एका गावातील भिंतीत आढळला जिवंत बॉम्ब.
मोठी बातमी, भारत-पाकच्या DGMO च्या चर्चेची वेळी बदलली, आता कधी चर्चा?
मोठी बातमी, भारत-पाकच्या DGMO च्या चर्चेची वेळी बदलली, आता कधी चर्चा?.
भारताच्या हल्लावेळी गायब झालेला असीम मुनिर कुठे होता?
भारताच्या हल्लावेळी गायब झालेला असीम मुनिर कुठे होता?.
या पुढची लढाई झाली तर.. ; भारतीय सैन्य दलांचा थेट इशारा
या पुढची लढाई झाली तर.. ; भारतीय सैन्य दलांचा थेट इशारा.
पाकिस्तानला तीव्र भूकंपाचा धक्का, आठवड्यात तिसऱ्यांदा पाक हादरलं
पाकिस्तानला तीव्र भूकंपाचा धक्का, आठवड्यात तिसऱ्यांदा पाक हादरलं.