समुद्रकिनारी अभिजीत सावंत-गौतमी पाटील यांचा रोमान्स; काय आहे भानगड?
अभिजीत सावंत आणि गौतमी पाटील यांचा समुद्रकिनाऱ्यावरील AI व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यामुळे त्यांच्या नवीन प्रोजेक्टबद्दल चर्चांना उधाण आले आहे. संगीत विश्वात २० वर्षे पूर्ण केलेल्या अभिजीत सावंतसोबत गौतमी पाटील लवकरच एका दमदार प्रोजेक्टमध्ये दिसणार आहे.

संगीत विश्वात 20 वर्षे पूर्ण करून आपल्या आवाजाने प्रेक्षकांना मोहित करणारा एव्हरग्रीन गायक अभिजीत सावंत आणि महाराष्ट्राची लाडकी नृत्यांगणा गौतमी पाटील यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात ते दोघेही समुद्रकिनारी रोमान्स करताना दिसत आहे. यानंतर सध्या प्रेक्षकांमध्ये विविध चर्चांना उधाण आले आहे. आता या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. कारण अभिजीत सावंत आणि गौतमी पाटील लवकरच एका दमदार प्रोजेक्टमध्ये एकत्र दिसणार आहेत. या दोघांचा एक खास AI लूक असलेला व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असून प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे.
दोघे लवकरच नवीन प्रोजेक्ट घेऊन येणार
निळशार समुद्र, नारळाच्या बागा आणि या सुंदर पार्श्वभूमीवर अभिजीत सावंत आणि गौतमी पाटील यांचा AI लूक असलेला व्हिडीओ प्रेक्षकांना खिळवून ठेवत आहे. काही दिवसांपूर्वी गौतमीने अभिजीत सावंतसोबतचा एक सेल्फी सोशल मीडियावर कमिंग सून या कॅप्शनसह शेअर केला होता. तेव्हाच प्रेक्षकांनी हे दोघे लवकरच नवीन प्रोजेक्ट घेऊन येणार असल्याचा अंदाज लावला होता आणि आता या व्हायरल व्हिडीओने त्यावर शिक्कमोर्तब केले आहे.
अभिजीत सावंतसाठी 2025 लकी
गायक अभिजीत सावंतसाठी 2025 हे वर्ष अत्यंत खास ठरले आहे. या वर्षात त्याने अनेक ट्रेंडिंग गाणी दिली. संगीत विश्वात आपली 20 वर्षे पूर्ण केली आणि प्रेक्षकांवर पुन्हा एकदा आपल्या आवाजाची जादू केली आहे. तरुणाईच्या मागणीनुसार त्याने नुकतेच त्याचे सदाबहार गाणे ‘मोहब्बत लुटाऊंगा’ चे नवे कोर व्हर्जन देखील गायले. इंडियन आयडॉल ते आजच्या पिढीला साजेशी ट्रेंडिंग गाणी देणारा हा तरुणाईचा लाडका गायक ठरत आहे.
View this post on Instagram
आजवर आपल्या आवाजाने आणि ‘बिग बॉस’मधील कमाल खेळीने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या अभिजीत सावंत आणि गौतमी पाटीलचा हा आगामी प्रोजेक्ट नक्की काय असणार, हे पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. समुद्रकिनारी अभिजीत सावंत आणि गौतमी पाटील यांचा रोमान्स असणारा हा व्हिडीओ नेमक्या कोणत्या गाण्याचा भाग आहे, गौतमीसोबत आता अभिजीत कोणते नवीन गाणे घेऊन येतोय? हा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे. याचे उत्तर लवकरच प्रेक्षकांना मिळणार आहे.
