AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वयाच्या 58 व्या वर्षी सिद्धू मूसेवालाची आई गरोदर, ‘या’ तंत्रज्ञानामुळे देणार बाळाला जन्म

singer sidhu moosewala | 'या' तंत्रज्ञानाच्या मदतीने सिद्धू मूसेवालाची आई गरोदर, वयाच्या पन्नाशीत 'या' मार्गाने गरोदर राहणं महिलांसाठी ठरु शकतं धोक्याचं? सर्वत्र फक्त आणि फक्त सिद्धू मुसेवाला याच्या आईच्या प्रेग्नेंसीची चर्चा...

वयाच्या 58 व्या वर्षी सिद्धू मूसेवालाची आई गरोदर, 'या' तंत्रज्ञानामुळे देणार बाळाला जन्म
| Updated on: Feb 28, 2024 | 12:42 PM
Share

मुंबई | 28 फेब्रुवारी 2024 : दिवंगत गायक सिद्धू मुसेवाला याची आई वयाच्या 58 व्या वर्षी बाळाला जन्म देणार आहे. पुढच्या महिन्यात सिद्धू मुसेवालाची आई दुसऱ्यांदा आई होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आयव्हीएफ तंत्रज्ञानाच्या मदतीने मुसेवालाची आई बाळाला जन्म देणार आहे. पण यावर सिद्धू मुसेवाला याच्या आई – वडिलांनी कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. सांगायचं झालं तर, सिद्धू त्याच्या आई-वडिलांचा एकूलताएक मुलगा होता. 2022 मध्ये सिद्धू याची हत्या करण्यात आली. गायकाच्या हत्येची जबाबदारी लॉरेंस बिश्नोई याने स्वीकारली.

दरम्यान, सिद्धू याच्या आईच्या प्रेग्नेंसीची बातमी समोर येताच चाहत्यांना देखील धक्का बसला आहे. वयाच्या पन्नाशीत महिला आयव्हीएफच्या (IVF) मदतीने गरोदर राहू शकतात का? असा प्रश्न आता याठिकाणी उपस्थित राहत आहे. जर वयाच्या पन्नाशीत महिला गरोदर राहिल्या तर त्यांच्या जीवाला कोणता धोका निर्माण होऊ शकतो का? असे प्रश्न देखील उपस्थित राहत आहेत.

काय आहे IVF?

IVF म्हणजे विट्री फर्टिलायझेशन.. याला टेस्ट ट्यूब बेबी देखील म्हणलं जातं. या तंत्रात स्त्रीच्या अंडाशयातून अंडी काढून फेलोपियन ट्यूबमध्ये पुरुषाच्या शुक्राणूसह फलित केलं जातं. त्यानंतर गर्भाधानाद्वारे तयार झालेला गर्भ स्त्रीच्या गर्भाशयात ठेवला जातो. ज्या महिला नैसर्गिकरित्या आई होऊ शकत नाही त्यांच्यासाठी हे तंत्रज्ञान वरदान ठरलं आहे.

50 वर्षांवरील महिलांनी IVF घेण्यापूर्वी ही खबरदारी घेणं गरजेचं…

पन्नाशीनंतर नैसर्गिकरित्या गरोदर राहणं महिलांना शक्य नसतं. कारण या वयोगटात महिलांची मासिक पाळी बंद होण्याच्या मार्गावर असते. पण IVF च्या मदतीने महिला गरोदर राहू शकतात. यासाठी महिलांना हार्मोनल इंजेक्शन देऊन त्यांचे गर्भाशय पुन्हा कार्यरत केलं जातं.

डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार IVF ची मदत घेण्याआधी महिलांनी संपूर्ण शारीराची चाचणी करुन घेणं महत्त्वाचं असतं. यामुळे महिलेला कोणता आजार तर नाहीना याची माहिती मिळते. ज्यामुळे महिलेच्या गर्भधारणेच्या क्षमतेवर परिणाम होऊ शकतो. याशिवाय, अंडाशय आणि गर्भाशयासह सर्व पुनरुत्पादक अवयवांची देखील तपासणी केली पाहिजे. यामध्ये अंडाशयातील ग्रंथी आणि गर्भाशयाचे आरोग्य महत्त्वाचे आहे. या प्रकरणात अगदी किरकोळ अडचण देखील स्त्रीसाठी धोकादायक ठरू शकते.

मधुमेह, बीपी आणि रक्ताच्या तपासण्याही कराव्यात. याशिवाय, महिलेला तिच्या मागील गर्भधारणेदरम्यान कोणतीही अडचण, गर्भपात झाला आहे का… याची माहिती असणे देखील तितकंच महत्त्वाचं असतं. महिला फक्त शारीरिक नाही तर मानसिकदृष्ट्या देखील तयार असायला हव्यात. IVF दरम्यान उद्भवणाऱ्या सर्व परिस्थितींबाबत स्त्रीने प्रजनन तज्ज्ञांशी सविस्तर चर्चा केली पाहिजे. ज्यामुळे धोका टळू शकतो.

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.