AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Taapsee Pannu | लोकप्रिय खेळाडूसोबत तापसी पन्नू अडकणार लग्नबंधनात, सेलिब्रिटींना नाही निमंत्रण कारण…

Taapsee Pannu | अनेकांच्या लग्नात असते सेलिब्रिटींची मांदियाळी, पण तापसी पन्नूच्या लग्नात सेलिब्रिटींना निमंत्रण नाही, लोकप्रिय खेळाडूसोबत अभिनेत्री अडकणार विवाहबंधनात... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त तापसीच्या खासगी आयुष्याची चर्चा

Taapsee Pannu | लोकप्रिय खेळाडूसोबत तापसी पन्नू अडकणार लग्नबंधनात, सेलिब्रिटींना नाही निमंत्रण कारण...
| Updated on: Feb 28, 2024 | 10:24 AM
Share

मुंबई | 28 फेब्रुवारी 2024 | फक्त बॉलिवूडमध्येच नाही तर, सर्वत्र लग्नाचे वारे वाहात आहेत. अभिनेत्री रकुल प्रित सिंग आणि जॅकी भगनानी यांच्यानंतर अभिनेत्री तापसी पन्नू विवाहबंधनात अडकणार आहे. सध्या सर्वत्र तापसीच्या लग्नाची चर्चा रंगली आहे. रिपोर्टनुसार, तापसीने बॉयफ्रेंड मॅथियास बोई याच्यासोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर तापसी आणि मॅथियास यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे तापसी कधी लग्न करणार आणि तिच्या लग्नात कोण उपस्थित राहणार याची माहिती देखील समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तापसी आणि मॅथियास यांचं लग्न पुढच्या महिन्यात म्हणजे मार्चमध्ये होणार आहे. एवढंच नाही तर, दोघे शीख आणि ख्रिश्चन धर्माच्या परंपरेनुसार लग्न करणार आहेत. पण याबद्दल तापसी आणि अभिनेत्रीचा बॉयफ्रेंड मॅथियास यांनी अधिकृत वक्तव्य केलेलं नाही.

कोण उपस्थित राहणार लग्नात?

रिपोर्टनुसार, तापसी – मॅथियास यांच्या लग्नात फक्त कुटुंबिय आणि खास मित्रपरिवार उपस्थित राहणार आहे. अभिनेत्रीच्या लग्नात बॉलिवूड सेलिब्रिटींना निमंत्रण नसल्याची देखील माहिती मिळत आहे. सांगायचं झालं तर, तापसी आणि मॅथियास गेल्या 10 वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत.

एका पॉडकास्टमध्ये तापसी हिने खासगी आयुष्याबद्दल मोठा खुलासा केला होता. ‘जेव्हा बॉलिवूडमध्ये पदार्पण करत होती, तेव्हाच मॅथियास याची ओळख झाली…’ अखेर दोघांच्या पहिल्या भेटीचं रुपांतर प्रेमात झालं. तापसीने अनेकदा मॅथियास याच्यासोबत फोटो देखील सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

कुठे राहतो मॅथियास?

मॅथियास बोई हा डेन्मार्कचा रहिवासी आहे. बॅडमिंटनपटू म्हणून तो ऑलिम्पिक पदक विजेता आणि युरोपियन चॅम्पियन आहे. मात्र, 2020 मध्ये तो निवृत्त झाला. बॅडमिंटन विश्वात तापसीच्या बॉयफ्रेंडचं नाव फार मोठं आहे. सोशल मीडियावर मॅथियासचे फोटो देखील व्हायरल होत असतात.

तापसी हिच्या बॉलिवूड करियरबद्दल सांगायचं झालं तर, 2013 पासून तापसी बॉलिवूडमध्ये सक्रिय आहे. ‘चश्मे बद्दूर’ हा तापसीची पहिला सिनेमा आहे. नुकताच तापसी अभिनेता शाहरुख खान याच्यासोबत ‘डिंकी’ सिनेमात दिलसली होती. सिनेमा 2023 डिसेंबर रोजी प्रदर्शित झाला होता. सिनेमाने बॉक्स ऑफिसवर जवळपास 450 कोटी रुपयांपेक्षा अधिक कमाई केली होती.

Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?