Congratulations | शिल्पा रावची मित्रासोबत लगीनगाठ, लग्नानंतरचा पहिला फोटो शेअर!

बॉलिवूड गायिका शिल्पा राव (Shilpa Rao) विवाहबंधनात अडकली आहे. शिल्पाने बालपणीचा मित्र रितेशशी लग्न केलं आहे.

Congratulations | शिल्पा रावची मित्रासोबत लगीनगाठ, लग्नानंतरचा पहिला फोटो शेअर!

मुंबई : बॉलिवूड गायिका शिल्पा राव (Shilpa Rao) विवाहबंधनात अडकली आहे. शिल्पाने बालपणीचा मित्र रितेशशी लग्न केलं आहे. शिल्पाने घुंघरु टूट गए, बुलेया अशी सुपरहिट गाणे गायली आहेत. शिल्पा आणि रितेश गेल्या तीन वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते आणि आता सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत रितेशसोबत लग्न केल्याची जाहिर केले आहे. कृष्णा व्यवसायाने छायाचित्रकार असून 25 जानेवारी रोजी त्यांनी लग्न केले आहे. शिल्पा राव आणि रितेशच्या लग्नात काही खास लोक उपस्थित होते. (Singer Shilpa Rao got married)

 

View this post on Instagram

 

A post shared by Shilpa Rao (@shilparao)

लग्नानंतरची पहिली सेल्फी शेअर करताना शिल्पाने लिहिले आहे की, आमची पहिली सेल्फी मिस्टर अँड मिसेस बनल्यानंतर शिल्पाच्या या पोस्टवर तिच्या चाहत्यांनी तिचे अभिनंदन केले आहे. बॉम्बे टाईम्सशी बोलताना शिल्पा राव म्हणाली की, आमचे आई-वडिल सीनियर सिटिजन आहेत. त्यामुळे आम्ही लग्न कमी लोकांमध्ये उरकून घेतले. अगदी साध्या पध्दतीने आमचा विवाह सोहळा पार पडला घर फुलांनी समवले होते तर माझ्या भावाच्या बायकोनेच माझी मेहंदी काढली होती. सायंकाळी पाच वाजता घरात आमचे लग्न झाले. माझे मित्र आणि कुटुंबीय व्हिडिओ कॉलद्वारे या लग्नात सामील झाले होते.

शिल्पाला जेव्हा रितेशने तिला प्रपोज कसे केले असे विचारले असता तिने सांगितले की, ऑक्टोबर 2019 मध्ये आम्ही लडाखच्या सर्वात उंच पर्वतावर होतो. रितेश मला म्हणाला की, चल लग्न करू आणि मी म्हणाले ठीक आहे. पती रितेशशी कौटुंबिक संबंधांविषयी शिल्पा म्हणाली की, माझे आई-वडील जेव्हा रितेशला भेटले तेव्हा त्यांना तो आवडला होता. रितेश माझ्यापेक्षा माझ्या आई-वडिलांची काळजी घेतो. तो कधी कधी मलाही कामाबद्दल आणि संगीतासाठी सल्ला देतो.

संबंधित बातम्या : 

Confirmed | मार्च महिन्यात नाही तर ‘या’ महिन्यात करिना सैफच्या घरी येणार नवा पाहुणा!

MeToo | प्रिती झिंटाच्या 2 वर्षांपूर्वीच्या विधानाची सोना महापात्राकडून जोरदार खिल्ली!

वरुण धवनपाठोपाठ त्याची ‘डान्सर’ को-स्टारही विवाहबंधनात अडकणार?

(Singer Shilpa Rao got married)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI