AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रिल्सस्टारचं नशीब फळफळलं, थेट या मालिकेत झाली हिरोईन, दमदार प्रोमो पाहाच!

आपण पाहिले की काही रिल्स स्टार रिअॅलिटी शोमध्ये दिसले तर काहींनी चित्रपटांमध्ये छोट्या भूमिका साकारल्या. आता एक अशी रिल्स स्टार चर्चेत आहे जिला थेट मालिकेमध्ये काम करण्याची संधी मिळाली आहे.

रिल्सस्टारचं नशीब फळफळलं, थेट या मालिकेत झाली हिरोईन, दमदार प्रोमो पाहाच!
ReelstarImage Credit source: Instagram
| Updated on: May 30, 2026 | 3:50 PM
Share

सध्या सोशल मीडियाचे जाळे हे सर्वत्र पसरले आहे. सोशल मीडियावर कंटेन्ट क्रिएट करणारे रिल्स स्टार हे सर्वांची मने जिंकत आहेत. दिवसेंदिवस रिल्स स्टार हे सर्वांचे लक्ष वेधत आहेत. या रिल्स स्टारची लोकप्रियता आजकाल एका कलाकारापेक्षा कमी नसते. आपण पाहिले की काही रिल्स स्टार रिअॅलिटी शोमध्ये दिसले तर काहींनी चित्रपटांमध्ये छोट्या भूमिका साकारल्या. आता एक अशी रिल्स स्टार चर्चेत आहे तिला थेट मालिकेमध्ये काम करण्याची संधी मिळाली आहे.

आम्ही ज्या रिल्सस्टारविषयी बोलत आहेत ती आहे श्रद्धा पवार. स्टार प्रवाह वाहिनीवर पावसाळ्याच्या सुरुवातीलाच प्रेक्षकांसाठी ‘मराठी मिडीयम’ ही एक नवीकोरी मालिका येत आहे. या मालिकेच्या निमित्ताने तरुणांची लाडकी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर (Reelstar) श्रद्धा पवार छोट्या पडद्यावर पदार्पण करत आहे. तिच्यासोबत अभिनेता अक्षय नलावडे मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सोशल मीडिया स्टार ते टीव्ही अभिनेत्री असा श्रद्धाचा हा नवा प्रवास पाहण्यासाठी तिचे चाहते प्रचंड उत्सुक असून, सोशल मीडियावर या मालिकेची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

मराठी शाळांची अस्मिता जपणारा प्रोमो प्रदर्शित

नुकताच या मालिकेचा प्रोमो सर्वत्र प्रदर्शित करण्यात आला आहे. सध्या राज्यात अनेक ठिकाणी मराठी शाळांच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. काही शाळा बंद पडत आहेत, तर काही अडचणीत सापडल्या आहेत. याच ज्वलंत आणि महत्त्वाच्या विषयावर ही मालिका आधारित आहे. प्रोमोमध्ये अक्षयचे पात्र मराठी शाळेच्या विरोधात असून त्याला ती शाळा पाडायची आहे, तर दुसरीकडे श्रद्धा एका शिक्षिकेच्या भूमिकेत शाळेच्या रक्षणासाठी खंबीरपणे उभी असल्याचे पाहायला मिळत आहे.

नेटकऱ्यांनी व्यक्त केल आनंद

स्टार प्रवाहने त्यांच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केलेल्या या प्रोमोला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. सध्याच्या काळात अशा सामाजिक विषयावरील मालिकेची नितांत गरज असल्याचे मत अनेक नेटकऱ्यांनी व्यक्त केले आहे. मात्र, नव्या मालिकेचे स्वागत करत असतानाच, काही प्रेक्षकांनी स्टार प्रवाहकडे कमेंट्सच्या माध्यमातून एक विशेष विनंती केली आहे. या नव्या मालिकेसाठी आमच्या आवडत्या जुन्या मालिकांची वेळ बदलू नका, अशी मागणी अनेक मालिकाप्रेमी करत आहेत.

Follow Us
मराठ्यांचा कुणबी प्रमाणपत्र मिळवण्याचा मार्ग मोकळा? जरांगेंसोबत चर्चा
मराठ्यांचा कुणबी प्रमाणपत्र मिळवण्याचा मार्ग मोकळा? मनोज जरांगेंसोबत सरकारच्या शिष्टमंडळाची चर्चा
आता मी जास्त वेळ... भर मंचावरून केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं मोठं...
Nitin Gadkatri : आता मी जास्त वेळ... भर मंचावरून केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं मोठं विधान, चक्क...
कांदिवलीतील मारहाण घटनेवर प्रताप सरनाईकांची तीव्र नाराजी; रिक्षाचालक..
कांदिवलीतील मारहाण घटनेवर प्रताप सरनाईकांची तीव्र नाराजी; रिक्षाचालकाला थेट...
मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मनोज जारांगे आक्रमक; मंत्री उदय सामंत,
मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मनोज जारांगे आक्रमक; मंत्री उदय सामंत, शंभुराज देसाई घेणार भेट
तर तुमचं राजकीय करिअर संपेल! मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
Manoj Jarange : तर तुमचं राजकीय करिअर संपेल! मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
माझगावमध्ये मोरया गणपती मिरवणुकीत गोंधळ, अंडी फेकल्याच्या आरोपाबाबत...
माझगावमध्ये मोरया गणपती मिरवणुकीत गोंधळ, अंडी फेकल्याच्या आरोपाबाबत मोठी अपडेट समोर
मराठी सक्तीवरून प्रकरण पेटलं! अमराठी रिक्षा चालकाकडून मराठी भाषिकाला..
मराठी सक्तीवरून प्रकरण पेटलं! अमराठी रिक्षा चालकाकडून मराठी भाषिकाला मारहाण; व्हिडीओ व्हायरल
कांदिवली लिंक रोडवर मराठी सक्तीच्या विरोधात रिक्षा चालकांचे आंदोलन,
कांदिवली लिंक रोडवर मराठी सक्तीच्या विरोधात रिक्षा चालकांचे आंदोलन, वाहतूक ठप्प
शिवसेना कुणाची? आठ दिवसांचा युक्तिवाद शिवसेनेसाठी निर्णायक? आज...
शिवसेना कुणाची? आठ दिवसांचा युक्तिवाद शिवसेनेसाठी निर्णायक... अगामी सुनावणीआधीच वकीलांनी असं काय सांगितलं?
माझ्याकडे 90 टक्के रिस्पॉन्स आहे, पण मी आबांना... लक्ष्मण हाके Video
माझ्याकडे 90 टक्के रिस्पॉन्स आहे, पण मी आबांना... पुन्हा लक्ष्मण हाकेच्या घरातील व्हिडीओ व्हायरल